Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ७८०० कोटींचा काळा पैसा उघड

७८०० कोटींचा काळा पैसा उघड

=आर्थिक गुप्तचर विभागाची कारवाई=
black_moneyनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – आर्थिक गुप्तचर विभागाने २०१३-१४ या वर्षात देशात आणि विदेशात कारवाई करून सुमारे ७८०० कोटी रुपये इतका काळा पैसा शोधून काढला आहे. देशातून मोठ्या प्रमाणात करचोरीचा पैसा बाहेर जात असल्याचेही या विभागाला दिसून आले आहे.
याबाबतचा अहवाल नुकताच अर्थमंत्रालयाने तयार केला आहे. आर्थिक गुप्तचर विभागाने या पैशाचा स्रोत शोधून काढल्यानंतर त्याबाबतची माहिती आयकर खात्याला देण्यात आली आणि आयकर खात्याने ७०७८ कोटी रुपये तसच जकात व सेवाकर खात्यांनी याच काळात ७५० कोटी रुपये इतका काळा पैसा ताब्यात घेतला, असे या अहवालात म्हटले आहे.
देशांतर्गत संशयास्पद आर्थिक व्यवहार कुठे होत आहेत, याचा छडा लावण्याची मोहीमच गुप्तचर विभागाने हाती घेतली होती. विविध वित्तीय संस्थांकडून काळ्या पैशाची माहिती मिळाली. याशिवाय, अंमलबजावणी महासंचालनालयानेही या प्रकरणी कारवाई करून २० कोटी रुपये किमतीचा काळा पैसा शोधून काढला आणि त्यातील १७ कोटी रुपये जप्त केले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22297

Posted by on Apr 27 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1748 of 2453 articles)


काठमांडू, [२६ एप्रिल] - शनिवारच्या भूकंपात नेपाळ आणि भारतासह अभेद्य असा हिमालय पर्वतही हादरला. हिमालयाच्या कडा कोसळून काही गिर्यारोहकांचा मृत्यूही ...

×