Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ७ दिवसात ऑनलाईन गॅस कनेक्शन मिळणार

७ दिवसात ऑनलाईन गॅस कनेक्शन मिळणार

=‘डिजिटल इंडिया’ इफेक्ट=
gas_cylinderनवी दिल्ली, [२१ ऑगस्ट] – नवीन गॅस कनेक्शन घेणे म्हणजे आतापर्यंत डोकेदुखीचेच काम होते. एजन्सीने मागितलेली सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतरही अमूक दस्तावेज कमी आहे, अशी कारणे सांगून वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. पण, आता या सर्व कटकटींपासून कायमची मुक्तता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ इफेक्टमुळे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर अवघ्या सात दिवसात नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध होणार आहे.
मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ असे ब्रिदवाक्य असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानात सरकारने आता गॅस कंपन्यांनाही सहभागी करण्याचे धोरण तयार केले आहे. कागदपत्रांच्या कचाट्यातून नागरिकांना मुक्त करण्यासाठी ‘किमान कागदपत्रे आणि महत्तम सेवा’ असे हे धोरण आहे. गॅस कंपन्याही ‘डिजिटल इंडिया’त सहभागी होत असल्याने नागरिकांना यापुढे नवीन गॅस कनेक्शन घेणे अतिशय सोपे होणार आहे.
या अंतर्गत नागरिकांना गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा मिळणार आहे. बुकिंग केल्यानंतर अवघ्या सात दिवसांत ग्राहकांना गॅस कनेक्शन आणि शेगड्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
‘डिजिटल इंडिया’ अभियानात सहभागी झाल्यानंतर गॅस कंपन्या चार आकडी ग्राहक काळजी क्रमांक जारी करतील. देशभरात हा क्रमांक एकसारखाच राहणार आहे. ही सुविधा तेल कंपन्यांच्या सांकेतिक स्थळांवर आणि सरकारी पोर्टल असलेल्या ‘पहल’वर उपलब्ध असेल. त्यावरून नवीन कनेक्शनसाठी अर्ज करता येणार आहे. या सुविधेद्वारे योग्य गॅस वितरक एजन्सी निवडण्याचा पर्यायही उपलब्ध राहील. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ४८ तासांच्या आत ग्राहकाला ई-मेल अथवा एसएमएसद्वारे ग्राहक क्रमांक मिळेल. पैसै जमा होऊन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर वितरक नवीन ग्राहकाला रेग्युलेटर, सिलेंडर आणि रबर पाईपचा पुरवठा करतील. ही सर्व प्रक्रिया अवघ्या सहा ते सात दिवसात पूर्ण होईल, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23638

Posted by on Aug 22 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1519 of 2453 articles)


=किम जोंग यांचे लष्कराला निर्देश= सेऊल, [२१ ऑगस्ट] - उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचे ...

×