Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ९ महिन्यांपासून सुरू होती पॅरीस हल्ल्याची योजना

९ महिन्यांपासून सुरू होती पॅरीस हल्ल्याची योजना

  • तपासातील निष्कर्ष
  • कन्सर्ट हॉलमधील अतिरेक्याची ओळख पटली
  • तीन संशयितांना अटक

French soldiers patrol near the Eiffel Tower in Paris as part of the "Vigipirate" security planपॅरीस, [१५ नोव्हेंबर] – १२९ नागरिकांचे बळी घेणार्‍या पॅरीसवरील भीषण दहशतवादी हल्ल्याची योजना गेल्या नऊ महिन्यांपासून तयार करण्यात येत होती. हल्ला कसा असावा, याची प्रात्यक्षिकेही करण्यात आली होती, असे निष्पन्न तपास अधिकार्‍यांच्या प्राथमिक चौकशीत झाले आहे. दरम्यान, बाटाक्ला कन्सर्ट हॉलमध्ये हल्ला करणार्‍या अतिरेक्याची ओळख पटविण्यात आली असून, पोलिसांनी तीन संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे. हे तिघेही बेल्जियमच्या ब्रुसेल्सचे नागरिक असल्याने या हल्ल्याचा थेट संबंध बेल्जियमशी असल्याचे संकेत आहेत.
शनिवारी पॅरीस शहरात एकाचवेळी सहा ठिकाणी भीषण दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. मुंबईच्या धर्तीवर झालेल्या या हल्ल्यात १२९ जण ठार, तर ३५२ जण जखमी झाले. या आत्मघाती हल्ल्यातील एका अतिरेक्याचे वय केवळ १५ वर्षे होते. या हल्याच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सच्या पोलिसांनी अनेक तपास पथके स्थापन करून, व्यापक चौकशी सुरू केली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर, पॅरीस हल्ल्याची योजना गेल्या नऊ महिन्यांपासून तयार करण्यात येत होती. हल्ल्याची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात हल्ला करण्यात आला होता. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला इसिसचे हे अतिरेकी प्रवासी व्हिसावर फ्रान्समध्ये दाखल झाले होते. या हल्ल्यातील सर्वच अतिरेक्यांना ठार केल्यानंतर एकाजवळून पोलिसांनी सीरियाचा पासपोर्ट ताब्यात घेतला. तपासात एक अतिरेकी हा पॅरीसचाच राहणारा असल्याचेही दिसून आले. कन्सर्ट हॉलमध्ये त्याने हल्ला केला होता आणि त्याचे नाव उमर इस्माईल मुस्तेफई असे होते. याच हॉलमध्ये सर्वाधिक ८९ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. उमरचा भाऊ आणि वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. उमरचे मित्र आणि नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेण्यात येत आहे.
पॅरीसवर हल्ला करणारे सर्वच अतिरेकी अनुभवी आणि प्रशिक्षित होते. या अतिरेक्यांना सीरियात प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी सांगितले की, पॅरीस हल्ल्याची संपूर्ण योजना विदेशात तयार झाली होती आणि फ्रान्समधील इसिसशी संबंधित असलेल्या काही लोकांनी यात मदत केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25477

Posted by on Nov 16 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1239 of 2458 articles)


=आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून विशेष आभार= लंडन, [१५ नोव्हेंबर] - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्तम अशा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समता ...

×