|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.96° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

27.09°C - 28.68°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.65°C - 29.01°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.48°C - 28.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.04°C - 27.82°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 28.18°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

26.13°C - 28.29°C

sky is clear

१२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड

१२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्डसिरसा, [१६ मार्च] – हरियाणातील सिरसामध्ये आधारकार्ड नोंदणी पथकाने एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे अद्याप या मुलाचे बारसेही झाले नसल्याने त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याच्या आईचा नामोल्लेख करत बेबी फर्स्ट ऑफ मीनाक्षी देवी असे नमूद केले आहे. सुधीर कुमार यांच्या पत्नी मीनाक्षी देवी यांनी २६ फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात या बालकाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातर्फेच आधार नोंदणीसाठी बालकाची सर्व माहिती घेतली. तीन तासातच नोंदणी पथक...17 Mar 2016 / No Comment /

म्हैसूर येथे विहिंप कार्यकर्त्याची हत्या

म्हैसूर येथे विहिंप कार्यकर्त्याची हत्या=भाजपाची बंदची हाक= बंगळुरू, [१४ मार्च] – विश्‍व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता राजू याची रविवारी म्हैसूर येथे हत्या करण्यात आली. राजू आपल्या मित्रांबरोबर चहा पित असताना एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजूच्या मृत्यूचे वृत्त समजताच नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. भाजपाने म्हैसूर बंदचे आवाहन केले होते. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतप्त निदर्शकांनी एक ऑटो पेटवून दिला तसेच...15 Mar 2016 / No Comment /

केरळमध्ये भाजपाच्या यशावर कॉंग्रेसला सत्तेची आशा

केरळमध्ये भाजपाच्या यशावर कॉंग्रेसला सत्तेची आशानवी दिल्ली, [१४ मार्च] – एप्रिलमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपा हिंदू मतांच्या आधारावर सत्तारूढ युडीएफ डाव्या पक्षांच्या अनेक जागा बळकावणार असली, तरी अल्पसंख्यकांचा पाहिजे तेवढा पाठिंबा न मिळाल्याने त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना यंदाची निवडणूक कठीण असून, त्याचा फायदा काही प्रमाणात भाजपाला मिळू शकतो, असे निवडणुकीबाबत केरळचा इतिहास पाहिला असता दिसून येते, असेही या निरीक्षकांचे मत आहे. यंदा केरळमध्ये त्रिकोणी...14 Mar 2016 / No Comment /

माजी मंत्र्यांच्या विहिरीत सापडले ४० बॉम्ब

माजी मंत्र्यांच्या विहिरीत सापडले ४० बॉम्बबेळगाव, [९ मार्च] – संकेश्‍वर येथे शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना विहिरीत तब्बल ४० बॉम्ब सापडले आहे. माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शेतातील विहिरीत हे बॉम्ब सापडल्यामुळे आश्‍चर्य आणि भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या शेतातील विहिरीतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. काल सायंकाळी कामगारांना गाळ काढताना काही बॉम्ब आढळले. त्यांनी ही बातमी लगेच पाटील यांना दिली. पाटील यांनी तातडीने पोलिसांना याबाबत...10 Mar 2016 / No Comment /

पणजी महापालिकेत भाजपाचा पराभव

पणजी महापालिकेत भाजपाचा पराभव=मोन्सेराट पॅनेलला स्पष्ट बहुमत= पणजी, [८ मार्च] – गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला पणजी या राजधानीच्या शहरातील महानगर पालिकेची सत्ता गमवावी लागली आहे. पणजी महानगर पालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंगे्रसचे बंडखोर नेते ऍटान्सिओ मोन्सेराट यांच्या पॅनेलने ३० पैकी १७ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपाला केवळ १३ जागा मिळाल्या असून, कॉंगे्रसला भोपळाही फोडता आला नाही. वर्षभरातच गोवा विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पणजी महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात होते....9 Mar 2016 / No Comment /

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य=मद्रास हायकोर्टाचा निर्वाळा= चेन्नई, [६ मार्च] – केवळ अनुदानित आणि शासकीय शाळांमध्येच नव्हे, तर विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्येही सकाळची प्रार्थना राष्ट्रगीतानेच सुरू करणे अनिवार्य आहे, असा महत्त्वाचा आणि दूरगामी परिणामकारक निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला. शासकीय शाळांची सुरुवात राष्ट्रगीतानेच होत असते. पण, खाजगी शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत म्हटले जाते की नाही, याची तपासणी करण्यात यावी. संबंधित राज्यांमधील शिक्षण विभाग आणि केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाने ही जबाबदारी पार पाडावी,...6 Mar 2016 / No Comment /

रिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार

रिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणारनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्‍या स्मार्टफोनसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनीच्या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिंगिंग बेल्स कंपनी आपल्या ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या तयारीत आहे. ईडी कंपनीच्या खात्याची आणि व्यवहाराची चौकशी करीत असली, तरी यासंबंधात कंपनीला नोटीस पाठविण्यात आलेली नाही असे सूत्रांनी म्हटले आहे. केवळ २५१ रुपयात स्मार्टफोन देणारी ही कंपनी सध्या देशभरात चर्चेत आहे....29 Feb 2016 / No Comment /

महालढतीत भारताची बाजी, पाकचा पराभव

महालढतीत भारताची बाजी, पाकचा पराभव=विराट कोहली सामनावीर= मीरपूर, [२७ फेब्रुवारी] – जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानचा २७ चेंडू शिल्लक असताना पाच गड्यांनी पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पाकवरील आपले वर्चस्व अबाधित राखले. सलग दुसर्‍या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या मोहम्मद आमिरने रोहित शर्मा (०), अजिंक्य रहाणे (०)...28 Feb 2016 / No Comment /

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा= भोपाळ, [२७ फेब्रुवारी] – विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह आज शनिवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने शुक्रवारी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. या घोटाळ्यात दिग्विजयसिंह आरोपी असून, शनिवारी ते विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश काशीनाथसिंह यांच्यासमोर हजर झाले. याप्रकरणी १६९ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, दिग्विजयसिंह हजर न झाल्यामुळे न्यायालयाने वॉरंट बजावला होता. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण...28 Feb 2016 / No Comment /

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पण

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पणनवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – मध्य प्रदेश विधानसभा भरती गैरव्यवहार प्रकरणी कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानंतर आज शनिवारी ते न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत. याप्रकरणी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात भाजपने याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र यावेळेस दिग्विजयसिंह न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट प्रसिद्ध केले होते. शेवटी आज दिग्विजयसिंह न्यायालयात आत्मसमर्पण करणार आहेत. तसेच आपली बाजूही न्यायालयात मांडणार आहेत....27 Feb 2016 / No Comment /

अरुणाचलात राष्ट्रपती राजवट

अरुणाचलात राष्ट्रपती राजवट=प्रणव मुखर्जी यांची मोहर= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] – केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीवर मोहर उमटविताना, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज बुधवारी अरुणाचल प्रदेशला राष्ट्रपती राजवटीखाली आणले. तिथेच, आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करीत, ते सिद्ध करण्याचीही तयारी आहे, असे मुख्यमंत्री नबम तुकी यांनी सांगितले. राजकीय अस्थिरता असलेल्या अरुणाचलात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी...28 Jan 2016 / No Comment /

सूर्यमालेत नववा ग्रह सापडल्याचा दावा?

सूर्यमालेत नववा ग्रह सापडल्याचा दावा?न्युयॉर्क, [२१ जानेवारी] – सूर्यमालेतील प्लुटो या ग्रहाच्या पुढे असलेल्या गडद अंधारात विशाल बर्फाळ ग्रह असल्याचा दावा अमेरिकेच्या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. हा ग्रह प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १० पट असेल. याला त्यांनी ‘प्लॅनेट नाईन’ असे नाव दिले आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्‌यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अंतराळ संशोधकांनी सूर्यमालेत नववा ग्रह असल्याची ही शक्यता व्यक्त केली आहे. पृथ्वीच्या तुलनेत हा ग्रह सुमारे ५ ते १० पटीने मोठा आहे. अंतराळ संशोधक...22 Jan 2016 / No Comment /