Home » पर्यटन » शिवकालस्मरण : सिंहगड

शिवकालस्मरण : सिंहगड

sinhagadपुण्यात येऊन सिंहगड बघितला नाही असे होत नाही. पुण्या पासून २० किलोमीटर असणारा सिंहगड समुद् सपाटी पासून ७५० मीटर उंचीवर आहे. सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला आपल्या ताब्यात यावा ही शिवाजी महाराजांची इच्छा होती.
त्यासाठी त्यांनी बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्यावर कोंढाणा मोगलांच्या ताब्यातून घेण्याची जबाबदारी सोपवली. १६७० साली तानाजीने निवडक मावळ्यांसह गडावर आक्रमण केले. घनघोर युध्दानंतर मावळ्यांनी तो किल्ला जिंकला, मात्र या युध्दात तानाजी शहीद झाला. ही बातमी महाराजांना कळाली तेव्हा ते म्हणाले, की गड आला पण सिंह गेला.
यावरुन नंतर त्या किल्ल्याचे नाव सिंहगड पडले. सिंहगडावर आता थेट गाडी जाते. मात्र, पायथ्यापासून पायवाटेने गडावर जाण्यात खरी मजा आहे. गडावर पोहोचल्यावर प्रथम पुणे दरवाजा लागतो. सिंहगडावर तानाजी मालूलुरे व शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम यांची समाधी आहे.
सिंहगडावर गेलात आणि देव टाकीचे पाणी न पिताच परतलात असे होत नाही. थंडगार व शुध्द पाण्यासाठी ही टाकी प्रसिध्द आहे. येथील पिठले भाकर, मटक्यातील दही व कांदाभजी खाण्याची मजा काही और आहे गडावरुन लवकर निघाल्यास परतताना वाटेत खडकवासला धरणात पोहण्याचा आनंदही घेता येईल.
जाण्याचा मार्ग ः
सिंहगडावर जाण्यासाठी पुण्यातून स्वारगेटवरुन भरपूर गाड्‌या आहेत. पायथ्यापर्यंत पीएमटीची बसही जाते. तेथून एक तर पायवाटेने किवा खाजगी जीपने आपण गडावर जाऊ शकतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=1614

Posted by on Feb 7 2013. Filed under पर्यटन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in पर्यटन (1 of 7 articles)


-सातपुडा पर्वतरांगातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भूप्रदेश- सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. ...

×