Home » मराठवाडा » तुळजाभवानीला होणार फक्त दुग्धाभिषेक

तुळजाभवानीला होणार फक्त दुग्धाभिषेक

धाराशिव, (१७ जानेवारी) – तुळजापूरात असलेल्या मंदिरातील तुळजाभवानीच्या मूर्तीची झीज थांबविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता निवळला आहे. मूर्तीची झीज थांबविण्यासाठी यापुढे पंचामृताऐवजी आता फक्त दुधानेच अभिषेक केला जावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
तुळजाभवानीला दुग्धाभिषेक करायचा की नाही, या मुद्यावरूनच गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरातील पुजारी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मंदिर संस्थान यांच्यात हा वाद सुरू होता. जिल्ह्याचे जिल्हाधिकारीच श्री तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष असतात. सध्या जिल्हाधिकारी असलेले डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीतच हा वाद संपुष्टात आणण्यात आला आणि मंदिरात कार्यरत असलेल्या तिन्ही पुजारी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मूर्तीवर दुग्धाभिषेक करायला संमती दर्शविली आहे. याशिवाय एक दिवस फक्त सातच अभिषेक करण्याचेही मान्य करण्यात आले आहे. या निर्णयांची अंमलबजावणी उद्या शनिवार १८ जानेवारीपासून केली जाणार आहे.
दूध, दही, मध, श्रीखंड आदी पदार्थांचा वापर करून पंचामृत तयार केले जात होते आणि त्याने अभिषेक केला जात होता. या पंचामृतामधील रसायनामुळे मूर्तीची झीज होत असल्याची बाब लक्षात आली होती. तसे मत पुरातत्त्व विभागानेह नोंदविले होते. या पंचामृताच्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज होत नाही, अशी बाजू मांडत पुजारी मंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने लखनौस्थित राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण संस्थेमार्फत तपासणी करून अहवाल मागितला होता. त्या अहवालातील माहितीनुसार दिवसाला सातच अभिषेक करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. त्यातही पाच अभिषेक सकाळी आणि दोन सायंकाळी, असेही निर्देश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी १८ जानेवारीपासून करण्यासाठी पुजारी मंडळाने नकार दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी ही बैठक बोलाविली होती. अखेर सर्वांनी मिळून दुग्धाभिषेकाला मान्यता दिली आणि न्यायालयाच्या निर्णयाची १८ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचेही ठरविले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10287

Posted by on Jan 18 2014. Filed under मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in मराठवाडा (24 of 25 articles)


=गोपीनाथ मुंडेंनी दिले अजित पवारांना आव्हान= मुंबई, (७ जानेवारी) - हिंमत असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमधून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक ...

×