Home » महाराष्ट्र » मोदी सरकारने सर्वच घटकांचा विकास केला

मोदी सरकारने सर्वच घटकांचा विकास केला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन,
अकोला,११ एप्रिल – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने देशातील गरिबांसह सर्वच घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या असून गेल्या ५० वर्षांत प्रथमच नागरिकांना विकास दिसून आला असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांचा व त्यांचा प्रत्यक्ष स्थानिकांना झालेल्या लाभाचा पुराव्या सहित दाखला दिला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते गुरुवार, ११ रोजी मार्गदर्शन करत होते.
काँगे्रसने फक्त स्वकियांची गरिबी दूर केली असा टोला हाणून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत योजनेमुळे देशात ९८ टक्के लोकांना शौचालये उपलब्ध झालीत. त्याचा सर्वाधिक फायदा हा मातृशक्तीला झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
देशातील १३ कोटी माताभगिनी आतापर्यंत चुलीवर स्वयंपाक करीत होत्या. पण, उज्ज्वला योजनेतून सहा कोटी महिलांना गॅस कनेक्शन मोदी सरकारने दिले. मुद्रा योजनेतील तेरा कोटी लोकांना कर्ज मिळाले. आयुष्यमान भारत योजनेत ५० कोटी लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. यात पाच लाखपर्यंतचा उपचार मोफत होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी, पीककर्ज व इतर बाबींमध्ये १२२६ कोटी रुपये शासनाने दिले, तर १८२० कोटी रुपयांचे सिंचनाचे प्रकल्पासाठी अकोला जिल्ह्याला निधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला, तर राष्ट्रीय महामार्गावर १२०० कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातील शहरांप्रमाणे अकोला शहर पुढील दोन वर्षात चकचकीत करू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली व ते म्हणाले की, आंबेडकर हे केवळ मोदींवर टीका करत असून, त्यांच्याकडे धोरण नाही, नीती नाही असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेतील सत्तेतून ग्रामीण जनतेला वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांची व चेल्याचपाट्यांची गरिबी हटविल्याचा आरोप त्यांनी केला तर सामान्यांची गरिबी तशीच कायम राहिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी येथे केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=35614

Posted by on Apr 12 2019. Filed under महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in महाराष्ट्र (1 of 279 articles)


-• इकॉनॉमिक कॉरिडॉर रोजगाराचा राजमार्ग : मुख्यमंत्री -• हेरिटेज टुरिझममुळे सेवाग्राम जागतिक नकाशावर •- सिंदी (रेल्वे) ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यातीला संधी, वर्धा, ...

×