|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.66° C

कमाल तापमान : 30.55° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 4.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.55° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

28.79°C - 31.87°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.06°C - 31.78°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.13°C - 30.39°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.53°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

26.71°C - 29.55°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.32°C - 30.23°C

overcast clouds

मराठवाड्यासह राज्यात बहुतांश जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडणार: गुलाबराव पाटील

मराठवाड्यासह राज्यात बहुतांश जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडणार: गुलाबराव पाटीलजळगाव, (२८ ऑगस्ट) – राज्यात जवळपास संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होताना दिसत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर, काही भागात कृत्रिम पावसाचा पर्याय पडताळून पाहावा लागेल, असे स्पष्ट संकेत पाणीपुरवठा आणि जलसंधारण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. राज्याच्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून, अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या...28 Aug 2023 / No Comment /

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही– देवेंद्र फडणवीसांची ग्वाही, सादर केली दुष्काळमुक्तीची योजना, परभणी, (२७ ऑगस्ट) – पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरी खोर्यात आणायचे आहे. त्या आधारे मराठवाड्यातील मागील पिढीने पाहिलेला दुष्काळ पुढील पिढीला पाहू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात प्रत्येक चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. २०१४ मध्ये ५३ टक्के पाऊस...27 Aug 2023 / No Comment /

राज्यातील अनेक भागांत पाण्याची स्थिती गंभीर: अजित पवार

राज्यातील अनेक भागांत पाण्याची स्थिती गंभीर: अजित पवार-सरकारचे परिस्थितीवर लक्ष, परभणी, (२७ ऑगस्ट) – काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात सध्या गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे दिली. सध्याची परिस्थिती पाहता सरकार पाण्याचे नियोजन करीत आहे. आगामी परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी घाबरू नये, असे अजित पवार यांनी सांगितले. ते येथील शासन आपल्या दारी कार्यक‘मात बोलत होते. पावसामुळे वेगळी...27 Aug 2023 / No Comment /

जपानमधून प्रचंड गुंतवणूक येणार

जपानमधून प्रचंड गुंतवणूक येणार-वर्सोवा-विरार सी-लिंक, मेट्रो ११ प्रकल्पाला मदत, -देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, मुंबई, (२७ ऑगस्ट) – उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा दिवसांच्या जपान दौरा आटोपून शनिवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. मुंबईत आल्यावर प्रसन्न वाटते, अशी प्रतिकि‘या त्यांनी दिली. मुंबई विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, कृपाशंकर सिंह आणि इतर भाजपा नेते-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जपानमधील अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याची...27 Aug 2023 / No Comment /

गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभाग नोंदवावा : मुनगंटीवार

गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभाग नोंदवावा : मुनगंटीवारमुंबई, (२६ ऑगस्ट) – राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या...26 Aug 2023 / No Comment /

बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार: रामदास आठवले

बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार: रामदास आठवलेपुणे, (२६ ऑगस्ट) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी तसेच संविधानाचा प्रचार व प्रसार करणारी राज्यशासनाची महत्वपूर्ण संस्था आहे. बार्टी संस्थेला कल्याणकारी योजनांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देणार असून संस्थेला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.श्री.आठवले म्हणाले, बार्टीने...26 Aug 2023 / No Comment /

एमआयटी समूहाचे ‘विश्वप्रयाग विद्यापीठ’ लवकरच सोलापुरात

एमआयटी समूहाचे ‘विश्वप्रयाग विद्यापीठ’ लवकरच सोलापुरात– प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, सोलापूर, (२५ ऑगस्ट) – माईंर्सं एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईंर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली 40 वर्षे मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरुण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. अशा या समूहाच्या माध्यमातून सोलापूर येथे एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाची सुरुवात येत्या 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र...25 Aug 2023 / No Comment /

शरद पवार यांच्या भूमिकेने महाविकास आघाडीत संभ्रम

शरद पवार यांच्या भूमिकेने महाविकास आघाडीत संभ्रम– आधी म्हणाले, राकाँत फूट नाही, नंतर केले घूमजाव, बारामती, (२५ ऑगस्ट) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि अजित पवार अजूनही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी घेतली. यामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असताना, काही वेळातच आपण असे बोललोच नाही, असे घूमजाव शरद पवार यांनी केले. आमच्या पक्षातील काही नेत्यांनी वेगळा मार्ग निवडला. ते सरकारमध्ये सहभागी...25 Aug 2023 / No Comment /

शरद पवारांचे तळ्यात-मळ्यात; म्हणे अजितदादा पक्षाचे नेते!

शरद पवारांचे तळ्यात-मळ्यात; म्हणे अजितदादा पक्षाचे नेते!मुंबई, (२४ ऑगस्ट) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवारांबाबतची भूमिका सध्या तळ्यात-मळ्यात दिसत आहे. माहितीनुसार, शुक्रवारी शरद पवारांनी सांगितले की, पक्षात कोणतीही फूट नाही आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पक्षाचे नेते राहतील. काही नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, पण याला पक्षात फूट म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे त्यांच्या जन्मगावी पत्रकारांशी...25 Aug 2023 / No Comment /

कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ, शीतगृह उभारणार

कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ, शीतगृह उभारणार– केंद्र सरकारच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, मुंबई, (२३ ऑगस्ट) – राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांसमोरील संकट लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये क्विंटल दराने नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे या ऐतिहासिक निर्णयासाठी आभार मानले. राज्यात कांदा साठविण्यासाठी कांदाचाळ आणि शीतगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील कांदा प्रश्नाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी...23 Aug 2023 / No Comment /

भाजपाचे ‘घर चलो अभियान’ विजयाचा महामंत्र: चंद्रशेखर बावनकुळे

भाजपाचे ‘घर चलो अभियान’ विजयाचा महामंत्र: चंद्रशेखर बावनकुळेवणी, (२१ ऑगस्ट) – महाविजय २०२४ अभियान हे महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून या समाजासाठी देशासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अतुलनीय काम केले आहे. ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना भेटून त्या त्या क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे अभियान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करीत आहे. ‘घर चलो अभियान’ हे आगामी २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीत विजयाचा महामंत्र आहे, असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते...21 Aug 2023 / No Comment /

‘टाटा’ म्हणजेच ट्रस्ट.. विश्वास

‘टाटा’ म्हणजेच ट्रस्ट.. विश्वासमुंबई, (१९ ऑगस्ट) – उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ’उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह...21 Aug 2023 / No Comment /