|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.99° C

कमाल तापमान : 28.95° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 3.37 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.88°C - 31.32°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.01°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.15°C - 31.41°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.67°C - 32.91°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.17°C - 33.14°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

29.18°C - 33.01°C

sky is clear

कांदा अनुदान रक्कम शेतकर्‍यांना लवकरच मिळणार

कांदा अनुदान रक्कम शेतकर्‍यांना लवकरच मिळणार-पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती, मुंबई, (१९ ऑगस्ट) – सन २०२३ या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रती क्विंटल रू.३५० प्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. याकरिता वित्त विभागाने पणन विभागास ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी वितरीत केला आहे. लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकर्‍यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल,...21 Aug 2023 / No Comment /

विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची : राज्यपाल

विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची : राज्यपालमुंबई, (१९ ऑगस्ट) – भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची होती. या राज्याने स्वातंत्र्यलढ्याला नेतृत्व दिले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे समारोप पर्व, ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज सायंकाळी राजभवनातील दरबार हॉल येथे ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’...21 Aug 2023 / No Comment /

जुना फोन विकताय, मग जाणार तुरुंगात

जुना फोन विकताय, मग जाणार तुरुंगातमुंबई, (१९ ऑगस्ट) – आपण आपले जुने फोन मित्र, कुटुंब किंवा ओळखीच्या लोकांना विकतो. तसेच, आपण स्मार्टफोन रीसेट करतो आणि नंतर तो एखाद्याला विकतो. त्या बदल्यात ते काही पैसे मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या या कृतीमुळे तुरुंगात जावे लागू शकते. वास्तविक जर तुम्ही कायदेशीर पुराव्याचा स्मार्टफोन विकला आणि त्या फोनवरून एखाद्याला चुकीचा संदेश किंवा धमकी पाठवली गेली. किंवा फोन फसवणूक, दहशतवादी कारवायांमध्ये वापरला जातो, तर पोलिस मोबाइलचा...21 Aug 2023 / No Comment /

शुक्रवारनंतर पावसाचे पुनरागमन

शुक्रवारनंतर पावसाचे पुनरागमनपुणे, (१७ ऑगस्ट) – जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात त्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात लवकरच पाऊस परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. पालघर, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर,...17 Aug 2023 / No Comment /

देवेंद्र फडणवीसांनी ११ महिन्यांत केल्या १,१४,४१४ स्वाक्षऱ्या

देवेंद्र फडणवीसांनी ११ महिन्यांत केल्या १,१४,४१४ स्वाक्षऱ्या– माहितीच्या अधिकारातून माहिती आली समोर, मुंबई, (१७ ऑगस्ट) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज येणार्या निवेदनावर ३४७ स्वाक्षर्या करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये १,१४,४१४ स्वाक्षर्या केल्या असल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात काही विशिष्ट नेते खूप कार्यक्षम आहेत. त्यांची प्रशासनावर खूप पकड आहे, वगैरे बोलबाला मराठी माध्यमे नेहमी करीत असतात. त्यांना विशिष्ट नेत्यांच्या पलीकडे बाकी कोणी फारसे कार्यक्षम दिसत नाही. पण,...17 Aug 2023 / No Comment /

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना पदके जाहीर

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना पदके जाहीर-३ अधिकार्यांना राष्ट्रपती पदक; ३३ पोलिसांना शौर्य, -अमरावतीच्या नाईकनवरे यांचा समावेश, नवी दिल्ली, (१४ ऑगस्ट) – पोलिस सेवेत उल्लेेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील प्रवीण सांळुके, विनय चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकार्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली. तसेच ३३ पोलिसांना शौर्य पदके आणि ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके असे राज्यातील एकूण ७६ पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहेत. जयंत नाईकनवरे अमरावतीचे आहेत. राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक आणि...14 Aug 2023 / No Comment /

सर्व शासकीय रुग्णालयांमधून आता नि:शुल्क उपचार

सर्व शासकीय रुग्णालयांमधून आता नि:शुल्क उपचार-१५ ऑगस्टपासून अंमलबजावणी, मुंबई, (१४ ऑगस्ट) – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरविण्यात येणार्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांत यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही. या सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत...14 Aug 2023 / No Comment /

महाविकास आघाडीत गोंधळ नाही : शरद पवार

महाविकास आघाडीत गोंधळ नाही : शरद पवार-‘इंडिया’ची मुंबईतील बैठक यशस्वी होईल, बारामती, (१४ ऑगस्ट) – अजित पवारांसोबत पुण्यात झालेल्या बैठकीच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये कोणताही गोंधळ नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. महाविकास आघाडी एकजूट आहे आणि मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे यशस्वी आयोजन केले जाईल, असे शरद पवार यांनी येथे पत्रकारांसोबत चर्चा करताना सांगितले. अजित पवार यांनी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे सरकारमध्ये २ जुलै रोजी सहभागी...14 Aug 2023 / No Comment /

राज्यातील १८६ बंदिवानांची स्वातंत्र्यदिनी होणार सुटका

राज्यातील १८६ बंदिवानांची स्वातंत्र्यदिनी होणार सुटकामुंबई, (१४ ऑगस्ट) – दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त तुरुंगांतून बंदिवानांची सुटका केली जाते. यंदाही १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी राज्याच्या विविध तुरुंगांतून बंदिवानांची सुटका करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंदिवानांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. माफीच्या तिसर्या टप्प्यानुसार, स्वातंत्र्यदिनी १८६ बंदिवानांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे. या आधी पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसर्या टप्प्यात...14 Aug 2023 / No Comment /

नागपुरात फडणवीस, कोल्हापुरात अजित पवार करणार ध्वजारोहण

नागपुरात फडणवीस, कोल्हापुरात अजित पवार करणार ध्वजारोहण– पुण्यात राज्यपालांच्या हस्ते, मुंबई, (१२ ऑगस्ट) – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस, नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अन्य जिल्हा ठिकाणी मंत्री तथा जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात...12 Aug 2023 / No Comment /

अवघ्या एका दिवसात घसरले टोमॅटोचे भाव

अवघ्या एका दिवसात घसरले टोमॅटोचे भावमुंबई , (११ ऑगस्ट) – सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी पण शेतकर्‍यांसाठी तितकीशी चांगली नाही, महाराष्ट्रातील काही मंडईंमध्ये टोमॅटोचे भाव तब्बल ३७ टक्क्यांनी कोसळले आहेत. एका वृत्तानुसार, महाराष्ट्रातील नाशिकमधील तीन मंडईंमध्ये, टोमॅटोच्या भावात केवळ एका दिवसात प्रति क्रेट ६५० रुपये किंवा ३७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. अहवालानुसार, टोमॅटोचे भाव प्रति क्रेट १,१०० रुपयांपर्यंत घसरले. ३ ऑगस्ट रोजी सरासरी किंमत प्रति क्रेट २,४०० रुपये होती. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे...11 Aug 2023 / No Comment /

नवाब मलिक १७ महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर

नवाब मलिक १७ महिन्यांनंतर तुरुंगाबाहेरमुंबई, (११ ऑगस्ट) – महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय आधारावर त्याला दोन महिन्यांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच वेळी, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनेही वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही. नवाब मलिक फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून तुरुंगात आहेत. १७ महिन्यांनंतर तो तुरुंगातून बाहेर येणार आहे. खरेतर, ईडीच्या चौकशीत वैद्यकीय कारणास्तव जामीन नाकारण्याच्या मुंबई...11 Aug 2023 / No Comment /