|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.45° C

कमाल तापमान : 31.81° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 53 %

वायू वेग : 4.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.81° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.09°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.84°C - 30.5°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.88°C - 30.57°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.07°C - 30.5°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.09°C - 31.79°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.08°C - 32.94°C

sky is clear

आंबेडकरांचे काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र

आंबेडकरांचे काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र– मविआ बैठकीचे ऐनवेळी निमंत्रण, मुंबई, (२५ जानेवारी) – गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला...26 Jan 2024 / No Comment /

४ ते ११ फेब्रुवारी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’

४ ते ११ फेब्रुवारी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’-विरोधी पक्ष कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा, -स्थानिक स्तरावरही पक्षप्रवेश घडवणार, नागपूर, (२५ जानेवारी) – भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ४ ते ११ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गाव/शहर चलो अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या अभियानात विरोधी पक्षातील नेते व पदाधिकार्यांची भेट घेतली जाणार असून स्थानिक स्तरावरही त्यांचे पक्षप्रवेश व्हावेत, असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या...26 Jan 2024 / No Comment /

उदयनिधी स्टॅलिनसोबत इंडि आघाडीत राहणे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

उदयनिधी स्टॅलिनसोबत इंडि आघाडीत राहणे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परखड सवाल, मुंबई, (२५ जानेवारी) – सनातन हिंदू धर्माला संपविण्याची उद्दाम भाषा करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये राहणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा परखड सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा वारंवार करीत आहेत. या विचारावरच जी इंडि आघाडी तयार झाली, त्या, बाळासाहेब ठाकरे यांचे...26 Jan 2024 / No Comment /

संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार

संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळ अयोध्येला जाणारमुंबई, (२४ जानेवारी) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे सदस्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रार्थना करणार आहेत, अशी माहिती एका अधिकार्‍याने बुधवारी दिली. ही भेट ५ फेब्रुवारीला होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह २९ सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग म्हणून सोमवारी अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करण्यात आले. अभिषेक सोहळ्याच्या एका...24 Jan 2024 / No Comment /

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेने जीवनाचे सार्थक झाले: सुधीर मुनगंटीवार

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेने जीवनाचे सार्थक झाले: सुधीर मुनगंटीवार*प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सामुहिक दर्शन, चंद्रपूर, (२२ जानेवारी) – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणीसाठी ‘सियावर रामचंद्र की जय’ म्हणत कारसेवेला जाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. आज प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेने जीवनाचे सार्थक झाले आहे. या क्षणाचा आनंद शब्दांमध्ये वर्णन करणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला....22 Jan 2024 / No Comment /

महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीरमुंबई, (१९ जानेवारी) – अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक दिनी २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. त्यांनी त्यांचे एक जुने पत्र सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक...19 Jan 2024 / No Comment /

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!मुंबई, (१५ जानेवारी) – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खर्‍या शिवसेनेबाबतच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाकडे आमदारांची संख्या जास्त असून पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे नेते असल्याचे सांगत सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सभापतींच्या निर्णयानंतरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...15 Jan 2024 / No Comment /

मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची?

मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची?– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार, मुंबई, (१५ जानेवारी) – उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी खरपूस समाचार घेतला. कुठे पंतप्रधान मोदी आणि कुठे तुम्ही? मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची, असा घणाघात शिंदे यांनी ठाकरेंवर चढविला. पंतप्रधान मोदी देशाला नव्या उंचीवर नेत आहेत. तुम्ही घरात बसून महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले म्हणून आम्ही तुम्हाला...15 Jan 2024 / No Comment /

मिलिंद देवरा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मिलिंद देवरा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश– राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेससोबतचे ५६ वर्षांचे नाते संपुष्टात, मुंबई, (१५ जानेवारी) – मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला. रविवारी सकाळी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेससोबतचे ५६ वर्षांचे नाते संपुष्टात आले. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे मोठे नेते होते. आपल्या वडिलांच्या अनुषंगाने मिलिंद...15 Jan 2024 / No Comment /

अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत निधन

अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत निधन-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, मुंबई, (१५ जानेवारी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. राजेश्वरीबेन या ६५ वर्षांच्या होत्या आणि त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांची अहमदाबादहून मुंबईतील रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शाह यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...15 Jan 2024 / No Comment /

मला प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार!: शरद पवार

मला प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार!: शरद पवारपुणे, (१३ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला होणार्‍या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण २२ जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. इंडी आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. एवढंच नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी नाशिक दौर्‍यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या...14 Jan 2024 / No Comment /

श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त भारतातील ठराविक विद्वान ज्योतिषांनी काढला

श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त भारतातील ठराविक विद्वान ज्योतिषांनी काढला– पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग, पुणे, (१३ जानेवारी) – उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी भारतातील ठराविक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटा ही समस्त मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे. श्रीराम जन्मभूमी...14 Jan 2024 / No Comment /