|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.65° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 74 %

वायू वेग : 2.63 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

28.05°C - 31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

28.3°C - 30.91°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.87°C - 30.83°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.13°C - 31.48°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.77°C - 33.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.13°C - 32.78°C

sky is clear

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात केली पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात केली पूजानाशिक, (१२ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. येथे त्यांनी सर्वप्रथम नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यानंतर त्यांनी श्री काळाराम मंदिर येथेही पूजा केली. पंतप्रधान मोदींनी येथे वाद्य (मंजिरा) देखील वाजवले. यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काळाराम...12 Jan 2024 / No Comment /

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच्या हस्ते ’अटल सेतू’चे थाटात उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच्या हस्ते ’अटल सेतू’चे थाटात उद्घाटन– २ तासांचे अंतर आता १५ मिनिटांत पूर्ण, मुंबई, (१२ जानेवारी) – पंतप्रधान मोदींनी आज अटल सेतूचे उद्घाटन केले. मुंबईकरांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान मोदींनी आज अटल सेतूचे उद्घाटन केले. डिसेंबर २०१६ मध्ये पीएम मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. हा भारतातील सर्वात लांब पूल आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा पूल सुमारे २१.८ किमी लांबीचा सहा लेन पूल आहे, ज्याची लांबी समुद्रावर सुमारे १६.५...12 Jan 2024 / No Comment /

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना!

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना!– विधानसभाध्यक्ष अ‍ॅड. नार्वेकरांनी दिला निकाल, – उद्धव ठाकरे गटाला धक्का, मुंबई, (१० जानेवारी) – राज्याच्या राजकारणातील मागील दीड वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेला १६ आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी लागला. यात शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोन्ही गटांचे आमदार त्यांनी पात्र ठरवले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जबर हादरा बसला आहे. कित्येक महिन्यांपासून १६ आमदार अपात्र होणार, सरकार पडणार असे दावे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केले जात होते....11 Jan 2024 / No Comment /

राम मंदिर प्रतिष्ठापना, शिवजयंतीनिमित्त मोफत आनंदाचा शिधा

राम मंदिर प्रतिष्ठापना, शिवजयंतीनिमित्त मोफत आनंदाचा शिधा– सत्यशोधक सिनेमा करमुक्त, – मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय, मुंबई, (१० जानेवारी) – अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल...10 Jan 2024 / No Comment /

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयमुंबई, (१० जानेवारी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. याव्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा...10 Jan 2024 / No Comment /

यापुढे निवडणूक लढणार नाही; शरद पवार यांची घोषणा

यापुढे निवडणूक लढणार नाही; शरद पवार यांची घोषणामुंबई, (१० जानेवारी) – सध्याची खासदारकीची कारकीर्द संपायला अजून अडीच वर्षे आहे. ती संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी मुंबईत केली. येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार शरद पवार यांच्या वयावरून सातत्याने टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी काही जण ८४ वर्षांचे झाले तरी थांबत नाहीत, असे म्हणत शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विचारण्यात...10 Jan 2024 / No Comment /

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेपमुंबई, (०९ जानेवारी) – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी (रविवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अपात्रतेच्या...9 Jan 2024 / No Comment /

ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल : मिलिंद देवरा

ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल : मिलिंद देवरामुंबई, (०७ जानेवारी) – महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कुणीही सार्वजनिक वक्तव्य कींवा दावे करू नये, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी ठाकरे गटातील नेत्यांना दिला आहे. ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, असे देवरा म्हणाले. माझे मतदार, कार्यकर्ते, समर्थक मला सकाळपासून कॉल करीत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करीत आहे, त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला...7 Jan 2024 / No Comment /

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाहीपंढरपूर, (०६ जानेवारी) – काही झाले तरी आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. अशी निर्धारी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात जाहीर केली. शनिवारी पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी समाजातील महत्त्वाचे नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. हा पांडुंरग सर्वांचा आहे. मी मागील वेळी सर्व संतांची नावे वाचून दाखवली होती. या सर्व संतांचे म्हणणे एकच आहे. सर्व एकत्र येऊ. निवडणूक आली की सर्व...6 Jan 2024 / No Comment /

रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीमुंबई, (०४ जानेवारी) – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची गुरुवारी राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. संभाव्य पोलिस महासंचालकपदाच्या सेवा ज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलिस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार २९ डिसेंबर...4 Jan 2024 / No Comment /

१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या किंवा नव्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या किंवा नव्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्यायमुंबई, (०४ जानेवारी) – शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी कींवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या किंवा नव्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासनाने दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले असून, कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडणे ऐच्छिक असणार आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी...4 Jan 2024 / No Comment /

लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार: चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार: चंद्रशेखर बावनकुळे– महायुतीचे १४ जानेवारी रोजी राज्यभर मेळावे: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबई, (०४ जानेवारी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील ११ घटक पक्षांचे १४ जानेवारी रोजी राज्यात जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक‘म) दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,...4 Jan 2024 / No Comment /