Home » युवा भरारी » इंटरव्ह्यू : सेल्फ मार्केटिंग

इंटरव्ह्यू : सेल्फ मार्केटिंग

आपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर करावे असे सर्वांनाच वाटत असते. लहानपणापासून तशी संधी सगळे शोधत असतात, त्यासाठी प्रयत्न करतअसतात.कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणे आज सोपे राहिलेले नाही.प्रत्येक क्षेत्रात आज प्रचंड प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे जॉब मिळविण्यासाठी चांगल्या शिक्षणासोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडेही आज लक्ष द्यावे लागते. त्यातल्या त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इंटरव्ह्यूला सामोरे जाणे.इंटरव्ह्यू म्हटले की, फाड फाड इंग्रजीमध्ये मोठे मोठे शब्द वापरून बोलणे,टाय सूट घालणे इत्यादी असा सहसा इंटरव्ह्यूबद्दल दृष्टिकोन असतो.इंटरव्ह्यू म्हणजे नुसते एवढेच नसून,त्याची खरी परिभाषा ज्याने ओळखली तो नक्कीच इंटरव्ह्यूमध्ये पास होईल.
इंटरव्ह्यू म्हणजे?
इंटरव्ह्यू म्हणजे ‘सेल्फ मार्केटिंग’ : इंग्रजीमध्ये म्हणतात, ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ इंटरव्ह्यू देखील असाच आहे. तुमच्यात असलेला हजरजबाबीपणा,तुमच्याकडे असलेला आत्मविश्‍वास, तुमच्यात कुठलेही काम करण्याची असलेली जिद्द, चिकाटी, तुमच्यात असलेली नम्रता व सोबत ज्या जागेकरता अर्ज केला आहे त्या विषयाचे तुम्हाला असलेले ज्ञान आणि तुमचे जनरल नॉलेज हे सर्व समोरच्याला पटवून देणे व त्याचा विश्‍वास जिंकणे म्हणजे इंटरव्ह्यू.
इंटरव्ह्यू म्हणजे आलेली संधी असे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि संधी ही नेहमी मिळत नसते, त्यामुळे इंटरव्ह्यू देताना आपला चांगला प्रभाव पाडणे आवश्यक आहे.इंटरव्ह्यूला सामोरे जाण्यापूर्वी काही ‘शिष्टाचार’ लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. आपण या इंटरव्ह्यूमध्ये हमखास यशस्वी होऊ हे इंटरव्ह्यू देताना व देण्यापूर्वी मनात सतत आणत राहणे.
२. अर्ज : सगळ्यात पहिली तुमची छाप पडते ती तुमच्या अर्जामधून. अर्ज करताना अर्जाची झेरॉक्स प्रत लावू नये.अर्ज शक्यतोवर कॉम्प्युटरवर प्रिंट करून त्यावर स्वाक्षरी करून सादर करावा.
३. बायोडेटा : बायोडेटा म्हणजे स्वत:चे सादरीकरण असते. सादरीकरण म्हणजे स्वत:ची ओळख करून देणे.तुमच्या बायोडेटामुळे तुम्ही इंटरव्ह्यू रूममध्ये जाण्यापूर्वी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पुसटसे चित्र इंटरव्ह्यू घेणार्‍यासमोर निर्माण करत असता. बायोडेटामध्ये सर्व माहिती सत्य असावी. बायोडेटा हा ए ४ आकाराच्या कागदावर सादर करावा. बायोडेटा हा नेहमी स्वाक्षरी करूनच सादर करावा.
४. पोशाख : ज्या पदाकरता आपण इंटरव्ह्यूला जात असाल त्या पदाला अनुरूप तुमचा पोशाख असला पाहिजे. शक्य असल्यास लाईट कलरचे कपडे घालावे. कपडे स्वच्छ धुतलेले व प्रेस केलेले असावेत. खिशाला एक स्मूथ चालेल असा पेन असावा.
५. पादत्राणे पॉलिश केलेली असावीत.
६ मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडमध्ये ठेवावा. इंटरव्ह्यू सुरू असताना वारंवार मोबाईल काढून पाहू नये.
७. सुगंधी अत्तर किंवा सुगंधी तेल लावून जाऊ नये.
८. इंटरव्ह्यू कॅबिनमध्ये जाताना-येताना दरवाजाचा आवाज होणार नाही याची काळजी घ्या.
९. इंटरव्ह्यू कॅबिनमध्ये आत जाण्यापूर्वी दरवाजा नॉक करणे व दरवाजा हळूच किंचित उघडून, ‘मे आय कम इन सर/मॅडम?’ विचारणे.
१०. बसायला सांगितल्याशिवाय बसू नये. खुर्चीत ताठ बसावे आणि दोन्ही पाय जमिनीवर स्थिर ठेवावे व व्हीलचेअर असल्यास तिची मुव्हमेंट करू नये. दोन्ही पाय फोल्ड करून एक पाय हलकासा हलवणे किंवा शुज काढून बसावे. पाय जमिनीवर घासू नये.
११. तुमची देहबोली बोलकी असावी. ज्यामधून समोरच्याला हे पटवणे आवश्यक आहे की, तुमच्यात आत्मविश्‍वास हा भरपूर असून, कोणतेही काम करण्याची तत्परता तुमच्यात आहे.
१२. चेहर्‍यावर स्मितहास्य आणि बोलीमध्ये मधुरता ठेवून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देणे.
१३. तुम्ही समोरच्या माणसाचे बोलणे नीट ऐकून घेता व तुम्ही एक आशावादी आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आहे हे समोरच्याला पटवून देता आले पाहिजे.
१४. इंटरव्ह्यू कॅबिनमध्ये गेल्यावर तिथे उपस्थित सर्व व्यक्तींकडे बघून अभिवादन करावे. कॅबिनमध्ये महिला अधिकारी असल्यास पहिले गुडमॉर्निंग मॅडम आणि नंतर गुडमॉर्निंग सर म्हणावे. कारण आपल्यासाठी सर्व व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. काही वेळेला इंटरव्ह्यू पॅनलमधील अति महत्त्वाची व्यक्ती एखाद्या कोपर्‍यात बसलेली असू शकते.
१५. विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना प्रश्‍न विचारणार्‍या व्यक्तीकडे बघून उत्तर देत असतानाच इतर व्यक्तींकडे बघून नजर फिरवणे.
१६. हात वर करत उत्तर देऊ नका आणि हातातले कागद टेबलवर ठेवू नयेत.
१७. विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर येत नसल्यास सॉरी येत नाही हे स्पष्ट सांगा. जुळवाजुळव करून उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका.
१८. विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना दोन्ही हात स्थिर ठेवावे. बोटांची नखे एकमेकांना घासणे, नख खाणे, घड्याळीच्या बेल्टसोबत खेळणे, बोटे मोडणे असले कुठलेही प्रकार करू नयेत.
१९. इंटरव्ह्यू संपल्यानंतर कॅबिनच्या बाहेर निघण्यापूर्वी चेअर ज्या जागेवर होती तेथे पूर्वीसारखी व्यवस्थित ठेवणे व हे करताना थँक यू मॅडम/सर म्हणून दरवाजाचा आवाज होणार नाही, ही काळजी घेऊन बाहेर पडणे.
वरील सर्व शिष्टाचार तुम्ही परिणामकारकपणे साधण्याचे तंत्र जर अवगत करू शकलात, तर आयुष्यात तुम्हाला मोठी बाजी मारता येऊ शकेल व तुम्ही एक यशस्वी व्यक्तिमत्त्व बनू शकता. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला यश लाभावे आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही यशस्वी व्हावे, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.
कल्पेश कुळकर्णी

Short URL: https://vrittabharati.in/?p=5000

Posted by on May 19 2013. Filed under युवा भरारी. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in युवा भरारी (12 of 28 articles)


मित्रहो, मागील सायबर कट्ट्याद्वारे आपण ‘इंटरनेटवर राज्य कुणाचे?’ या विषयावर काही माहिती मिळवली.तो मजकूर आपल्या वाचनात येईपर्यंत अजून एक धक्कादायक ...

×