Home » ज.काश्मीर, राज्य » शरीफांचे सय्यद गिलानींना निमंत्रण

शरीफांचे सय्यद गिलानींना निमंत्रण

Pakistan Prime Minister Nawaz Sharifश्रीनगर, [११ ऑक्टोबर] – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हुर्रीयत कॉन्फरन्सचे (जी) अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांना पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. पाक उच्यायुक्त अब्दुल बासित यांनी शनिवारी गिलानी यांना नवी दिल्लीतील निवासस्थानी बोलावले आणि नवाझ शरीफ यांचे निमंत्रण पत्र दिल्याचे हुर्रियतने म्हटले आहे.
गिलानी यांचा दृढनिश्‍चय, स्पष्टवक्तपेणा आणि कुर्बानी यांचा आदर करीत नवाझ शरीफ यांनी पाकमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. गिलानी यांचे चरित्र आणि काम काश्मीरमधील येणार्‍या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पत्रात म्हटले असल्याचे हुर्रीयतच्या प्रवक्त्याने सांगितले. शरीफ यांचे निमंत्रण गिलानी यांनी स्वीकारले आहे. अल्लानंतर पाकिस्तानच काश्मिरी जनतेसाठी आशेचा किरण आहे. पाक काश्मीर मुद्यावर समर्थन करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देतो असेही हुर्रीयतने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25097

Posted by on Oct 11 2015. Filed under ज.काश्मीर, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, राज्य (212 of 418 articles)


=पंतप्रधानांची जोरदार टीका= मुंगेर, [८ ऑक्टोबर] - पाच टप्प्यांत होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२ ऑक्टोबरला होणार्‍या मतदानासाठी आता ...

×