|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.18° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 6.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.23°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी दिला राजीनामा

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी दिला राजीनामाकोलकाता, (०५ मार्च) – कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी म्हणजेच आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे. याशिवाय राजीनाम्याच्या प्रती मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवग्ननम यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यासह अनेक प्रकरणात न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय दिले. विशेष म्हणजे गंगोपाध्याय या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते, मात्र...6 Mar 2024 / No Comment /

ते म्हणतात आधी कुटुंब, मी म्हणतो आधी देश!

ते म्हणतात आधी कुटुंब, मी म्हणतो आधी देश!– ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार, हैदराबाद, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील संगारेड्डी येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आणि ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, तर माझ्यासाठी देश प्रथम आहे. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबही...6 Mar 2024 / No Comment /

पेपर लीक प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई

पेपर लीक प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाईलखनऊ, (०५ मार्च) – यूपी पोलीस भरती परीक्षा लीक प्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. यूपी पोलीस भरती बोर्डाच्या अध्यक्षांना हटवण्यात आले आहे. रिक्रूटमेंट बोर्डाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता राजवी कृष्णा यांच्याकडे भरती मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरकारने पोलीस भरती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवून त्यांना प्रतीक्षा यादीत टाकले आहे. १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव कृष्णा यांना आता भरती मंडळाची...6 Mar 2024 / No Comment /

पंतप्रधानांनी घेतली वैजयंतीमाला यांची भेट

पंतप्रधानांनी घेतली वैजयंतीमाला यांची भेटचेन्नई, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री वैजयंतीमाला यांची भेट घेतली. अभिनेत्रीसोबत झालेल्या भेटीची माहिती खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये वैजयंतीमाला यांच्या कामगिरीचेही कौतुक केले. शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान वैजयंतीमाला यांच्याशी बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रीसोबतचे फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, चेन्नईमध्ये वैजयंतीमाला यांना भेटून आनंद झाला. अलीकडेच त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल...6 Mar 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकीयादगिरी, (०५ मार्च) – कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात राहणार्‍या एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरोपीने धमकी दिली आहे की, केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर तो पंतप्रधान मोदींना मारून टाकेल. व्हिडिओमध्ये...6 Mar 2024 / No Comment /

मध्यप्रदेशातील सर्व जागा भाजपा जिंकेल

मध्यप्रदेशातील सर्व जागा भाजपा जिंकेल– शिवराजसिंह चौहान यांचा विश्वास, भोपाळ, (०४ मार्च) – भाजपा आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेशातील सर्व २९ जागा जिंकेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांना विदिशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशातील लोकांच्या हृदयात आहेत. भाजपा सर्व २९ जागा जिंकेल. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवू, असे चौहान यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पारचा...4 Mar 2024 / No Comment /

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेत

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेतहैदराबाद, (०३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यावेळी भाजपाने तेलंगणातील प्रसिद्ध हैदराबाद मतदारसंघावर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. हैदराबादची जागा १८८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. तो ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार...3 Mar 2024 / No Comment /

बंगळुरू स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात; हुबळी-धारवाड येथे कारवाई

बंगळुरू स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात; हुबळी-धारवाड येथे कारवाईबंगळुरू, (०२ मार्च) – बंगळुरूच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी कमी तीव्रतेच्या झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी शनिवारी दिली. या प्रकरणाचा तपास करणार्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने धारवाड, हुबळी आणि बंगळुरू येथून चार जणांना उचलले. आयईडीमुळे रामेश्वरम् कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या स्फोटात दहा जण जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी वेगात केली जात आहे, असे बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले....3 Mar 2024 / No Comment /

सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश

सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश– दिल्ली एलजीने केली कारवाई, नवी दिल्ली, (०२ मार्च) – दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तिहार तुरुंगात बंदिस्त गुंड मुकेश चंद्रशेखर याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तत्कालीन तुरुंगमंत्री जैन यांच्याविरुद्ध तपास करण्याचे आदेश उपराज्यपालांनी दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी आरोप केला होता की, तिहार तुरुंगाचे तत्कालीन महासंचालक आणि गृह विभाग हाताळणारे सत्येंद्र जैन यांनी संरक्षण मनी म्हणून त्यांच्याकडून...3 Mar 2024 / No Comment /

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमार

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमारऔरंगाबाद, (०२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौर्‍यावर आहेत. या दरम्यान सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादला पोहोचले, जिथे त्यांनी मंचावरून २१ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकास योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, बिहारमध्ये विकास योजनांचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान मोदींकडे बोट दाखवत नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही खूप दिवसांनी आला आहात,...3 Mar 2024 / No Comment /

दिल्लीतील सुनेहरी बाग मशीद हटवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या

दिल्लीतील सुनेहरी बाग मशीद हटवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्यानवी दिल्ली, (०१ मार्च) – राजधानी दिल्लीत एकामागून एक जुन्या मशिदी पाडण्याचा निर्णय घेतला जात आहे. आता दीडशे वर्ष जुन्या मशिदीवर बुलडोझर वापरण्याची पाळी आली आहे. नवी दिल्ली नगरपरिषद म्हणजेच एनडीएमसी ने दिल्लीतील सुनेहरी बाग मशीद हटवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या. लोक काही सूचना देण्यापूर्वीच मशिदीचे इमाम दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणावर २८ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनेहरी बाग मशीद पाडण्याचा मुद्दा हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी म्हणजेच एचसीसीच्या शिफारशीसाठी...1 Mar 2024 / No Comment /

निवडणुकीपूर्वी तृणमूलच्या पडू लागल्या विकेट!

निवडणुकीपूर्वी तृणमूलच्या पडू लागल्या विकेट!कोलकाता, (०१ मार्च) – पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी बंडखोर भूमिका स्वीकारली आहे. त्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बायोमधून तृणमूलची ओळखही काढून टाकली आहे. ते टीएमसी प्रवक्ते तसेच पक्षाचे सरचिटणीस होते. एक्स वरील त्यांच्या नवीन परिचयात त्यांनी स्वत:चे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून वर्णन केले आहे. कुणाल घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाच्या एका भागावर नाराजी व्यक्त करत कोणाचेही नाव न घेता आपल्या अधिकार्‍यावर लिहिले. ममता...1 Mar 2024 / No Comment /