|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.51° C

कमाल तापमान : 28.94° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 2.99 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.94° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.24°C - 30.18°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.16°C - 30.18°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.76°C - 28.89°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.48°C - 29.11°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.32°C - 28.94°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.07°C - 29.18°C

sky is clear

उत्तर प्रदेशमध्ये ७० लोकांनी स्वीकारला हिंदू धर्म

उत्तर प्रदेशमध्ये ७० लोकांनी स्वीकारला हिंदू धर्ममुझफ्फरनगर, (२४ सप्टेंबर) – महंत स्वामी यशवीर जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मुझफ्फरनगर जिल्ह्यातील १० मुस्लिम कुटुंबातील ७० सदस्यांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बगरा येथे असलेल्या योग साधना यशवीर आश्रमात शुद्ध यज्ञात गायत्री मंत्रांसह यज्ञ करून हिंदू धर्म स्वीकारला. या कुटुंबातील सर्व ७० सदस्यांची नावेही बदलण्यात आली आहेत. आता नाहिदला अरविंद कुमार, नाझियाला कविता आणि गुलशनला अक्षय कुमार असे संबोधले जाईल. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची नवीन नावे ठेवण्यात आली आहेत. योग...25 Sep 2023 / No Comment /

नैनिताल, उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचे भीषण चित्र

नैनिताल, उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचे भीषण चित्रनैनिताल, (२४ सप्टेंबर) – उत्तराखंडमधील नैनितालमधील मल्लीताल येथील चारटन लॉज भागात एक दोन मजली घर भूस्खलनाने कोसळले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही दरड कोसळल्याने घराची पडझड झाल्यानंतर आजूबाजूच्या घरांना भेगा पडल्या आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूस्खलनाचे एक कारण म्हणजे परिसरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम हे देखील मानले जात आहे, ज्यामध्ये जेसीबीसह जड ड्रिलर मशीनचा वापर केला जात आहे. प्रशासन आणि पोलीस धोक्यात असलेली...24 Sep 2023 / No Comment /

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा गौरव गोगोईंवर मानहानीचा खटला

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा गौरव गोगोईंवर मानहानीचा खटला-अन्न प्रक्रिया प्रकल्पाबाबत खोटे आरोप, गुवाहाटी, (२३ सप्टेंबर) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. रिनिकी यांचे वकील देवजित सैकिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, शुक्रवारी कामरूप महानगर दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सैकिया यांनी सांगितले की, माझ्या अशिलाने गौरव गोगोई यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. अनुदान मिळण्यासाठी आम्ही...23 Sep 2023 / No Comment /

सचिनने पीएम मोदींना भेट दिली ’टीम इंडियाची जर्सी’

सचिनने पीएम मोदींना भेट दिली ’टीम इंडियाची जर्सी’वाराणसी, (२३ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ बनारसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी भारतीय क्रिकेटमधील काही दिग्गज स्टार्स उपस्थित होते. सचिन तेंडुलकरनेही पीएम मोदींना टीम इंडियाची जर्सी दिली आणि त्यावर एक महत्त्वाचे नाव लिहिले होते. बनारसमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे उत्तर प्रदेशातील तिसरे स्टेडियम असेल. यावेळी माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावस्कर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशचे...23 Sep 2023 / No Comment /

चंद्राबाबू नायडू यांची सीआयडी कडून चौकशी

चंद्राबाबू नायडू यांची सीआयडी कडून चौकशी-राजमहेंद्रवरम कारागृहाबाहेर सुरक्षा वाढवली, विजयवाडा, (२३ सप्टेंबर) – कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकार्‍यांनी शनिवारी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांची केंद्रीय कारागृहात चौकशी सुरू केली. नायडूंच्या चौकशीसाठी कारागृहाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत आहेत विजयवाडा येथील लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो न्यायालयाने शुक्रवारी ७३ वर्षीय नायडू यांना पुढील चौकशीसाठी दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत पाठवले. नायडू...23 Sep 2023 / No Comment /

देवेगौडा यांचा जद (सेक्युलर) रालोआत सहभागी

देवेगौडा यांचा जद (सेक्युलर) रालोआत सहभागी-कर्नाटकात भाजपाची ताकद वाढणार, नवी दिल्ली, (२३ सप्टेंबर) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कर्नाटकात भाजपाची ताकद वाढणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर अर्थात जद एस हा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला. स्वत: देवेगौडा यांनी शुक्रवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली. पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपाचे...23 Sep 2023 / No Comment /

राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस सरकार येणार, ३० वर्षांचा इतिहास बदलणार: सचिन पायलट

राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस सरकार येणार, ३० वर्षांचा इतिहास बदलणार: सचिन पायलटजयपूर, (२३ सप्टेंबर) – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी आज शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी जयपूरमधील मानसरोवर येथे काँग्रेसच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी केली. काँग्रेस कार्यालयाची पायाभरणी केल्यानंतर त्यांनी जाहीर सभेलाही संबोधित केले. यादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी जाहीर सभेला संबोधित करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी समेट करण्याचे संकेतही दिले. नवीन इमारतीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारेल, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांना...23 Sep 2023 / No Comment /

सुकमातील सात गावे पुन्हा उजळली

सुकमातील सात गावे पुन्हा उजळली– नक्षलवाद्यांनी तोडला होता वीजपुरवठा, रायपूर, (२३ सप्टेंबर) – नक्षलवाद्यांनी पायाभूत सुविधांचे नुकसान केल्यानंतर सुकमा जिल्ह्यातील सात दुर्गम गावांतील ३४२ कुटुंबांचा वीजपुरवठा सुमारे २५ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात हैदोस घालून विजेचे खांब आणि इतर पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आणि स्थानिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले होते. डब्बाकोंटा, पिडमेल, एकलगुडा, दुरमांगू, तुंबांगू, सिंगनपॅड आणि डोकपाड या सात गावांना या आठवड्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा करण्यात आला...23 Sep 2023 / No Comment /

चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत वाढ

चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत वाढअमरावती, (२२ सप्टेंबर) – येथील न्यायालयाने शुक्रवारी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त महाधिवक्ता पोन्नावोलू सुधाकर रेड्डी यांनी सांगितले की, येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, एफआयआर रद्द करण्याची विनंती करणार्‍या नायडू यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी १.३० वाजता सुनावणी होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांना...22 Sep 2023 / No Comment /

जगाला शांतता, एकतेचा संदेश देणार एकात्मतेची मूर्ती: मुख्यमंत्री चौहान

जगाला शांतता, एकतेचा संदेश देणार एकात्मतेची मूर्ती: मुख्यमंत्री चौहान– ओंकारेश्वर येथील आद्य शंकराचार्यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे अनावरण, भोपाळ, (२१ सप्टेंबर) – मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे मांधाता पर्वतावर आदिगुरू शंकराचार्यांच्या १०८ फूट उंचीच्या अष्टधातूपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीचे अनावरण संत-महंतांच्या उपस्थितीत केले. २,२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या अद्वैत-नगरीची (एकात्म धाम) त्यांनी विधिवत पायाभरणीही केली. खंडवा जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री आणि सांस्कृतिक, पर्यटन, धार्मिक ट्रस्ट मंत्री उषा ठाकूर, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज,...21 Sep 2023 / No Comment /

आदि शंकराचार्यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

आदि शंकराचार्यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरणओंकारेश्वर, (२१ सप्टेंबर) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी आदि शंकराचार्यांच्या १०८ फूट उंचीच्या ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे अनावरण केले आणि ओंकारेश्वरमध्ये अद्वैत लोकाची पायाभरणी केली. याआधी त्यांनी २१कुंडिया हवनात यज्ञ केला. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून म्हटले की, मी आदिगुरु शंकराचार्यजींच्या चरणी वारंवार प्रणाम करतो आणि या भव्य कार्यक्रमाला आल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तत्पूर्वी आज मुख्यमंत्र्यांनी येथे आंब्याचे रोपण केले. त्यांनी ट्विट करून लिहिले की, आदिगुरु शंकराच्या...21 Sep 2023 / No Comment /

हत्या कॅनडात, छापे पंजाबात

हत्या कॅनडात, छापे पंजाबात-गुंड गोल्डी बराडच्या ठिकाणांवर छापे, चंदीगढ, (२१ सप्टेंबर) – गँगस्टर गोल्डी बराडच्या जवळपास एक हजार गुंडांना पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी छापेमारी सुरू करीत आहे. यासाठी पाच हजारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. या दरम्यान कॅनडातील पिनिपेग सिटीत फरार गँगस्टर सुखदूलसिंग ऊर्फ सुक्खा दुनुकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली. खलिस्तान समर्थक सुक्खाची हत्या लक्षात घेता पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. प्रत्येक संशयितावर करडी नजर...21 Sep 2023 / No Comment /