Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » एमिसॅटसह २८ विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

एमिसॅटसह २८ विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

•पीएसएलव्ही-सी ४५ ची ४७ वी मोहीम फत्ते,

Emisat Satelite Isro

Emisat Satelite Isro

श्रीहरिकोटा, १ एप्रिल – इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज सोमवारी सकाळी ९.२७ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह भारताचा लष्करी उपग्रह एमिसॅट आणि २८ विदेशी उपग्रह अंतराळात पाठवून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अतिशय कठीण स्वरूपाची ही मोहीम इस्रोने फत्ते केली आहे.
पीएसएलव्ही-सी ४५ ने आपल्या ४७ व्या मोहिमेत ४३६ किलो वजनाच्या एमिसॅटसह लिथुनिया, स्पेन, स्वित्झर्लण्ड आणि अमेरिकेचे २८ उपग्रह त्यांच्या कक्षेत पाठवले.
या यशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इस्रोने अंतराळातील विविध कक्षेत उपग्रह पाठवण्याचे कौशल्य साध्य केले आहे सोबतच समुद्री उपग्रहाचा प्रयोगही यशस्वी केला आहे. एमिसॅट उपग्रहाची निर्मिती विद्युतचुंबकीय मोजमापासाठी केली असली, तरी या उपग्रहाबाबत माहिती देण्यास इस्रोने नकार दिला आहे.
श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी ४५ च्या माध्यमातून एमिसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
पीएसएलव्ही-सी ४५ रॉकेटने आज एमिसॅट उपग्रह ७४८ किलोमीटरच्या कक्षेत, तर विदेशी उपग्रहांना ५०४ किलोमीटरच्या कक्षेत यशस्वीपणे पाठवले, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये दिली.
मुख्य कार्य पूर्ण झाल्यावर पीएस-४ (चौथा टप्पा) कक्षीय प्रयोगासाठी ४८५ किलोमीटर कक्षेच्या दिशेने प्रवास करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, यावेळी तीन अभिनव प्रयोग केले जात आहेत. एमिसॅट, हौशी रेडिओ उपग्रह सहकार्य आणि भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह असे हे तीन अभिनव प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
कित्येक गोष्टी प्रथमच करण्यात आल्याने इस्रोसाठी आजची मोहीम ही खास होती, असेही त्यांनी सांगितले. पीएसएलव्हीच्या जुळवणीत प्रथमच चार पट्ट्यांतील मोटर्सचा वापर करण्यात आला. पीएसएलव्हीने प्रथमच एका उड्डाणात तीन कक्षेत उपग्रह सोडले, प्रयोगात्मक मंचासाठी प्रथमच पीएस-४चा (चौथा टप्पा) वापर करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
पीएसएलव्ही-सी ४५ च्या मोहिमेत उद्योग क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या मोहिमेसाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त उपकरणांचा पुरवठा औद्योगिक क्षेत्रांनी केला आहे. केवळ इतकेच नव्हे, तर उपग्रहाचे ६० ते ७० टक्के भाग उद्योग क्षेत्राने तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. उपग्रहाची महत्त्वपूर्ण उपकरणे बंगळुरू येथील एका कंपनीने तयार केल्याची माहिती देताना, त्यांनी उद्योगक्षेत्राचे आभार मानले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=35554

Posted by on Apr 2 2019. Filed under राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (3 of 1128 articles)


=•चिदम्बरम् यांची कबुली • =निवडणुकीला लागणारा पैसाच भ्रष्टाचाराचे मूळ, मुंबई, १९ नोव्हेंबर - संपुआ-२ सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची प्रतिमा ...

×