|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.01° C

कमाल तापमान : 28.66° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.66° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.38°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बांधणार विशेष बोगदा

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बांधणार विशेष बोगदा– ८ लाख भाविक घेऊ शकतील दर्शन, इंदूर, (०३ ऑक्टोबर) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर संकुलात विशेष बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या निर्माणानंतर सुमारे ८ लाख भाविक सहजपणे परिसराला भेट देऊ शकणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ५ ऑक्टोबर रोजी २४२.३५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री महाकाल महालोक कॉरिडॉरच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण करतील. महाकालेश्वर मंदिरात दररोज किमान दोन लाख भाविक दर्शनाला येतात. मात्र, सणासुदीच्या...3 Oct 2023 / No Comment /

खलिस्तानी आणि दहशतवाद्यांच्या अडचणी वाढणार : अमित शाह

खलिस्तानी आणि दहशतवाद्यांच्या अडचणी वाढणार : अमित शाहनवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खलिस्तानी आणि दहशतवादी कारवाया तसेच गुंडांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने एक मोठी बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशभरातील दहशतवादविरोधी दलाचे (एटीएस) प्रमुख सहभागी होणार आहेत. ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार्‍या या महत्त्वपूर्ण बैठकीत गृहमंत्री शाह देशभरातील एटीएस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. एनआयएची बैठक ’अँटी टेरर कॉन्फरन्स २०२३’ या नावाने होत असून, या बैठकीत खलिस्तानी-दहशतवादी आणि...3 Oct 2023 / No Comment /

भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता ६.२

भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता ६.२नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – आज बुधवारी दुपारी दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये १० सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या प्राथमिक अहवालानुसार, नेपाळमध्ये दुपारी २:२५ वाजता ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नेपाळमध्ये २० मिनिटांत दोन जोरदार भूकंप झाले, पहिला भूकंप ४.२ रिश्टर स्केलचा होता, दुसरा ६.२ रिश्टर स्केलचा होता. भारतासह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले....3 Oct 2023 / No Comment /

भूकंप झाल्यास काय करावे आणि काय करू नये

भूकंप झाल्यास काय करावे आणि काय करू नयेनवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या प्राथमिक अहवालानुसार, नेपाळमध्ये दुपारी २:२५ वाजता ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचे झटके जाणवले. नेपाळमध्ये २० मिनिटांत दोन जोरदार भूकंप झाले, पहिला भूकंप ४.२ रिश्टर स्केलचा होता, दुसरा ६.२ रिश्टर स्केलचा होता. भारतासह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. कश्यामुळे होतो भूकंप पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे...3 Oct 2023 / No Comment /

जगातील दुसरी मलेरियाविरोधी लसीला डब्ल्यूएचओची मान्यता

जगातील दुसरी मलेरियाविरोधी लसीला डब्ल्यूएचओची मान्यता– सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली माहिती, नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील दुसर्या मलेरियाच्या लसीला मान्यता दिली आहे, ज्यामुळे जगातील इतर अशा लसींचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली. सीरमने म्हटले आहे की, लसीच्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचणीशी संबंधित डेटाच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आणि चाचण्यांदरम्यान ही लस चार देशांमध्ये प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सीरमने एका...3 Oct 2023 / No Comment /

८ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

८ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यतानवी दिल्ली, (०२ ऑक्टोबर) – देशातील काही राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने पुढील २४ तासांत बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशामध्ये २ ऑक्टोबरला म्हणजेच आज मुसळधार पाऊस पडू शकतो. तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये ३ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल. त्याचवेळी महाराष्ट्र आणि गोव्यात पावसाची शक्यता आहे. या...2 Oct 2023 / No Comment /

व्हॉट्स अ‍ॅपने ऑगस्टमध्ये बंद केली ७४ लाख खाती

व्हॉट्स अ‍ॅपने ऑगस्टमध्ये बंद केली ७४ लाख खातीनवी दिल्ली, (०२ ऑक्टोबर) – माहिती तंत्रज्ञान नियम लक्षात घेता मेटा कंपनीच्या व्हॉट्स अ‍ॅपने ऑगस्ट महिन्यात ७४ लाख खाती बंद केली, असे या कंपनीने नुकत्याच आलेल्या आपल्या भारतातील मासिक अहवालात म्हटले आहे. यापैकी ३५ लाख खाती वापरकर्त्यांकडून कोणतीही तक्रार येण्यापूर्वी सक्रियपणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींनंतर व्हॉट्स अ‍ॅपने केलेल्या कारवाईचे तसेच या मंचाचा गैरवापर केल्याबद्दल व्हॉट्स अ‍ॅपने स्वतःच केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांची तपशीलवार माहिती कंपनीच्या ‘युजर सेफ्टी रिपोर्ट’मध्ये देण्यात...2 Oct 2023 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र

पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र– हाती झाडू घेत स्वच्छता सेवेत श्रमदान, – कुस्तीपटू अंकितसह स्वच्छ, निरोगी भारताचा दिला संदेश, नवी दिल्ली, (०१ ऑक्टोबर) – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पृष्ठभूमीवर रविवारी (१ ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान करण्यात आले. या स्वच्छता अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केले. या माध्यमातून त्यांनी स्वच्छ, निरोगी भारताचा संदेश देत जनजागृती केली. मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली...1 Oct 2023 / No Comment /

शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा, राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना

शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा, राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना-पंतप्रधान मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन, नवी दिल्ली, (०१ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी निवडणूक राज्य तेलंगणामध्ये पोहोचले. येथे त्यांनी सुमारे १३५०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्यातील काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. महबूबनगरमधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सण सुरू होण्यापूर्वी महिला आरक्षण विधेयक आणि नारी शक्ती पूजेबद्दल सांगितले. या देशात सणांचा हंगाम सुरू झाला आहे. संसदेत नारी वंदन कायदा मंजूर करून आपण नवरात्रीपूर्वीच शक्तीपूजनाची भावना सिद्ध केली आहे....1 Oct 2023 / No Comment /

एलपीजीच्या किंमतीत २०९ रुपयांनी वाढ

एलपीजीच्या किंमतीत २०९ रुपयांनी वाढनवी दिल्ली, (०१ ऑक्टोबर) – एलपीजी ग्राहकांना मोठा झटका देताना, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी १९ केजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २०९ रुपयांनी वाढवली आहे. अद्ययावत किंमत सूचीनुसार, आता त्याची किंमत दिल्लीमध्ये १७३१.५० रुपये असेल, गेल्या महिन्यात किंमत १५२२.५० रुपये होती. त्यांच्या मते महागाई सातत्याने वाढत असून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती आधीच लक्षणीय वाढल्या आहेत. यापूर्वी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील महिलांना भेट म्हणून केंद्र सरकारने घरगुती एलपीजीच्या किमतीत २०० रुपयांनी कपात...1 Oct 2023 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी दिला कठोर परिश्रम करण्याचा मंत्र

पंतप्रधान मोदींनी दिला कठोर परिश्रम करण्याचा मंत्र-संकल्प सप्ताहाचा शुभारंभ, नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महत्त्वाकांक्षी गटांसाठी ’संकल्प सप्ताह’ या आठवडाभराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ब्लॉक स्तरावर प्रशासन सुधारणे हे संकल्प सप्ताहाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशभरातून ब्लॉक्सची निवड करण्यात आली आहे. याला ’आकांक्षी ब्लॉक्स’ म्हणतात. भारत मंडपम येथे ’संकल्प सप्ताह’ सुरू करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील सुमारे तीन हजार पंचायत आणि ब्लॉक स्तरावरील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी...30 Sep 2023 / No Comment /

यूजीसीने जाहीर केली बोगस विद्यापीठांची यादी

यूजीसीने जाहीर केली बोगस विद्यापीठांची यादी-कारवाई करण्याचा राज्यांना आदेश, नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात् यूजीसीने देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली. यात दिल्ली आणि उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांमधील बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. या बोगस विद्यापीठांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश यूजीसीने राज्यांना दिला आहे. विशेष म्हणजे, यात नागपुरातील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचाही समावेश आहे. या यादीत दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅण्ड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल...30 Sep 2023 / No Comment /