|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.64° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 7.73 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.09°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.63°C - 30.49°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.81°C - 30.35°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.83°C - 30.75°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.27°C - 32.16°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.08°C - 32.51°C

sky is clear

तिसरी आघाडी नाही, स्वबळावरच लोकसभा लढणार

तिसरी आघाडी नाही, स्वबळावरच लोकसभा लढणार– नवीन पटनायक यांचा नितीशकुमारांना धक्का, नवी दिल्ली, (११ मे) – पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक बिजू जनता दल तिसर्या आघाडीसोबत नव्हे तर, स्वबळावरच लढणार आहे. आमचा पक्ष नेहमीच स्वबळावर लढला आहे, असे या पक्षाचे प्रमुख आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विरोधकांची आघाडी उभारण्यासाठी भेट घेणार्या नितीशकुमार यांना पटनायक यांनी मोठा धक्का दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा भुवनेश्वर येथील दौरा हा सद्भावना दौरा होता आणि...11 May 2023 / No Comment /

शरद पवार विरोधकांचा चेहरा असू शकतो : नितीशकुमार

शरद पवार विरोधकांचा चेहरा असू शकतो : नितीशकुमारमुंबई, (११ मे) – शरद पवार हे विरोधकांचा चेहरा असू शकतात, असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुंबईत केले. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले असताना, आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवदेखील त्यांच्यासोबत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षनेते सतत एकमेकांना भेटून पुढील रणनीतीवर चर्चा करीत आहेत, असे नितीशकुमार म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांचा चेहरा कोण असणार,...11 May 2023 / No Comment /

लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३५० जागा मिळतील

लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३५० जागा मिळतील– अश्विनी कुमार चौबे यांचा विश्वास, रांची, (१७ एप्रिल) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३५० हून अधिक जागांवर विजयी होऊन नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक वितरण आणि पर्यावरण विभागांनी घेतलेल्या विविध उपक‘मांवर प्रकाश टाकण्यासाठी रविवारी रांची येथे आले असता चौबे यांनी, भ्रष्ट नेते देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत...17 Apr 2023 / No Comment /

जनगणना जातिनिहाय करा!

जनगणना जातिनिहाय करा!-मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सद्यस्थितीच्या आकडेवारीनुसार देशात जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी म्हटले आहे की, अद्ययावत जातिनिहाय जनगणना झालेली नसल्याने विशेषत: ओबीसींसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाकरिता आवश्यक असलेली विश्वसनीय माहिती अपूर्ण आहे. अद्ययावत जातिनिहाय जनगणना व्हावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी मी या पत्राद्वारे आपल्याकडे करीत...17 Apr 2023 / No Comment /

गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी

गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी-अतिक अहमदप्रकरणी खरगे यांची भूमिका, नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, पण ती कायद्याच्या चौकटीतच. कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी कायद्याचा दुरुपयोग करणे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी विशद केली. उत्तरप्रदेशात कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येप्रकरणी खडगे बोलत होते. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी आपल्या देशात न्यायालय आहे. मात्र, न्यायाच्या मार्गाने न जाता कायदा हातात घेण्याची वृत्ती...16 Apr 2023 / No Comment /

अदानी भ्रष्टाचाराचे प्रतीक : राहुल गांधी

अदानी भ्रष्टाचाराचे प्रतीक : राहुल गांधी-पंतप्रधान मोदींवर केली टीका, कोलार, (१६ एप्रिल) – पुढील महिन्यात कर्नाटकात होणार्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा दावा करीत, उद्योगपती गौतम अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटक जिल्हा मु‘यालयात अदानी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते येथे ‘जय भारत’ रॅलीला संबोधित करीत होते. १०...16 Apr 2023 / No Comment /

कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही: संबित पात्रा

कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही: संबित पात्रा-सीबीआय, ईडीचे काम पुराव्यांच्या आधारांवर, भुवनेश्वर, (१६ एप्रिल) – सीबीआय, ईडी यासारख्या तपास संस्था पुराव्यांच्या आधारावर आपले काम करीत असतात, त्या भावनेच्या आहारी जात नाहीत. त्यांना कुणी शत्रू किंवा मित्र नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने पाठविलेल्या समन्सचे समर्थन केले. येथे आयोजित पत्रपरिषदेत पात्रा म्हणाले की, भारतातील लोकशाहीबाबत सर्वांत चांगली गोष्ट अशी आहे की, येथे कुणीही स्वत:ला कायद्यापेक्षा आपण मोठे आहो...16 Apr 2023 / No Comment /

अमित शाह यांची आज गोव्यात प्रचार सभा

अमित शाह यांची आज गोव्यात प्रचार सभापणजी, (१६ एप्रिल) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पोंडा येथे भाजपाच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे, असे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकार्याने सांगितले. अमित शाह रविवारी दुपारी ३.३० वाजता गोव्यात दाखल होणार असून, संघटनात्मक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर पणजीपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या फार्मगुडी शहरात एका जाहीर सभेला मार्गदर्शन करतील, असे गोवा भाजपाचे सरचिटणीस नरेंद्र सवाईकर यांनी सांगितले....16 Apr 2023 / No Comment /

पुतण्याला मुख्यमंत्री बनविणे दीदींचे स्वप्न: अमित शहा

पुतण्याला मुख्यमंत्री बनविणे दीदींचे स्वप्न: अमित शहा-बंगाल दौर्‍यादरम्यान गृहमंत्र्यांच्या ममता बॅनर्जीवर हल्ला, नवी दिल्ली, (१४ एप्रिल) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बीरभूमच्या सभेत अमित शहा म्हणाले, ममता दीदी, तुमच्यानंतर तुमचा पुतण्या मुख्यमंत्री होईल, असे स्वप्न तुम्ही पाहत असाल. मी बीरभूममधून सांगतोय की पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार आहे. गृहमंत्री म्हणाले, ममता काश्मीरमधील दहशतवादाचा सामना करू शकतील का? हे काम फक्त...14 Apr 2023 / No Comment /

कर्नाटक निवडणूक: भाजपाच्या १८९ उमेदवारांची घोषणा

कर्नाटक निवडणूक: भाजपाच्या १८९ उमेदवारांची घोषणा– ५२ नव्या चेहऱ्यांना दिली संधी, नवी दिल्ली, (१२ एप्रिल) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी रात्री आपल्या १८९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. कर्नाटक भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान तसेच भाजपा महासचिव तसेच कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांनी भाजपा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भाजपाने त्यांच्या परंपरागत शिगावमधून उमेदवारी दिली. भाजपाच्या यादीत ५२ नवीन चेहर्यांचा समावेश आहे. या यादीत ओबीसीच्या ३२, अनुसूचित जातीच्या ३० तर अनुसूचित...12 Apr 2023 / No Comment /

नितीश-तेजस्वींनी घेतली खडगे-राहुल यांची भेट

नितीश-तेजस्वींनी घेतली खडगे-राहुल यांची भेट– विरोधी एकजूट समोर नेण्याचा संकल्प, नवी दिल्ली, (१२ एप्रिल) – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांची भेट घेतली आणि भाजपाच्या विरोधात विरोधकांची एकजूट समोर नेण्याचा संकल्प केला. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी विरोधी पक्ष एकत्रित व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा असताना खडगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. ही ऐतिहासिक बैठक असून, आगामी निवडणुका...12 Apr 2023 / No Comment /

राकाँ, भाकप, तृणमूलने गमावला राष्ट्रीय दर्जा

राकाँ, भाकप, तृणमूलने गमावला राष्ट्रीय दर्जा-आप बनला राष्ट्रीय पक्ष, नवी दिल्ली, (११ एप्रिल) – निवडणूक आयोगाने सोमवारी एका मोठ्या निर्णयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला तर, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांचा हा दर्जा काढून घेतला. याशिवाय आयोगाने भारत राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय लोकदल या दोन पक्षांचा प्रादेशिक पक्षांचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपसाठी...11 Apr 2023 / No Comment /