|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : ° C

कमाल तापमान : ° C

तापमान विवरण :

आद्रता : %

वायू वेग : Mps

स्थळ : ,

° C

सैन्य उपकरणांची देशातच निर्मिती : राजनाथसिंह

सैन्य उपकरणांची देशातच निर्मिती : राजनाथसिंहअमेरिका, रशियाचीही सहमती, नवी दिल्ली, १८ डिसेंबर – कित्येक सुरक्षा आव्हानांचा सामना करणार्‍या सशस्त्र दलांसाठी भारतातच सैन्य उपकरणांची निर्मिती करण्यास तयार असल्याचे अमेरिका, रशिया, फ्रान्ससह कित्येक देशांनी सांगितले आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी दिली. देशाची भरभराट पाहून अस्वस्थ होणारे शेजारी देवाने आपल्याला दिले आहेत. फाळणीतून निर्माण झालेला एक देश अशक्त होत असून, तो भारताच्या विकासामुळे काळजीत पडला आहे, असे राजनाथसिंह यांनी क्षेत्रीय भू-राजकीय घडामोडींबाबत सांगितले. अमेरिका, रशिया...18 Dec 2021 / No Comment /

जनरल नरवणेंकडे ‘सीओएससी’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी

जनरल नरवणेंकडे ‘सीओएससी’च्या अध्यक्षपदाची जबाबदारीनवी दिल्ली, १६ डिसेंबर – भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा जुनी व्यवस्था अंमलात आणण्यात आली आहे. तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांमध्ये वरिष्ठ असणारे जनरल नरवणे यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (सीओएससी) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम त्यांच्याकडे असणार आहे. भारतीय लष्कर दलाचे प्रमुख मनोज नरवणे सर्वांत वरिष्ठ असून, त्यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संरक्षण दलप्रमुख...17 Dec 2021 / No Comment /

ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशीबंगळुरू, १५ डिसेंबर – हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये मागील आठवड्यात भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरुणसिंह बचावले होते. भारतीय वायुदलातील विंग कमांडर वरुणसिंह यांना शौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. भारतीय वायुदलासाठी केलेल्या सेवेसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला. तेजस...15 Dec 2021 / No Comment /

छुप्या युद्धातही पाकिस्तानचा पराभव करू : राजनाथसिंह

छुप्या युद्धातही पाकिस्तानचा पराभव करू : राजनाथसिंहनवी दिल्ली, १२ डिसेंबर – पाकिस्तानविरोधात १९७१ मध्ये लढल्या गेलेले थेट युद्ध भारताने सहजपणे जिंकले होते. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध सुरू केले आहे. या युद्धातही आपण पाकिस्तानचा निश्‍चितच पराभव करू, असा विश्‍वास संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज रविवारी व्यक्त केला. ब्रिटिशांच्या राजवटीत धर्माच्या नावावर भारताची झालेली फाळणी ऐतिहासिक चूक होती, हेच १९७१ च्या युद्धातून स्पष्ट झाले आहे. थेट युद्धात आपण भारताचा पराभव करू शकत नाही, याची वारंवार खात्री...12 Dec 2021 / No Comment /

हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश

हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीचा आदेशराजनाथसिंह यांचे संसदेत निवेदन, नवी दिल्ली, ९ डिसेंबर – तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीनही दलांचे सेनापती जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि ११ अधिकार्‍यांच्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज संसदेत निवेदन करताना दिली. ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्या अध्यक्षतेखाली तीनही दलांकडून चौकशी करण्याचा आदेश भारतीय वायुदलाने दिला आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. संसदेच्या सदस्यांनी दोन...9 Dec 2021 / No Comment /

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडलाकुन्नूर, ९ डिसेंबर – सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात् ब्लॅक बॉक्स आज गुरुवारी सापडला असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. या दुर्घटनेत बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. प्रशासनाने शोधमोहिमेची व्याप्ती ३०० मीटरवरून एक किलोमीटर परिघापर्यंत वाढवल्यानंतर एमआय-१७ हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला, अशी माहिती अधिकृत सूत्राने दिली. फ्लाईट डेटा रेकॉर्डरसह दोन बॉक्सेस अपघात स्थळावर सापडले....9 Dec 2021 / No Comment /

अमेठीत एके-२०३ च्या निर्मितीस केंद्राची मंजुरी

अमेठीत एके-२०३ च्या निर्मितीस केंद्राची मंजुरीपाच लाख रायफलींचे होणार उत्पादन, नवी दिल्ली, ४ डिसेंबर – उत्तरप्रदेशातील अमेठी येथील कोरवा येथे पाच लाख एके-२०३ रायफलींच्या निर्मितीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा निर्णय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालणा देणारा आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. उत्तरप्रदेश देशातील संरक्षण उत्पादन केंद्र होण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. संरक्षण खरेदीचा कल आता मेक इन इंडियाकडे झुकल्याचे यातून परावर्तित होते. पाच लाख एके-२०३ रायफलींच्या उत्पादनासाठी रशियासोबत भागीदारी केली जाईल आणि यातून दोन्ही...4 Dec 2021 / No Comment /

सात वर्षांत ३८ हजार कोटींवर संरक्षण निर्यात

सात वर्षांत ३८ हजार कोटींवर संरक्षण निर्यातराजनाथसिंह यांची माहिती, नवी दिल्ली, ४ डिसेंबर – मागील सात वर्षांत भारताने ३८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात केली असून, देश लवकरच संरक्षण क्षेत्रातील मोठा निर्यातदार होईल, असा विश्‍वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राचा देशातील उद्योग ८५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. यात खाजगी क्षेत्राचे योगदान वाढून आता १८ हजार कोटी रुपयांचे झाले आहे, असे राजनाथसिंह यांनी सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सने मध्यम,...4 Dec 2021 / No Comment /

युद्ध झाल्यास सैन्य १९७१ सारखे हाल करेल

युद्ध झाल्यास सैन्य १९७१ सारखे हाल करेललष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा इशारा, नवी दिल्ली, ३ डिसेंबर – १९७१ च्या युद्धाच्या काळात मी केवळ ११ वर्षांचा होतो. कुणाशी युद्ध व्हावे, असे मला मुळीच वाटत नाही, पण भविष्यात युद्ध झाले तर, भारताचे सैन्यदल शत्रूंचे हाल १९७१ सारखेच केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज शुक्रवारी दिला. एका हिंदी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. ‘सर्वांत मोठ्या विजयाची ५० वर्षे’ हा या मुलाखतीचा विषय होता. विशेष...3 Dec 2021 / No Comment /

लडाखमध्ये चार इस्रायली हेरॉन ड्रोन्स तैनात

लडाखमध्ये चार इस्रायली हेरॉन ड्रोन्स तैनातचीनच्या कुरापतींवर ठेवणार नजर, नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर – इस्रायलकडून विकत घेतलेले चार हेरॉन ड्रोन्स भारतीय लष्कराने लडाखच्या सीमेवर तैनात केले आहेत. या ड्रोन्सचे कॅमेरे, संवेदक आणि रडार ससाण्याच्या नजरेप्रमाणे तीक्ष्ण असल्याने चीनच्या कुरापतींवर बारीक नजर ठेवणे शक्य होणार आहे. या ड्रोन्सच्या माध्यमातून चिनी लष्कराच्या प्रत्येक हालचालीची माहिती भारतीय लष्कराला मिळणार आहे. भारताचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल २०२० पासून चीनसोबत संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे लडाख येथे शस्त्रास्त्रे, विमान, क्षेपणास्त्रांची...1 Dec 2021 / No Comment /

नौदलाला आज मिळणार ‘आयएनएस वेला’

नौदलाला आज मिळणार ‘आयएनएस वेला’मुंबई, २४ नोव्हेंबर – संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आयएनएस विशाखापट्टणम् ही विनाशिका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्यानंतर आता नौदलाला कलवरी श्रेणीची चौथी पाणबुडी आयएनएस वेला मिळणार असून, उद्या गुरुवारी ही पाणबुडी नौदलात दाखल होणार आहे. आयएनएस वेला मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी आणि आयएनएस करंज भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्यांच्या तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आल्या आहेत, ज्या जगातील...24 Nov 2021 / No Comment /

पुलवामा हल्ल्यासाठी ऍमेझॉनवरून मागवले अमोनियम नायट्रेट

पुलवामा हल्ल्यासाठी ऍमेझॉनवरून मागवले अमोनियम नायट्रेट‘सीएआयटी’चा दावा, नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर – २०१९ मध्ये झालेल्या पुलमावा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले अमोनियम नायट्रेट ऍमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीकडून मागवण्यात आले होते, असा धक्कादायक दावा कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) केला आहे. एका इंग्रजी नियतकालकात प्रसिद्ध झालेल्या लेखावर बोट ठेवत व्यापारी संघटनेने ऍमेझॉनवर निशाणा साधला आहे. पुलावामा हल्ल्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. अमोनियम नायट्रेटच्या खुल्या विक्रीवर देशात निर्बंध आहेत. त्यामुळे ऍमोझॉनच्या अधिकार्‍यांवर गुन्हा...23 Nov 2021 / No Comment /