जीमेल होणार आधुनिक
Sunday, April 6th, 2014मुंबई, (५ एप्रिल) – सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सेवा म्हणून लौकिक मिळवलेल्या जीमेलच्या दशकपूर्तीनंतर जीमेल अधिक ऍडव्हॉन्स होणार असून, त्यात नवे टॅब्स आणि नवीन फिचर्स सामील होणार आहेत.
जीमेल वापरकर्त्यांचा अनुभव सुधारावा यासाठी जीमेलने प्रचंड मोठ्या स्पेससोबत आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल केले आहेत. आता यात नवे टॅब्स, पिन, स्नूज अशा आणखी नव्या फिचर्सची भर पडणार आहे. सध्या जीमेलवर प्रायमरी, सोशल, प्रमोशन्स, फोरम्स आणि अपडेट्स असे पाच टॅप उपलब्ध आहेत. आता त्यात ट्रॅव्हल, पर्चेस आणि फायनान्स असे नवे टॅब वापरता येणार आहेत. या नव्या टॅब्समुळे युझर्सना आपल्या मेलचे व्यवस्थापन अधिक सहजतेने करता यावे, अशी जीमेलची संकल्पना आहे.
महत्त्वाचे मेल मार्क करून ठेवण्यासाठी सध्या जीमेलमध्ये ‘स्टार’ हा पर्याय उपलब्ध आहे. त्याऐवजी आता ‘पिन’ हा नवा पर्याय मिळणार आहेत. या ‘पिन’ मेलना सर्च करणे अधिक सोपे होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘स्नूज’ या नव्या फिचरमुळे आपण काही मेल विशिष्ट वेळ मार्क करून वाचू शकू. जीमेलची ही नवी फिचर्स मोबाईल आणि ऍपचा विचार करून विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे जशी ती जीमेलवर लॉन्च होतील, तशीच ती मोबाईल जीमेल आणि ऍपवरही दिसतील.
Short URL: https://vrittabharati.in/?p=12494

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!