Home » विज्ञान भारती » प्रथमच अंतराळातून ‘लाईव्ह शो’चे प्रसारण

प्रथमच अंतराळातून ‘लाईव्ह शो’चे प्रसारण

=१७० देशांमध्ये बघता येणार=
लंडन, (११ जानेवारी) – ब्रिटनची चॅनेल-४ ही वाहिनी लवकरच अंतराळातून अनोखा असा पहिलावहिला ‘लाईव्ह शो’ प्रसारित करणार असून, यादरम्यान इंटरनॅशनल स्पेस सेंटरला (आयएसएस) पृथ्वीच्याभोवती चक्कर मारताना दाखविले जाणार आहे.
‘लाईव्ह फ्रॉम स्पेस’ असे शीर्षक असलेला हा कार्यक्रम नॅशनल जियोग्राफिक चॅनलवरून १७० देशांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. या शोचे सूत्रसंचालन ‘द एक्स फॅक्टर’ या प्रसिद्ध टॅलेंट हंट शोचे सूत्रसंचालक डरमॉट ओ लेरी हे करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पृथ्वीची हाय डेफिनेशन छायाचित्रे घेतली जाणार आहेत. इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये दिवसभर होणार्‍या घडामोडींचे प्रसारण केले जाईल. ह्युस्टन येथील नासाच्या मिशन कंट्रोल रूममधून लेरी स्पेस सेंटरमधील अंतराळवीरांशी थेट बोलणार आहेत.
या प्रकल्पावर काम करणे म्हणजे स्वत:ला शिक्षित करण्यासारखे आहे आणि त्यामुळेच या कार्यक्रमाशी स्वत:ला जोडण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्पेस सेंटरचे काम कसे चालते हे जाणून घेण्यास मीदेखील उत्सुक आहे, असे लेरी यांनी याबाबत बोलताना सांगितले. २०१५ मध्ये भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग आणि ब्रिटिश अंतराळवीर टीम पेक यांना अंतराळ केंद्रात पाठविले जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान या दोघांशीही चर्चा केली जाणार आहे आणि अंतराळ अभियानाबाबत त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10076

Posted by on Jan 12 2014. Filed under विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विज्ञान भारती (43 of 48 articles)


=जीएसएलव्हीचाच वापर करणार= नवी दिल्ली, (१० जानेवारी) - ‘चांद्रयान-१’ या मोहिमेला प्रचंड यश प्राप्त झाल्याने तसेच मंगळयानाच्याही यशस्वी प्रक्षेपणाने आत्मविश्‍वास ...

×