Home » विज्ञान भारती » मेंदूतील कटुस्मृती नष्ट करणारे औषध!

मेंदूतील कटुस्मृती नष्ट करणारे औषध!

brainलंडन, [७ सप्टेंबर] – एखाद्याने कळत न कळत उच्चारलेला एखादा शब्द कुणाला कायमचा जिव्हारी लागतो. काहींना एखाद्या घटनेमुळे मानसिक धक्का बसून मनात कटु स्मृती कायमच्या कोरल्या जातात. काही जण सकारात्मक व आनंदी मनोवृत्तीमुळे कुठलीही कडू आठवण किंवा एखाद्याचे वाईट शब्द विसरतात. पण काही जण मात्र मनावरील या जखमा कायम कुरवाळत बसतात. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांच्या मेंदूतून त्या आठवणी काही पुसल्या जात नाहीत आणि याचा मानसिक त्रास त्यांना व त्यांच्या सहवासात असणार्‍या इतरांनाही होतो. मात्र, आता वैद्यकीय संशोधकांनी अशी एक गोळी शोधून काढली आहे की, कटु स्मृतींना मेंदूतून कायमचे नष्ट करू शकेल. ‘मल्टीपल स्क्लेरॉसिस या विकारावरील औषध म्हणून ओळखली जाणारी गोळी आता वाईट स्मृती मेंदूतून पुसून टाकण्यासाठी वापरता येणार आहे. संशोधकांना असे दिसून आले की, उंदरांना ‘फिंगोलिमॉड’ हे औषध देण्यात आले असता, त्यांच्या वेदनादायी स्मृती नष्ट झाल्या. या औषधाला अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच या विषयीचे हे संशोधन ‘नेचर न्युरोसायन्स’ या नियतकालिकातही प्रकाशित झाले आहे.
जर फिंगोलिमॉड या औषधाचा परिणाम उंदरांप्रमाणेच माणसावरही झाला, तर त्यातून ज्या लोकांच्या पूर्वीच्या काही वाईट किंवा धक्कादायक स्मृती काढून टाकल्या जातील. ‘फिंगोलिमॉड’ ही गोळी गिलेर्‍या या नावानेसुद्धा उपलब्ध आहे. रिचमंड येथील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या सारा स्पिगेल व त्यांच्या सहकार्‍यांना असे दिसून आले की, यात हिस्टोन डेऍसिटलाईज या विचलित करणार्‍या घटकाचे कार्य निष्प्रभ केले जाते.
यासंदर्भात उंदरांवर जे संशोधन व प्रयोग करण्यात आले ते वैशिष्ट्यपूर्ण होते. उंदरांना एका कक्षात घेऊन त्यांच्या पायाला हलकेसे विजेचे धक्के देण्यात आले व ते उंदीर पिंजर्‍यात परत आल्यानंतर त्यांना थिजल्यासारखे झाले व नैराश्य आले. या हालचालविरहित अवस्थेत असलेल्या उंदरांना नंतर ही गोळी दिली असता त्यांच्या कटु स्मृती पुसल्या गेल्याचे आढळून आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=16539

Posted by on Sep 8 2014. Filed under विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विज्ञान भारती (27 of 48 articles)


वॉशिंग्टन, [३१ ऑगस्ट] - अतिजलद संपर्काचे माध्यम असलेल्या ई-मेल सुविधेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही ई-मेल सुविधा मुंबईत जन्मलेल्या ...

×