Home » विज्ञान भारती » सौरऊर्जेवर चालणारी ‘तेजस’ तयार

सौरऊर्जेवर चालणारी ‘तेजस’ तयार

=भारतीय अभियंत्याची कमाल=
बंगळुरू, [१४ जुलै] – सध्या वाहनांसाठी आवश्यक असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. याशिवाय या नैसर्गिक इंधनाचा साठा संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित केला जातो. एका भारतीय अभियंत्यांने या प्रश्‍नाचे उत्तर शोधले असून, विजेवर आणि सौरऊर्जेवर चालणारी तीनचाकी रिक्षा तयार केली आहे.
नवीन राबेल्ली असे या भारतीय अभियंत्याचे नाव असून, गेली दोन वर्षे त्यांनी एका जुन्या रिक्षाला वीज आणि सौरऊर्जेवर कसे चालविता येईल याविषयीच्या संशोधनावर खर्च केली. राबेल्ली यांना अखेर त्यात यश आले असून, पर्यावरणाची कोणतीही हानी होऊ न देता प्रवास करण्याच्या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते पुढील वर्षी दहा देशांमध्ये ९६०० किमीचा प्रवास करणार आहेत.
आपल्या संशोधनाचा एक भाग म्हणून राबेल्ली यांनी आपली रिक्षा गॅरेजमधून बाहेर काढली तेव्हा ती बंद पडली होती. पण, या अपयशाने खचून न जाता त्यांनी त्यामध्ये आवश्यक ते बदल करून अखेर आपले स्वप्न पूर्ण केले. आता याच रिक्षातून ते लंडनपर्यंतचा प्रवास करणार आहेत. राबेल्ला यांनी वीज आणि सौरऊर्जेवर चालणार्‍या या तीनचाकी रिक्षाला ‘तेजस’ असे नाव दिले आहे. यामध्ये नवी मोटर, बॅटरी आणि गीअरबॉक्स बसविण्यात आला आहे. साधारण ऑटो रिक्षाच्या वजनाच्या तुलनेत या तीनचाकीचे वजन तिप्पट आहे. या रिक्षाच्या छतावर सोलर पॅनेल बसविण्यात आले आहे आणि आत बसणार्‍या प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी कापडी पडदे लावण्यात आले आहेत.
राबेल्ली यांनी आपली सगळी कमाई या संशोधनासाठी खर्च केली आहे. या रिक्षाच्या निर्मितीसाठी त्यांना ३६ हजार रुपये खर्च आला. खराब झालेले प्लोरिंग आणि जुन्या बॅटरीच्या जागी नवी लिथियम बॅटरी बसविण्यासाठी त्यांना अधिक रकमेची गरज आहे. इतर ऑटोरिक्षाच्या तुलनेत ही गाडी अधिक किफायतशीर असून, अवघ्या ६०-७० रुपयांत १०० किमी अंतर प्रवास करू शकते, असा त्यांचा दावा आहे. डिझेलवर चालणार्‍या रिक्षाला एवढे अंतर कापण्यासाठी २५० ते २७५ रुपये खर्च येतो.
बंगळुरू ते मुंबई असा प्रवास या रिक्षाने आणि त्यानंतर बोटीने इराणला जाण्याची राबेल्ली यांची योजना आहे. इराणमधून तुर्की व बल्गेरिया असा प्रवास करून फ्रान्सच्या कालाई बंदरातून ते युरोपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14155

Posted by on Jul 15 2014. Filed under विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विज्ञान भारती (32 of 48 articles)


इंदूर, [१४ जुलै] - डायनॉसोरचे दुर्मिळ अवशेष मध्य प्रदेशातील नर्मदेच्या खोर्‍यात आढळून आले आहेत. या ठिकाणी साधारण सहा कोटी वर्षांपूर्वी ...

×