Home » विज्ञान भारती » २ मिनिटांत डाऊनलोड करा पूर्ण चित्रपट

२ मिनिटांत डाऊनलोड करा पूर्ण चित्रपट

=४ जी नेटवर्कवर होणार सेवा उपलब्ध=
नवी दिल्ली, (६ जानेवारी) – प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या ‘रिलायंस जिओ इन्फोकॉम’ या कंपनीच्या माध्यमातून देशातील मोबाईल ग्राहकांना नवीन वर्षाची खास भेट देणार आहेत. कंपनी फोर जी नेटवर्कवर ४९ मेगाबीट प्रति सेकंदांच्या वेगाने डाऊनलिंक आणि अपलिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हा वेग थ्री जीच्या तुलनेत साधारण १२ टक्क्यांनी अधिक आहे.
या अफलातून वेगामुळे कोणताही युझर ६०० मेगाबाईट्‌सचा चित्रपट फक्त दोन मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकणार आहे. डाऊनलोडींगसाठी सध्याचा वेग ११२ एबीपीएस असा आहे. शिवाय, ही सुविधा केवळ मोबाईलवरच नाही तर घरातील टिव्हीच्या माध्यमातूनही वापरता येणार आहे. संपर्कक्षेत्राच्या बाहेर असलेल्या परिसरातही ऑप्टीकल केबल्सच्या माध्यमातून ही सुविधा पुरविली जाणार आहे. अशा घरांमध्ये ‘कस्टमर प्रेमाईस इक्विपमेंट’ लावण्यात येईल. त्यामुळे संबंधित घरांत वाय-फायची सुविधा उपलब्ध होऊन मोबाईल चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. फोर जीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनी ग्राहकांना ब्रॉडबॅण्ड आणि टेलीव्हिजन सेवादेखील देणार आहे. त्या नेटवर्कमुळे ग्राहकाला आपल्या मोबाईल आणि टेलीव्हिजनवर १५० चॅनेल्स बघणे सहजशक्य होणार आहे. कंपनीच्या अधिकृत सूत्राने ही माहिती दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=9850

Posted by on Jan 7 2014. Filed under विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विज्ञान भारती (46 of 48 articles)


नेदरलॅण्ड्‌स, (२ जानेवारी) - माणसाला मंगळ या लाल ग्रहाचे प्रचंड आकर्षण आहे. अमेरिकेतील एका खाजगी संस्थेच्या वतीने मंगळावर कायम मनुष्य ...

×