Home » विदर्भ » ज्येष्ठ प्रचारक बाबाराव पुराणिक यांचे निधन

ज्येष्ठ प्रचारक बाबाराव पुराणिक यांचे निधन

Babarao-Puranikनागपूर, [१० जून] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत प्रचारक अनंत वासुदेव उपाख्य बाबाराव पुराणिक यांचे, राजनांदगाव येथे त्यांचे पुतणे विनायक पुराणिक यांचे निवासस्थानी बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे भाऊ रमाकांत, मालती तेंदूरकर (जबलपूर), सुवर्णा गंडेचा नागपूर या दोन बहिणी तसेच पुतणे, भाचे व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या ११ जून रोजी सकाळी ९ वा. राजनांदगाव येथील लखोली भागात अंतिम संस्कार करण्यात येईल.
मागील दोन दिवसांपासून त्यांना श्‍वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना राजनांदगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. त्यांनी विदर्भ प्रांत प्रचारक म्हणून बरीच वर्षे उत्तरदायित्व सांभाळले. त्यानंतर त्यांच्याकडे उत्तर बिहार, दक्षिण बिहारचे प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याचप्रमाणे उत्तर पूर्व क्षेत्राचे बौद्धिक प्रमुख तसेच प्रचारक प्रमुख ही जबाबदारी देखील सांभाळली. पुराणिक कुटुंब मूळचे वर्धा येथील. त्याठिकाणी त्यांचे वडील भिक्षुकी करीत असत. १९४० साली ते रा. स्व. संघाच्या कामात रुजू झाले व त्यांच्या प्रचारक जीवनाला प्रारंभ झाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22807

Posted by on Jun 11 2015. Filed under विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विदर्भ (7 of 29 articles)


=संवेदनशीलतेने काम करण्याचे अधिकार्‍यांना आवाहन= यवतमाळ, [३ मार्च] - ‘मोठी धरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून तातडीचा उपाय म्हणून जलयुक्त ...

×