Home » विदर्भ » भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणा

भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणा

=भाजप प्रदेश उपाध्यक्ष रावल यांचे आवाहन=
अकोला, [३ ऑगस्ट] – कॉंग्रेसला संपूर्णतः हद्दपार करण्याचा संकल्प नरेंद्र मोदी उचचला आहे, तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात सुराज्य आणण्याचा बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्प कृतीत उतरविण्यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आणा असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. जयकुमार रावल यांनी केले. मंचावर प्रदेश निरीक्षक सीमाताई हिरे, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ.डॉ. रणजित पाटील, डॉ. अशोक ओळंबे होते.
स्थानिक भाजपा कार्यालयासमोरील टोपले सभागृहात जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा महानगर व ग्रामीण जिल्हातील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी वेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह हजेरी लावली होती. यावेळी प्रदेश निरीक्षक सीमाताई हिरे, खा. संजय धोत्रे यांनीही मार्गदर्शन केले.
तद्‌नंतर अकोला जिल्ह्यातील भाजपाने मूर्तिजापूर, बाळापूर,पश्‍चिम अकोला मतदार संघात पक्षाचेे उपाध्यक्ष आ. जयकुमार रावल व महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई हिरे, नाशिकच्या नगरसेविका पुष्पाताई भांबरे यांनी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे म्हणणे एकूण निवेदन स्वीकारले. इच्छुक उमेदवारांचे स्वागत खा. संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.डॉ. रणजित पाटील, तेजराव थोरात, डॉ. अशोक ओळंबे, रणधिर सावरकर, किशोर मांगटे पाटील करीत होते. यावेळी बाळापूर येथून ४०, मूर्तिजापूर २७, अकोला पश्‍चिम मधून १४ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14637

Posted by on Aug 4 2014. Filed under विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विदर्भ (21 of 29 articles)


=मेघे पुत्रासहित भाजपमध्ये येणार= नागपूर, [९ जून] - वर्धा लोकसभा मतदारसंघात पुत्र सागर आणि समीर यांच्या झालेल्या पराभवानंतर जेष्ठ नेते ...

×