Home » विदर्भ » यवतमाळ येथे स्वा. सावरकर साहित्य संमेलन

यवतमाळ येथे स्वा. सावरकर साहित्य संमेलन

=उद्या भूमिपूजन, चित्रकला स्पर्धेचे आयोजन, कार्यकर्ता बैठक=
यवतमाळ, (१२ फेब्रुवारी) – यवतमाळात २२ व २३ फेब्रुवारी २०१४ रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाचे भूमिपूजन शुक्रवार, १४ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता होत आहे. बालाजी सोसायटीतील सावरकर मैदानावर होणार्‍या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे व कार्याध्यक्ष विशुद्ध संस्थेचे सचिव सुरेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमिपूजन होईल.
देशभक्त विषयावर चित्रकला स्पर्धा
शुक्रवार, १४ फेब्रुवारीलाच सावरकर मैदानावर या संमेलनाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी ७ वाजता सुरू होणार्‍या या स्पर्धेत वर्ग ५ ते ७ चा ‘अ’ गट, वर्ग ८ ते १० चा ‘ब’ गट व इतर सर्वांचा खुला ‘क’ गट असून या सर्व गटांसाठीचा विषय ‘देशभक्त, क्रांतिकारक किंवा देशभक्ती’ असा ठरविण्यात आला आहे. स्पर्धकांनी आपापले रंग व खर्डा घेऊन स्पर्धास्थळी उपस्थित रहायचे आहे. त्यांना ड्रॉईंग कागद समितीच्या वतीने पुरविण्यात येईल. स्पर्धेचे नाममात्र शुल्क १० रुपये असून प्रत्येक गटात ५००, ३००, २०० रुपये रोख अशी पहिली तीन पारितोषिके व उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. योग्य चित्रकृतींच्या कलावंतांना कॅनव्हास पेंटिंगसाठी देशभक्त चितारण्याची संधी देण्यात येणार असल्याचे मंचाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कार्यकर्ता बैठक
राज्यस्तरीय सावरकर साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी १४ फेब्रुवारी रोजी यवतमाळ शहर, जिल्हा व विदर्भातील कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले आहे. सावरकर मैदानालगतच्या मंजूषा मंगल कार्यालयात सकाळी ९.३० वाजता होणार्‍या या बैठकीत संमेलनाची आपापल्या तालुक्यातील नोंदणी व प्रचार व व्यवस्थेच्या दृष्टीने रूपरेषा निर्धारित होईल. त्यासाठी योगदान देऊ इच्छिणार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंचच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात मंचाचे सचिव रवी काळे ९९२१२३७२०१, कोषाध्यक्ष राकेश मिश्रा ९७६७६९५९४५, संयोजक प्रशांत बनगिनवार ९४२२१६६६५८ यांच्याशी संपर्क साधावा.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11097

Posted by on Feb 13 2014. Filed under विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विदर्भ (27 of 29 articles)


= रामदेव बाबा = नागपूर, (१० फेब्रुवारी) - स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरू असून, गुरुकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे ते माझे आदर्श आहेत. ...

×