Home » संवाद » अच्छे दिन आ गये है

अच्छे दिन आ गये है

चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था असते. परंतु चांगले शासनकर्ते निवडून देण्यासाठी डोळसपणे मतदान करणारे मतदार आणि चांगले शासनकर्ते होण्याच्या योग्यतेचे उमेदवार ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. गेल्या दहा वर्षांत देशावर राज्य करताना ज्यांनी चांगले शासनकर्ते होण्याची आणि जनमानसात आपली उत्तम आणि उत्तुंग प्रतिमा निर्माण करण्याची हातची संधी गमावली आणि साडे पाच हजार लाख करोड रुपयांचे घोटाळे करणारे भ्रष्ट सरकार असा नावलौकिक मिळवून विश्‍वासार्हता कायमची गमावली, त्या कॉंग्रेस प्रणीत युपीए सरकारनं देशाला विकासाच्या बाबतीत दहावीस वर्षे मागे नेऊन ठेवलं. देश सपशेल अपयशी ठरण्यामागे कारणीभूत असते तिथली शोषणकर्ती व्यवस्था, कारण शासनयंत्रणा, अनिर्बंध सत्ता आणि संपत्ती, शोषक राज्यकर्त्यांच्या हाती एकवटलेली असते.
Countries become failed states not because of their geography or their culture, but because the legacy of extractive institutions, which concentrate power and wealth in the hands of those controlling the state, opening the way for unrest, strife and civil war. Ag§ Why Nations Fail. The Origins of Power, Prosperity and Poverty ह्या पुस्तकात Daron cemogluआणि James Robinsonह्या लेखकद्वयीनं जागोजागी अधोरेखित करून लिहिलंय, ते आपल्या बाबतीत शब्दन शब्द खरे ठरले आहेत. चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था भारताच्या घटनेने भारतीय नागरिकांना दिलेली असल्यामुळे निदान जागरूक नागरिकांनी तरी आपला देश गरिबीच्या खाईत लोटला जाणार नाही, तो प्रगतीपथावर राहील ह्याची काळजी घ्यायला हवी. अशा अर्थाचं विवेचनही त्यात त्यांनी केलं आहे.
ह्या शोषक राज्यकर्त्यांच्या विरोधात घटनादत्त अधिकार वापरून आपल्या देशातल्या सुजाण नागरिकांनी लोकशाहीच्या मार्गानं निषेध नोंदवला आणि मतदान यंत्रांतून सत्ताबदल घडवून आणण्याचा निश्‍चय केला. नऊ टप्प्यांत ७ एप्रिल ते १२ मे अशा ३५ दिवस सुरू असलेल्या ह्या प्रदीर्घ निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनतेनं ६६.३८ टक्के मतदान केलं. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात ह्या वेळची मतदानाची टक्केवारी ही आजवरची सर्वाधिक ठरली. इंदिरा गांधी ह्यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसची लाट होती, त्यावेळी ६४.०१ टक्के मतदान झालं होतं. मागच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मतदानाची टक्केवारी ५८.१९ अशी होती. वस्तुत: ह्यावेळच्या टक्केवारीत आणखी वाढ झाली असती, परंतु लाखो मतदारांची नावं मतदार याद्यांमधून ऐनवेळी गहाळ झाल्यानं अनेक जणांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित रहावं लागलं. निवडणूक आयोगाची नाचक्की झाली, ती वेगळी ! वस्तुत: अनेक मतदार कारणपरत्वे इतरत्र जावे लागल्याने मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे ई -व्होटिंग करता येणे ही आता काळाची गरज झाली आहे. पैशांचे व्यवहार जर आपण इंटरनेटच्या माध्यमातून सहजपणे, निर्धोकपणे करतो, तर ई-व्होटिंग पण इंटरनेटच्या माध्यमातून निर्धोकपणे करता येणे सहज शक्य आहे. शिवाय निवडणुकीच्या वेळी उधार-उसनवार करून इकडून तिकडून कर्मचारी गोळा करून त्यांची इलेक्शन ड्युटी लावण्याऐवजी निवडणूक आयोगानं पूर्णवेळ, कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करायला हवेत. म्हणजे नामुष्कीची वेळ येणार नाही. शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी तर आधीच्या आठ टप्प्यांपेक्षा अधिक मतदान झाले. त्याहून महत्वाचं म्हणजे ह्या शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचं लक्ष ज्या जागेकडे लागून राहिलेलं होतं, त्या वाराणसीमध्ये मतदान होतं, पंतप्रधान पदाचे भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विरोधातले इतर उमेदवार, त्यांच्या नथींआडून तीर मारणारे बाकीचे, ह्या सगळ्या संग्रामाची साद्यंत हकीकत सांगण्यास सज्ज झालेली प्रसारमाध्यमं, त्यामुळे वाराणसीला अपार महत्व आलेलं होतं.
१६ मे रोजी घोषित होणार असणार्‍या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष लागून राहिलेलं असताना निवडणूकोत्तर अंदाज चाचण्या – -Exit Pollsचे निकाल फुटल्याच्या बातम्यांनी वेग पकडला. विविध यंत्रणांनी घेतलेल्या ह्या सगळ्या Exit Pollsनी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं आणि कॉंग्रेसला लोकांनी सपशेल उलथून टाकलेलं बघायला मिळणार असल्याचं चित्र दाखवलं आणि देशभर आनंदाची एकच लहर उसळली .
देशातल्या वातावरणाचं प्रतिबिंब साधारणत: शेअर बाजारात झळकतं. Exit Pollsच्या फुटलेल्या नुसत्या बातमीनं ‘अच्छे दिन आनेवाले है’ ही भाजपाची कॅचलाईन शेअर बाजारानं प्रत्यक्षात उतरवत येऊ घातलेले दिवस किती सुखद असतील, त्याची झलक दाखवली आणि दोन दिवसांत सेन्सेक्सनं जेव्हा १००० अंकांनी उसळी घेतली, निर्देशांकाला अभूतपूर्व पातळीवर नेऊन ठेवलं, तेव्हाच सत्ताधारी आणि अन्य राजकीय पक्षांसह जनसामान्यांना ह्या निवडणुकीच्या निकालांची दिशा कळून चुकली. जणु शेअर बाजारानं ‘बुल रन’ची नांदी दिली आणि ‘Foreign Institutional Investor’ -FIIचलो बु(ल)लावा आया है, म्हणत गुंतवणुकीसाठी भारतीय शेअर बाजाराकडे पळत सुटले. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी १६ मे रोजी हा लेख लिहितेवेळी, आदल्या दिवशी सेन्सेक्स २३९०५.६० अंकांवर बंद झाला होता तो २४२७१.५४ अंकांवर सुरू झाला आणि अगदी थोड्याच वेळात त्यानं आजवरचा सर्वाधिक उच्चांक २५३७५.६३ हा आकडा गाठला. एका दिवसात हजाराच्यावर उसळी मारत शेअर बाजारानं मोदी लहर दाखवून दिली. निफ्टी निर्देशांक ७५६३.५० अशा आजवरच्या उच्चांकावर पोहोचला.
भय-भूक-भ्रष्टाचारमुक्त सुशासन नरेंद्र मोदी देतील ह्या खात्रीनं भारतीय जनतेनं त्यांना मत दिलं होतं, मग स्थानीय भाजपा उमेदवार कोणी का असेना! त्यामुळे भाजपाला निर्विवाद बहुमत मिळालं. नरेंद्र मोदी वडोदरा आणि वाराणसी अशा दोन्ही जागांवरून भरघोस मतांनी विजयी झाले. नरेंद्र मोदी कोणची जागा ठेवतील आणि कोणची जागा सोडतील हा बहुचर्चित मुद्दा आहे. एक मात्र नक्की की गुजरात मोदीभक्त असल्याने, भाजपाचा बालेकिल्ला असल्याने भाजपाच्या अन्य उमेदवारासाठी वडोदरामधून जिंकणे हे भाजपाच्या अन्य उमेदवारासाठी वाराणसीमधून जिंकण्यापेक्षा तुलनेनं सोपे आहे. नरेंद्र मोदी ह्यांना वाराणसीने भरभरून पाठींबा दिला आहे. वाराणसीतली तरुणाई आणि मुख्य म्हणजे मोठ्या संख्येनं मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदी ह्यांना मते दिली आहेत. नरेंद्र मोदी आपली उपेक्षा आणि निराशा करणार नाहीत अशी वाराणसीतल्या लोकांची खात्री आहे. प्रत्यक्ष आणि सोशल मीडिया दोन्हीकडे वाराणसीतली तरुणाई प्रचारार्थ उतरली होती. ‘यह बनारस है, यहॉं की बात ही कुछ और है’ नावानं आपला फेसबुक अकाउंट चालवणारी वाराणसीतली तरुणाई गालातल्या गालात हसत म्हणते, ‘गुरु गनीमत हौ कि फेसबुक, अमेरिका में बनल हौ, नाहीं तई युपीए सरकार, एकर नाम राजीव गॉंधी दोस्त बनाओ योजना रख देहले होत!’ त्यांच्याशी झालेल्या वार्तालापात वाराणसीतले युवक सांगतात, बनारस के रंग बड़े अज़ीब है!! जरा गौर फरमाईयेगा, ये वो नगरी है जहॉं आप एक मुस्लिम बच्चे को कृष्ण की फोटो दिखा कर अगर पुँछे की बेटा बॉंसुरी कौन बजा रहा है तो जवाब आयेगा ‘अल्लाह’! ये वो नगरी है जहॉं हर मुहल्ले मे एक पद्म विभुषणऔर पदमश्री वाला आपको मिल जायेगा. ये वो नगरी है जहॉं गंगा मॉं की गोद मे मुस्लिम भी नहाता है और हिन्दु भी. ये वो नगरी है जहॉं हर ईद से पहले कोई हिन्दु रोज़े रख लेता है तो दिवाली मे कोई मुस्लिम पटाखे फोड़ता नज़र आता है! ये वो नगरी है जहॉं की फिजा मे शेरो-शायरी की महक भी है और मन्त्रों की गुँज भी ! ये वो नगरी है जहॉं भॉंग तो आपको मुफ्त मिल जायेगी पीने के लिए पर ठंण्डई के पैसे देने पड़ सकते हैं. ये वो नगरी है, जिसकी बनारसी साड़ी बनती किसी मुसलमान के हाथों से है पर कोई शर्मा या श्रीवास्तव के बेटी की शादी मे ईस्तेमाल होती है! ये वो नगरी है जहॉं के लोग पान भी बड़ा रस लगा कर खाते हैं और दुसरों को खिलाते हैं. ये वो नगरी है जहॉं के ठग और विद्वान दोनो विश्‍व प्रसिद्घ हैं!! यो वो नगरी है जिसमे जिन्दगी का रस कुट-कुट कर भरा हुआ है, बस आप पर निर्भर है कि आप को क्या निचोड़ना है ज़रा समझिये काशी-बनारस के मिज़ाज को!! इसमे नज़ाकत भी है और शरारत भी है! जो लोग समझते हैं कि वो काशी की जनता को समझ गये है तो उन्हे ये जानना जरुरी है कि ये ठग के नाम से ऐसे ही मशहुर नही है पर अगर किसी पर दिल आ गया तो ईस चुनाव मे वोट उसे ही देगी!! काशी है ये बाबा विश्‍वनाथ की नगरी!! सम्भल कर रहना!
वाराणसीतली तरुणाई कवितेतून मग या प्राचीन शहराचे महत्व विशद करते –
कोई नहीं समझ पाया है, महिमा अपरम्पार बनारस|
भले क्षीर सागर हों विष्णु, शिव का तो दरबार बनारस॥
हर-हर महादेव कह करती, दुनिया जय-जयकार बनारस|
माता पार्वती संग बसता, पूरा शिव परिवार बनारस॥
कोतवाल भैरव करते हैं, दुष्टों का संहार बनारस|
मॉं अन्नपूर्णा घर भरती हैं, जिनका है भण्डार बनारस॥
महिमा ऋषि देव सब गाते, मगर न पाते पार बनारस|
कण-कण शंकर घर-घर मंदिर, करते देव विहार बनारस॥
वरुणा और अस्सी के भीतर, है अनुपम विस्तार बनारस|
जिसकी गली-गली में बसता, है सारा संसार बनारस॥
एक बार जो आ बस जाता, कहता इसे हमार बनारस|
विविध धर्म और भाषा-भाषी, रहते ज्यों परिवार बनारस॥
वेद शास्त्र उपनिषद ग्रन्थ जो, विद्या के आगार बनारस|
यहॉं ज्ञान गंगा संस्कृति की, सतत प्रवाहित धार बनारस॥
वेद पाठ मंत्रों के सस्वर, छूते मन के तार बनारस|
गुरु गोविन्द बुद्ध तीर्थंकर, सबके दिल का प्यार बनारस॥
कला-संस्कृति, काव्य-साधना,
साहित्यिक संसार बनारस|
शहनाई गूँजती यहॉं से, तबला ढोल सितार बनारस॥
जादू है संगीत नृत्य में, जिसका है आधार बनारस|
भंगी यहॉं ज्ञान देता है, ज्ञानी जाता हार बनारस॥
ज्ञान और विज्ञान की चर्चा, निसदिन का व्यापार बनारस|
ज्ञानी गुनी और नेमी का, नित करता सत्कार बनारस॥
मरना यहॉं सुमंगल होता और मृत्यु श्रृंगार बनारस|
काशी वास के आगे सारी, दौलत है बेकार बनारस॥
एक लंगोटी पर देता है, रेशम को भी वार बनारस|
सुबहे-बनारस दर्शन करने, आता है संसार बनारस॥
रात्रि चॉंदनी में गंगा जल, शोभा छवि का सार बनारस|
होती भव्य राम लीला है, रामनगर दरबार बनारस॥
सारनाथ ने दिया ज्ञान का, गौतम को उपहार बनारस|
भारत माता मंदिर बैठी, करती नेह-दुलार बनारस॥
नाग-नथैया और नक्कटैया, लक्खी मेले चार बनारस|
मालवीय की अमर कीर्ति पर, जग जाता,
बलिहार बनारस॥
पॉंच विश्‍वविद्यालय करते, शिक्षा का संचार बनारस|
गंगा पार से जाकर देखो, लगता धनुषाकार बनारस॥
रॉंड़-सॉंड़, सीढ़ी, संन्यासी, घाट हैं चन्द्राकार बनारस|
पंडा-गुन्डा और मुछमुन्डा, सबकी है भरमार बनारस॥
कहीं पुजैय्या कहीं बधावा, उत्सव सदाबहार बनारस|
गंगा जी में चढ़े धूम से, आर-पार का हार बनारस॥
फगुआ, तीज, दशहरा, होली, रोज़-रोज़ त्योहार बनारस|
कुश्ती, दंगल, बुढ़वा मंगल, लगै ठहाका यार बनारस॥
बोली ऐसी बनारसी है, बरबस टपके प्यार बनारस|
और पान मघई का अब तक, जोड़ नहीं संसार बनारस॥
भॉंति-भॉंति के इत्र गमकते, चौचक खुश्बूदार बनारस|
छनै जलेबी और कचौड़ी, गरमा-गरम आहार बनारस॥
छान के बूटी लगा लंगोटी, जाते हैं उस पार बनारस|
हर काशी वासी रखता है, ढेंगे पर संसार बनारस॥
सबही गुरु इहॉं है मालिक, ई राजा रंगदार बनारस|
चना-चबेना सबको देता, स्वयं यहॉं करतार बनारस॥
यहॉं बैठ कर मुक्ति बॉंटता, जग का पालनहार बनारस|
धर्म, अर्थ और काम, मोक्ष का,
इस वसुधा पर द्वार बनारस॥
मौज और मस्ती की धरती, सृष्टि का उपहार बनारस|
अनुपम सदा बहार बनारस, धरती का श्रृंगार बनारस॥
बनारसवाल्यांचं हे मनोगत पुरेसं बोलकं आहे. ह्या तरुणाईला विश्‍वास आहे, की नरेंद मोदी वाराणसीचा चेहरामोहरा असा काही सुंदर करतील, की आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन आणि धार्मिक महत्व ह्या बाबतीत प्रसिध्द असलेली काशी नगरी आणखी लोकप्रिय होईल. गुजरात मॉडेलच्या धर्तीवर वाराणसीचा विकास होईल, कायापालट होईल.
गुजरात मॉडेलबद्दल सर्वत्र बोलले जात असल्यामुळे हे गुजरात मॉडेल नक्की आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी मी आमच्या कौटुंबिक स्नेह्यांशी संपर्क साधला. कुलकर्णी कुटुंबीय गेली २४ वर्षं अहमदाबादमध्ये राहतेय्. त्यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या विस्तृत संभाषणात त्यांनी गुजरातमधल्या विकासावर प्रकाश टाकला. आम्ही मूळचे पुण्याचे. पुण्यातसुद्धा पाच मिनिटे का होईना, वीज जाते. मात्र अहमदाबादमध्येच काय, गुजरातच्या गावांतही २४ तास वीज असते. गुजरातमध्ये सुशासन, उत्तम गव्हर्नन्स आहे. गुजरातमध्ये पर्यटनावर खूप भर दिला आहे आणि पर्यटनाच्या बाबतीत गुजरातला प्रोजेक्ट करण्याच्या कामी नरेंद्र मोदी ह्यांनी मोठी मोठी माणसं जोडलेली आहेत. विरोधी पक्षांनी २००२ च्या गुजरातच्या दंग्यांवरून मोदींच्या विरोधात रान उठवलं. मात्र त्यानंतर भारतात अन्यत्र दंगे झाले तरी गुजरातमध्ये दंगे झाले नाहीत. अशा वेळी मात्र ज्या राज्यांत दंगे झाले, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे विरोधी लोक बरे चूप बसतात. गुजरात मध्ये मोदींनी देशी-विदेशी गुंतवणूक आणली. मोदींच्या गुजरातमध्ये बिझनेस कम्युनिटीला पोषक वातावरण असल्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनताहेत म्हणून अवघी व्यावसायी मंडळी खूष आहेत. आता देशाचा आणि गुजरातचा विकास होईल, असं सर्वांना वाटतंय. – कुलकर्णी सांगतात.
थोडक्यात, महागाई आणि भ्रष्टाचार ह्यांच्या चक्रात देशाला पिळून काढणार्‍या दुष्ट बलाढ्य अशा राजकीय शक्तीला जनतेनं सत्तेवरून खाली खेचून काढलंय. याआधी बिगर कॉंग्रेस सरकारांनी जे केलं, अगदी जनता पक्षाच्या कारकीर्दीत झालं तसलं काही होऊ नये, ह्यासाठी मनोमन प्रार्थना करीत सगळा देश पुन्हा एकदा स्वत:ला आश्‍वस्त करतो आहे, की अच्छे दिन आनेवाले हैं! नव्हे; अच्छे दिन आ गये हैं|
– रश्मी घटवाई

Short URL: https://vrittabharati.in/?p=13468

Posted by on May 20 2014. Filed under संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in संवाद (93 of 112 articles)


१६ मे नंतर - मे महिना देशाच्या घटनाक्रमात महत्त्वाचा राहात आला आहे. कारगिलचे युद्ध याच महिन्यात सुरू झाले होते, तर ...

×