|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.54° C

कमाल तापमान : 29.51° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 4.34 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.51° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 30.52°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.79°C - 31.42°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.78°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.22°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.13°C - 29.97°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.87°C - 29.96°C

sky is clear
Home » संवाद » नरेंद्र मोदीच का? – २

नरेंद्र मोदीच का? – २

=धनंजय केळकर=

भाग : २
शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात चांगल्या राजाचे वर्णन नेहमी एकच असायचे. “त्याने रस्ते बांधले, विहिरी खणल्या, दवाखाने काढले, धर्मशाळा बांधल्या आणि घाट बांधले.” सार्वजनिक सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही राजाची सरकारची कर्तव्येच आहेत. आणि बहुतेक राजानी आणि सरकारांनी ती केलीच आहेत. इंग्रजांपासून आत्तापर्यंत सगळ्यांनीच ती केली आहेत. मग मोदी हे विकास पुरुष कसे?
मोदी हे खरच वेगळे आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने ‘पंचवार्षिक’ योजना आखल्या. मोदींच्या योजना ‘अर्धवार्षिक’ होत्या. सहा महिने खूप झाले. सध्या कॉंग्रेसच्या योजना या शेवटच्या सहा महिन्यातील असतात. निवडणुका आल्या की कामांचा धडाका लावायचा. इतरवेळी आरामात. लोकांची मेमरी शॉर्ट असते असा गैरसमज करून घेतलाय ना. मोदींचा धडाका सर्व वेळ चालत असतो. त्या मुळे लोकांना लक्ष्यात राहते.
मोदी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पहिला प्रश्न विचारला कि राज्याची सगळ्यात मोठी गरज काय आहे. उत्तर आले, सगळ्यांना वीज देणे. पुरेशी वीज आहे का? दुसरा प्रश्न. वीज आहे. मग द्या की. उत्तर आले वीज आहे, तारा आहेत, अवरोहित्र आहेत पण खांब नाहीत पुरेसे. सहा महिने मग एकच ध्यास. जिथे कुठे खांब उपलब्ध आहेत ते शोधा मिळावा आणि वीज पुरवा.
सहा महिन्यात संपूर्ण गुजरातभर प्रत्येक गावात आणि खेड्यात, घरोघरी वीज पोहोचली. पूर्वी कॉंग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्रातून जास्त वीज खेचणारा गुजरात, आज आमच्याकडे जास्तीची वीज आहे ती केरळपर्यंत पुरवायला राष्ट्रीय वीज जाळे तयार करा म्हणून केंद्राच्या मागे लागला आहे. पण केंद्र सरकार त्यांच्या पत्राचे उत्तरच देत नाही मग काय करणार? एकही पर्याय….
रस्ते होतेच, विजेबरोबरच सगळे रस्ते पक्के झाले. जिथे नव्हते तिथेही झाले. गुजराथी कॉर्पोरेट त्यांना २४X७ मुख्यमंत्री म्हणतात. एकटा माणूस. कुटुंब-कबिला नाही. दुसरी काही व्यवधाने नाहीत. दिवसरात्र काम काम आणि काम.
संघाचे जुने प्रचारक फार कठीण असतात. तीन चार तास झोप म्हणजे खूप झाले. जास्ती झोपणे म्हणजे वेळेचा अपव्यय अशी त्यांची धारणा असते. मग वाचन हा मोठाच आधार असतो सगळ्यांना. मोदी चांगले वाचक तर आहेतच पण चांगले लेखकही आहेत. राजाच्या कर्तव्यात वाचनालये काढणे ही भाग त्यांनी वाढवला. इतकेच नाही तर वाचनाच्या प्रचारासाठी बरेच प्रयत्न केले. फादर वालेस आणि वजू कोटक यांच्यामुळे गुजरात आधीच वाचता झाला होता. मोदींनी सरकारी अधिकाऱ्यांना तर दर आठवड्याला दोन तास वाचनासाठी वेळ दिला आणि काय वाचले त्यावर भाष्य करायलाही प्रवृत्त केले.
मोदींचे मुख्य वैशिठ्य म्हणजे त्यांनी गुजरातचा एकात्मिक विकास केला. नागरिकांना जाती धर्माच्या आधाराने विचारात घेणे हे तर संघाच्याही आणि भाजपच्याही विचारसरणीत बसत नव्हते. पण मोदींनी नागरिक आणि राज्यातील जमीन, पशु, पक्षी, कारखाने आणि इतर उत्पादने हे सगळेच राज्याचा एकसंध भाग आहे असा एकात्मिक विचार केला. विकास म्हणजे फक्त नागरिकांसाठीच असा विचार ठेवला नाही. आणि या सर्व विकासात नागरिकांचा सहभाग घेतला. आज तेथील विकासात आमचाही सहभाग आहे ही भावनाही गुजरातमध्ये आहे.
जमिनीपासून सुरवात करायची तर तेथील जमीन तहानलेली होती. बरीचशी रेताड, पाऊस कमी. नद्या जोडून आणि कालव्यांचे मोठे जाळे तयार करून बराच भाग ओलिताखाली आणला. गुजरातची बरीच शेतजमीन बोअरवेलच्या पाण्यावर आहे. महाराष्ट्रात शेतीला वीज जवळ जवळ फुकट आहे. पण विजेच्या तारा टाकण्याचा खर्च परवडत नाही. १० खाम्बंपर्यंत सरकारी खर्चाने, पण अकरावा खांब आला कि सर्व ११ खांबांचे पैसे लावतात.
बोअरवेलच्या पाण्याचा प्रचंड उपसा होवून शेती खारावत होत होती. भूजलाची पातळीही बरीच कमी झाली होती. शेतीच्या विजेच्या वेगळ्या तारा टाकून ठराविक वेळेतच पंपाला वीज पुरवून त्यावर प्रतिबंध केला. २००० सालापर्यंत जेव्हढे चेक डॅम्स बांधले गेले त्याच्या दसपट डॅम्स गेल्या १० वर्षात गुजरातने बांधले. तेही लोकसहभागाने. कालव्यात २० फुट खड्डा करायचा. त्यातील माती रिकाम्या गोण्यात भरायची आणि पुढील बाजूला रचायच्या. झाला बांध तयार. रिकाम्या गोण्यांचाच काय तो खर्च. आणि रोहयोची मजुरी. लोकसहभाग असेल तर तोही खर्च वाचला. पण तहानलेली जमीन तृप्त झाली. भूजल पातळी उंचावली. पंपाच्या विजेचा खर्च कमी झाला. आज गुजरातमध्ये एकरी कापूस उत्पादन देशाच्या इतर भागांपेक्षा चाळीस टक्के जास्त आहे.
आज सरदार सरोवराला दरवाजे बसवायचे आहेत. ते बसल्यावर महाराष्ट्रालाही ४०० मेगावॅट वीज फुकट मिळेल. पण केंद्र सरकार/पंतप्रधान पत्राला उत्तरच देत नही. मग काय! एकही पर्याय….!!!
आणंद जगप्रसिध्द आणंद, जेथे दुधाचा संबंध तेथे गाई, म्हशी आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पशुवैद्य हे हवेतच. अर्थात पशु हॉस्पिटलही असणारच. या आणंदमध्ये एक सुंदरसे हॉस्पिटल पक्ष्यांसाठी आहे. पाळीव पशु-पक्षी जखमी आजारी पशु-पक्षी सगळ्यांसाठी. एकदा मोदींना त्याच्याबद्दल कळले. अधिकाऱ्यांमार्फत सगळी माहिती गोळा करून त्या धर्तीवर गुजरातभर त्यांनी पक्ष्यांसाठी दवाखाने उघडले. राज्यकर्त्यांच्या कामात आणखीन एक भर पडली पशु-पक्ष्यांसाठीही दवाखाने.
पाण्याचे दुर्भिक्ष्य संपले, जमीनही सुजलाम सुफलाम झाली. निसर्गसौंदर्य खुलले. आता हा निसर्ग अधिक आनंदायी करायला नको का! जातीभेद, धर्मभेद, तसेच पक्षभेद आणि प्रांतभेदही मोदींच्या खिजगणतीतही नाहीत. गुणग्राहकता हा राज्यकर्त्याला आवश्यक गुण त्यांच्यात ओतप्रोत भरलेला आहे. हुकुमशहा हा स्वतःलाच सर्व अक्कल आहे असे समजून वागत असतो. हिटलरचा सगळ्यात यशस्वी सेनापती रोमेलची पद्धत हिटलरला अजिबात आवडत नसे. हिवाळ्यात रशियाची स्वारी सुरू करून त्याने स्वतःचे मरण ओढवून घेतले होते. सगळ्या सेनापातींचा सल्ला धुडकावून त्याने तो निर्णय घेतला होता. मोदी तसे नाहीत. ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यं’ या न्यायानेच ते सगळ्यांकडून सल्ले घेत असतात. एखाद्याचा सल्ला चांगला वाटला तरी तो दुसऱ्या तज्ञाकडून तपासून घ्यायची काळजी ते घेतातच घेतात.
महाराष्ट्रात जयसिंगपूर येथे जगातील सगळ्यात मोठे हरितगृह आहे. तेथे हायड्रोपोनिक्सच्या सहाय्याने फुले पिकवली जातात. दादा पाटीलांची हरित नर्सरी आहे ती. त्यांचे वडील कॉंग्रेसचे आमदार आहेत. मोदींना त्याबद्दल माहिती मिळताच त्यांनी त्यांचे काही अधिकारी तेथे पाठवले. दादा पाटलांनी खूप आदरातिथ्य केले. सर्व माहिती दिली. त्या आधारावर गुजरातमध्ये हरीतगृहांची फुलांची शेतीसुरू केली. ही सगळी फुले परदेशी जात असत. मोदींनी एकरी ४५ लाख रुपये कर्ज आणि सबसिडी देवून ह्या फुलशेतीचा विकास केला.
सुरवातीला स्पर्धेमुळे भाव थोडे पडले. पण लवकरच भारतातच त्याची मोठी बाजारपेठ निर्माण केली. आजकाल लग्नांमध्ये स्टेजच्या मागील आरास या फुलांची होऊ लागलेली आपल्या नजरेस आली असेलच.
मुंबईसारख्या शहरात आजमितीला सुमारे ३०० रुग्णवाहिका पडून आहेत. पण सर्वसाधारणपणे कोणी आजारी पडला तर त्याला रीक्षा, टॅक्सी किंवा कारनेच इस्पितळात नेले जाते. रुग्णवाहिका ह्या बहुदा मेल्यावर स्मशानात नेण्यासाठीच वापरल्या जातात. तेंव्हा पुरेसा वेळ असतो ना हातात!
गुजराथेतील सर्व रुग्णवाहीकांचे जाळे पसरवून त्यांना एका नम्बरशी जोडून मोदींनी अशी व्यवस्था केली आहे कि, कुठल्याही गावात ८ ते १० मिनिटात रुग्णवाहिका पोहोचते. त्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या रुग्णवाहिका घेण्याची गरज नसते. जी व्यक्ती पक्ष्यांचीही काळजी घेते, पैश्यांचीही काळजी घेते, ती व्यक्ती माणसांची किती काळजी घेत असेल ही समजून घेण्याची गोष्ट आहे.
ह्या सर्व गोष्टी करत असताना, उद्योगधंद्यांची आणि रोजगाराच्या वाढीसाठी मोदींनी कशी योजना केली ते आणि इतर गोष्टी पाहूया पुढील भागात.
क्रमशः…..

Posted by : | on : 7 Apr 2014
Filed under : संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g