|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.95° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.13 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.66°C - 30.94°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds
Home » संवाद » रामन परिणाम

रामन परिणाम

रामन परिणाम – दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून विविध विज्ञान कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. सी. व्ही. रामन यांनी ‘रामन परिणामाचा’ शोध लावून १९३० सालचा भौतिकशास्त्राचचा नोबेल पुरस्कार भारताला मिळवून दिला. भारत देशातच अलौकिक विज्ञान संशोधन करून भारताला नोबेल पुरस्कार मिळवून देणारे चंद्रशेखर व्यंकट रामन हे पहिले भारतीय वैज्ञानिक ठरले, तसेच आशिया खंडातील पहिल्या नोबेल पुरस्काराचे सुद्धा मानकरी ठरले. या घटनेची आठवण म्हणून विज्ञान-तंत्रज्ञान विभाग भारत सरकारद्वारा २८ फेब्रुवारी हा दिवस १९८६ सालापासून भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
‘रामन परिणाम’ : बालपणापासूनच रामन यांना फुलांचे रंग निरनिराळे का? आकाश व समुद्र निळा का भासतो? सूर्याचा प्रकाश पांढराच का? चंद्राचा प्रकाश धवल पण शांत का? अशा विविध रंगांचे आकर्षण होते आणि त्यातून त्यांची चिकित्सक बुद्धी जागृत होत होती.
रामन इफेक्ट म्हणून भौतिकशास्त्रात अजरामर झालेल्या शोधाची कहाणी फारच मनोरंजक आहे. भौतिक विषयांचे प्राध्यापक या नात्याने रामन परदेशात एका संमेलनात भाग घेण्यासाठी मेडिटेरीअन समुद्रमार्गे निघाले. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे पॉकेट स्पेक्ट्रोस्कोप सारखी उपकरणे बरोबर घेतली होती. असाच प्रयोग चालू असताना त्यांच्या लक्षात आले की, समुद्राच्या निळ्याशार रंगाच्या मागे पाण्याच्या थेंबाद्वारे होणारे सूर्यप्रकाशाचे विकिरण कारणीभूत आहे. कलकत्त्यास परतल्यावर त्यांनी यावर सखोल संशोधन सुरू केले आणि चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी जगमान्य ‘रामन प्रभावाचा’ शोध लावला. एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकला असता त्याचे परावर्तन होते. या परावर्तित प्रकाशामध्ये काही विशिष्ट लक्षणं असतात, ही वास्तवात प्रकाश परावर्तित करणार्‍या वस्तूची असतात. १९२८ च्या इंडियन जनरल ऑफ फिजिक्समध्ये याबाबत लेख प्रकाशित झाला आणि त्यांच्या या शोधाचे सर्वत्र स्वागत झाले. त्या काळात ‘रामन परिणामाचा शोध’ लावण्यासाठी सर सी.व्ही. रामन यांना फक्त दोनशे रुपयाचे साहित्य लागले होते.
हल्ली रामन परिणामाचा अभ्यास करण्यासाठीच लाखो रुपयाच्या साधन सामुग्रीचा उपयोग आधुनिक विज्ञान संस्थेत होत आहे. रामन यांनी पार्‍यापासून निघालेल्या प्रकाशाचा उपयोग करून तो एकाच रंगाचा प्रकाश यांनी एका भांड्यात असलेल्या बेंझीन व टोल्यूनसारख्या निरनिराळ्या द्रवामधून पाठविला. प्रकाशाचे विकिरण झाल्याने पतन किरणाच्या रंगीत रेषेच्या दोन्ही बाजूला नवीन रेशा रंगपटलावर आढळल्या. याच रेषेला आपण रामन लाईन्स असे संबोधतो.
‘अर्ली लाईफ ऍण्ड टाईम’ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म इ. स. ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तामिळनाडू राज्यातील त्रिची शहराजवळील एका गावात झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर स्थानिक शाळेत इंग्रजी विषय शिकवीत, तर आई पार्वती अम्माला भारतीय संगीतात विशेष रुची होती. कालांतराने चंद्रशेखर व्यंकट रामन कुटुंबासोबत विशाखापट्टणम शहरात स्थायिक झालेत व तेथेच चंद्रशेखरच्या वडिलांना प्राध्यापक म्हणून खाजगी संस्थेतून नोकरी मिळाली. त्यावेळी चंद्रशेखर यांचे वय केवळ तीन वर्षाचेच होते. शाळेतील अभ्यासात रामन बालपणापासूनच हुशार होते. विज्ञान हा रामन यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. रामन यांची बौद्धिक क्षमता पाहून त्यांच्या शाळेतील शिक्षकही आश्‍चर्य व्यक्त करीत. कुशाग्र बुद्धी व चिकित्सक वृत्तीच्या रामनच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे त्यांच्या शिक्षकांच्या दृष्टीने खरोखरच अवघड झाले होते. याचाच परिणाम म्हणजे त्यांना सलग तीन वेळा वरच्या वर्गात टाकण्यात आले. रामन यांनी १२ व्या वर्षीच उच्च माध्यमिक परीक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण केली आणि १८ व्या वर्षीच पदव्युत्तर पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत मेरिट सूचीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. ते विवाहित होते व त्यांच्या पत्नीचे नाव लोकसुंदरी अम्माल होते. डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन, महिलांनी विज्ञानात संशोधन करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध होते. ते नेहमी म्हणत, विज्ञान संशोधन महिलाचे क्षेत्र नव्हे, महिलांनी चूल व मूल सांभाळून आपली योग्यता सिद्ध करावी.
‘भारतीय संस्कृतीवर श्रद्धा’ : वैज्ञानिक दृष्टी असूनही रामन यांची भारतीय संस्कृती आणि परंपरांवर अढळ श्रद्धा होती. परदेशी संस्थांचा भरपूर आर्थिक लाभाच्या प्रस्तावाला ठोकर मारून त्यांनी भारतात संशोधन करून देशप्रेम व्यक्त केले. नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यावर सुद्धा डॉ. रामन डोक्यावर पगडी, अंगात कोट व त्यावर टाय बांधीत, तर फुलपँटऐवजी दक्षिण भारतीय पोषाख म्हणून पांढरी स्वच्छ लुंगी परिधान करीत. इ. स. १९५४ साली भारत सरकारने डॉ. रामन यांना भारतरत्न हा किताब देऊन त्यांच्या विज्ञान कार्याचा गौरव केला.
इ. स. १९५३ साली डॉ. रामन यांच्या रामन परिणामाच्या शोधाची सिल्वर जुबिलीच्या कार्यक्रमाप्रीत्यर्थ पॅरिस शहरी गेले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना जेवणासोबत एक ग्लास शॅम्पेन व्हिस्की पिण्याकरता दिल्या गेली. डॉ. रामन कट्टर शाकाहारीच, कधीच मद्य न घेणारे असल्यामुळे त्यांनी शॅम्पेन पिण्यास नकार दिला आणि ते इतर सहकारी वैज्ञानिकांना म्हणाले, ‘‘आपल्याला अल्कोहालवर रामन परिणामाची कल्पना असली तरी आपणास अल्कोहोलचा रामनवर परिणाम बघता येणार नाही. याचा खेद आहे.’’ या त्यांच्या संवादाने उपस्थित सर्व वैज्ञानिक चकित झाले.
रामन परिणामाची सर्वत्र उपयोगिता : रामन परिणामाच्या शोधाचे अनन्य साधारण महत्त्व विज्ञानात आढळून आले. तथा रामन इफेक्टचा उपयोग निरनिराळ्या मूलद्रव्याचे गुणधर्म माहीत करण्यात होऊ लागला. रामन परिणाम मूलत: प्रकाश ऊर्जा व पदार्थ यामधील दुवा ठरला. रामन इफेक्टच्या शोधामुळे अणुरेणूमधील इलेक्ट्रॉन्सच्या ऊर्जा स्थितीची माहिती मिळविता येऊ लागली. रामन इफेक्ट ही निसर्गाची मूलभूत पद्धती असून त्याचा अभ्यास सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त क्ष किरण किंवा गॅमा किरणाद्वारे सुद्धा करता येणे शक्य आहे. ज्या किरणांची वारंवारता सूर्यप्रकाशापेक्षा सुद्धा कमी आहे. अशा मायक्रोवेव्ह, रेडिओवेव्ह यांच्याकरिता सुद्धा रामन इफेक्ट लागू पडतो. एकंदरीत रामन परिणामाची उपयोगिता संपूर्ण ब्रह्मांडात सर्वत्र अनुभवता येते.
बालपणी रामनला त्याच्या आईने संगीत शिकविले असल्यामुळे त्यांना वीणा, सरोद, तबला-डग्गा इत्यादी वाद्ये उत्तम प्रकारे वाजविता येत होते. तबल्यावर लायकोपोडियम पावडरचा थर टाकून आणि हाताने तबला वाजवून रामन निरनिराळे लहरींचे पॅटर्न तबल्यावर तयार करून उपस्थितांना दाखवीत असत. पियानोमधून निघणार्‍या स्वरांवरही सी. व्ही. रामन यांनी संशोधन केलं. पियानोमधील हातोडी तारेला स्पर्श करते तो काळ जिथे स्पर्श करते ती जागा यांचा परस्परसंबंध, तसेच हातोडीने तारेवर आघात करण्यासाठी वापरलेले बल व आघाताचा काळ यांच्या परस्पर संबंधावर प्राध्यापक रामन यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग करून आपले शोध प्रबंध एलिमेंटन्स ऑफ म्युझिकल स्केल नामक विज्ञान ग्रंथात प्रकाशित केले.
‘चरित्र आणि विज्ञान’ : एकदा रामन यांना विज्ञान संस्था सुरू करण्यासाठी काही तरुण विज्ञान पदवीधारकांची आवश्यकता भासली. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रात त्या पदासाठी जाहिरात दिली. ती वाचून त्यांच्याकडे अनेक अर्ज आले. त्यातील काही अर्जाची छाननी करून काही उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले. यात एका उमेदवाराला विज्ञानातील साधे साधे प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारकपणे देऊ न शकलेल्या त्यांनी अस्वीकार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी रामन आपल्या कार्यालयात आल्यावर तोच युवक त्यांना कार्यालयात वावरताना दिसला. रामन यांना त्या युवकाचा राग आला. रागारागानेच त्या युवकाला म्हणाले की, मी तुम्हाला काल रिजेक्ट केले आहे तेव्हा तुम्ही इथं का फिरत आहात, घरी जा व अभ्यास करा. इथे तुम्हाला नोकरी मिळणार नाही. यावर तो युवक विनम्रपणे म्हणाला, ‘सर माफ करा. मला इथपर्यंत येण्याचा जो भत्ता देण्यात आला तो चुकून जास्त दिला गेला आणि तो परत करण्यासाठी मी कार्यालयीन क्लर्कची वाट बघत आहो.’ त्या युवकाचे हे उत्तर ऐकून रामन चकित झाले. थोडा विचार करून ते म्हणाले, ‘मिस्टर मी तुझीच निवड केली आहे. तू एक चरित्रवान युवक आहे. भौतिकशास्त्रात तू थोडा कमजोर आहे ते मी तुला शिकवून देऊ शकेल. पण संस्थेकरता चरित्रवान युवक मिळणे कठीण आहे.’ संस्थेच्या प्रगतीत प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते याची साक्ष रामन यांनी दिली.
आयुष्याच्या सायंकाळी : इ. स. १९३३ साली डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी कलकत्ता येथील आपले कार्य आटोपून भारतीय विज्ञान संस्था बंगलोर या संस्थेचे पहिले भारतीय संचालक म्हणून पदभार ग्रहण केला. इ. स. १९३७ साली या संस्थेच्या चालकासोबत वाद निर्माण झाल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला, पण पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी बंगलोर येथील विज्ञान संस्थेत इ. स. १९४८ सालापर्यंत कार्य केले. कलकत्ताप्रमाणेच डॉ. रामन यांनी बंगलोरला सुद्धा रामन संशोधन केंद्राची निर्मिती केली. अशा या महान भारतीय पदार्थ वैज्ञानिकाला इ. स. २१ नोव्हेंबर १९७७ रोजि वयाच्या ८२ व्या वर्षी हृदविकाराच्या झटक्याने स्वर्गवास घडला असला तरी मरताना सुद्धा त्यांच्या हातात विज्ञानाचे पुस्तक आढळले. विज्ञानात आपण रामन इफेक्टचे अध्ययन करू तेव्हा डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. डॉ. रामन यांचे चारित्र्य नवीन भारतीय पिढीला निश्‍चितच प्रेरणादायी आहे. अशा विज्ञान महर्षीपासून प्रेरणा घेऊन विज्ञानात मूलभूत संशोधन करणे, ही काळाची गरज नाही का?
– प्रा. प्रकाश माणिकपुरे

Posted by : | on : 9 Mar 2014
Filed under : संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

1 Comment for “रामन परिणाम”

  1. अत्यंत उपयुक्त व समग्र माहिती वरील लेखातून मिळाली. शतश:धन्यवाद.

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g