Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » पेहराव असावा व्यक्तिमत्वाचा आदर राखणारा

पेहराव असावा व्यक्तिमत्वाचा आदर राखणारा

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : १

MRINAL DRESSING ARTICLE1रात्रीचे ९ वाजले होते आणि मला पूर्वाचा फोन आला. काही क्षण काळजी वाटली. मी फोन घेतला, पूर्वा घाईघाईने म्हणाली, “सॉरी मॅडम उशिरा फोन केला. पण मला कळत नाहीए की उद्या मी काय ड्रेस घालू. माझा इंटरव्ह्यू आहे उद्या एका कंपनीमध्ये. प्लीज मला सांगा ना!”. अनेक तरुणींची या पुर्वासारखी स्थिती नेहमीच होते. आपल्याला गोंधळून जायला होत की, कामाच्या ठिकाणी किंवा इंटरव्ह्यूला जाताना नक्की काय आणि कशाप्रकारचे कपडे घालावे. आजकाल भारतामध्ये खूप मल्टिनॅशनल कंपनीज़ आहेत ज्या सर्वच क्षेत्रात स्त्रियांसाठी करियरच्या संधी देत आहेत. अशा कंपनीमध्ये काम करताना आपण एक भारतीय स्त्री आहोत इतकाच विचार करून चालणार नाही. तर तिथे कसे व्यवसायिक वातावरण आहे ते देखील पाहिलं पाहिजे. उदा. बँकिंग क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रीला सतत लोकसंपर्कात राहावं लागू शकत आणि म्हणून तिचे कपडे नुसते नीटनेटके असून चालणार नाही तर ते तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर राखणारे असावेत. म्हणूनच आपण पाहतो की खूपश्या कंपनीज़मध्ये सर्वच कर्मचाऱ्यांसाठी यूनिफॉर्म असतो. पण, जर आपल्या ऑफिसमध्ये यूनिफॉर्म नसेल, तरी आपण आपल्या व्यवसायाला, नोकरीला साजेसे आणि आपले सौंदर्य वाढवतील, आपला आत्मसन्मान वाढवतील असे कपडे घालू शकतो.
सलवार कमीज :-
पुर्वी साडी हा अत्यंत आवडीचा आणि सर्रास वापरला जाणारा पोशाख. पण गेल्या काही वर्षात त्याची जागा सलवार कमीजने घेतली आहे. सलवार कमीज अत्यंत सोबर, सोयीस्कर आणि पूर्ण अंग झाकणारा पेहेराव आहे. त्यात इतके नानाविध प्रकार उपलब्ध आहेत की आपल्या व्यक्तिमत्वाला खुलवतील असे रंग आणि प्रकार आपण वापरु शकतो. पण शक्यतो ऑफीसमध्ये शॉर्ट टॉप घालण्याचे टाळा. आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार दुपट्टा घ्या.
रोज फेस्टिवल मूडचे सलवार कमीज घालणेही योग्य वाटत नाही. मीटिंग्स, सेमिनार किंवा अन्य प्रसंगाला साजेसे सलवार कमीज घातले तर त्या त्या प्रसंगी आपला कॉनफिड्न्सही वाढेल आणि आपण आपल्या ग्रूपमध्ये उठूनही दिसाल. आपल्या कामाचे स्वरूप, आपल्या स्किन कॉम्प्लेक्शननुसार कलरची निवड करता येईल.
साडी :-
साडी हा खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीचे व्यक्तिमत्व उठावदार करणारा पेहेराव! लग्नकार्यामध्ये आपण साडी आवर्जून नेसतो. तसेच ऑफिसमध्येही रोज अथवा खास प्रसंगी साडी नेसल्यास आपली छाप पडेल. क्रेप, सेमी सिल्क, कॉटन, शिफ्फॉन अशा अनेक प्रकारच्या साड्या आपण ऑफिससाठी सर्रास वापरु शकतो. आपल्या व्यक्तिमत्वानुसार रंगसंगती, डिझाइन याची निवड करायला आज मार्केटमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात साडी नेसणे ही पण एक कला आहे. टीवी सिरीयलप्रमाणे मोठे पदर घेणे टाळावे; कारण त्यामुळे आपण छान दिसलो तरी कामात अडथळा येऊ शकतो आणि एकप्रकारचा इन्फॉर्मल फील येतो.
वेस्टर्न फॉर्मल्स :-
आजकाल खूपशा ऑफिसेसमध्ये वेस्टर्न फॉर्मल्स घालणे बंधनकारक असते. ट्राउज़र व फॉर्मल शर्ट / कॅजुअल शर्ट, फॉर्मल स्कर्ट्स असा देखिल यूनिफॉर्म असतो. कामाच्या स्वरूपानुसार ऑफिस असा यूनिफॉर्म ठरवते. आपण कधी कधी या प्रकारच्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसतो. तेव्हा आपण हे सवयीने शिकले पाहिजे की वेस्टर्न काय कोणतेही कपडे आपल्याला कॅरी करता आले पाहिजेत म्हणजे आपण त्यात सहजतेने वावरतोय अस वाटल पाहिजे. तरच ते आपल्याला छान दिसतात आणि आपला आत्मविश्वास वाढवतात. अन्यथा, ते कपडे सांभाळण्याचे एक काम होऊन बसते आणि आपले आपल्या कामात लक्ष लागत नाही.
आणखीन एक खूपच महत्वाचा मुद्दा : कोणतेही कपडे निवडताना ते आपल्या ऑफिसमध्ये आपल्या पदाचा, हुद्द्याचा आब राखतील याची काळजी घ्या!! केवळ व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल हा भाग नसून आपल्यापबद्दल जनसामान्यात, सहकाऱ्यात आपला आदर वाढेल असेच कपडे निवडा!

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=20268

Posted by on Feb 3 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (97 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• योजना आयोग बंद करुन आणि नीती आयोग सुरु करुन याची सुरुवात मोदी यांनी केली आहे. अशा ...

×