Home » सोलापूर » आनंद बनसोडे किलीमांजारोवर तिरंगा फडकविणार

आनंद बनसोडे किलीमांजारोवर तिरंगा फडकविणार

सोलापूर, [७ ऑगस्ट] – सोलापूरचा आनंद बनसोडे आता दक्षिण आफ्रिकेतील सव्र्वोच्च शिखर असलेले ‘किलीमांजारो’ वर शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवून भारताचे राष्ट्रगीत वाजविणार आहे. त्यानित्ताने शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी तो या मोहिमेवर रवाना होत असल्याची माहिती उद्योजक प्रमोद साठे, अभियंता राजेश जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एव्हरेस्टवीर, एब्रुसवीर अशी ख्याती मिळविल्यानंतर अवघ्या क ाही दिवसातच किलीमांजारो सर करण्याची घोषणा आनंद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. एकाच महिन्यात दोन खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा हा विक्रम होणार आहे. किलीमांजारो हे १९ हजार ३४१ फू ट उंच असून आनंद बनसोडे हा एकटा चढाई करणार आहे. निसर्ग वाचवाचा संदेश यानिमित्ताने तो देत आहे.
दक्षिण आफ्रिका खंडातील किलीमांजारो हे टांझानिया या देशात असून त्याच्या उत्तरेला ज्वालामुखी पर्वत आहे. याला उथरु शिखर असेही म्हणतात. हा पर्वत तीन जिवंत ज्वालामुखींनी बनलेला आहे. यातील किलीमांजारो हा जगातील सर्वात मोठा फ्रि स्टॅडिंग प्रकारचा पर्वत आहे. येत्या वर्षभरात आणखी काही शिखरे सर करण्याची घोषणा आनंद बनसोडे यांनी केली. यंदाच्या मोहिमेचे प्रायोजकत्व पुण्यातील मूळचे सोलापूरचेच असलेले बांधकाम व्यावसायिक प्रमोद साठे यांनी स्वीकारले आहे.
पत्रकार परिषदेस सतीश देशमुख, प्रा. मनोहर साठे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमाकांत गुंड आदी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14814

Posted by on Aug 7 2014. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (7 of 9 articles)


=‘मातोश्री’ वर झाला शिवसेना प्रवेश= सोलापूर, [६ ऑगस्ट] – अखेर सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे पक्षनेते महेश कोठे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज ...

×