किमान तापमान : 28.97° C
कमाल तापमान : 30.32° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 5.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.32° C
27.79°C - 31.42°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clear27.22°C - 30.15°C
sky is clear=दारू, मादक द्रव्यांचा महापूर=
नवी दिल्ली, [१ मे] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सेक्स रॅकेटचा अड्डा झाले असून विद्यापीठात दारू आणि मादक द्रव्यांचा विद्यार्थ्यांकडून सर्रास वापर होत असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच जाहीर झाला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ११ प्राध्यापकांनी शिक्षकांनी २०० पानांचा एक अहवाल तयार केला असून विद्यापीठ म्हणजे संघटित सेक्स रॅकेट चालविणारा अड्डा बनल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल २०१५ मध्येच तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रसार माध्यमांना तो इतक्यातच उपलब्ध करून देण्यात आला, एवढेच नव्हे तर हा अहवाल जेएनयू प्रशासनालाही सोपविण्यात आल्याची माहिती आहे. प्राध्यापकांच्या या गटाचे नेतृत्व सेंटर फॉर लॉ ऍण्ड गव्हर्नेंसच्या प्रा. अमिता सिंह करीत आहेत. जेएनयूच्या वसतिगृहातील मेसमध्ये सेक्स वर्कर्सचे जाणे-येणे ही नेहमीचीच बाब असल्याचे अमिता सिंह यांनी सांगितले. या सेक्स वर्कर्स आपले रॅकेट चालविण्यासाठी जेएनयूच्या विद्यार्थिनींना पैशाचे आमिष दाखवितात, असेही अमिता सिंह यांनी नमूद केले.
प्रा. सिंह यांच्या म्हणण्यानुसार एक हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मद्यप्राशन केल्याबद्दल तसेच अन्य अनैतिक कारवायांसाठी दोन ते पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर वसतिगृहाच्या फाटकाजवळ दारूच्या शेकडो बाटल्या पडल्या असतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
वसतिगृहाच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत बड्या आणि महागड्या गाड्या फिरत असतात हे कसे काय, असा सवालही प्रा. अमिता सिंह यांनी उपस्थित केला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये काही सुरक्षा कर्मचारीही सहभागी आहेत, असेही प्रा. सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, प्रा. अमिता सिंह यांनी विद्यापीठाचे व वसतिगृहाचे नेमके वास्तव जगापुढे आणल्याने डाव्या विद्यार्थी संघटनांचा तीळपापड उडाला आहे. या संघटना प्रा. सिंह यांच्याविरुद्ध थयथयाट करीत आहेत. जेएनयूमध्ये बुधवारी संध्याकाळी प्रा. अमिता सिंह यांचे आक्षेपार्ह पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले. हे हँडमेड पोस्टर्स डाव्या विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी लावले असल्याचे सांगण्यात येते. या पोस्टर संदर्भात ११ प्राध्यापकांच्या चमूने एक अहवाल तयार केला असून तो विद्यापीठ प्रशासनाच्या सुपूर्द केला आहे. काही शिक्षक-प्राध्यापकांच्या वर्तनामुळे जेएनयू परिसरातील वातावरण खराब होत असल्याचे सांगण्यात येते. विद्यापीठ परिसर मादक द्रव्य सेवन करणार्यांचा अड्डा बनला असून देशाच्या कानाकोपर्यातून येणार्या गरीब विद्यार्थ्यांचा फायदा उठवून, त्यांना धाकात ठेवून सर्व अनैतिक प्रकार चालतात, अशी माहिती आहे.