किमान तापमान : 26.82° से.
कमाल तापमान : 29.6° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.6° से.
24.56°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 27.77°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 28.69°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.61°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.44°से. - 28.39°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.18°से. - 28.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल=मर्कट टोपी घालून आले होते बंदुकधारी=
लुधियाना, [१८ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेयक संघाच्या येथील शाखा मैदानावर आज सोमवारी सकाळी साडेसहा वाजता अज्ञात समाजकंटकांनी बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. तथापि, यात कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान, स्थानिक शाखाप्रमुख हल्लेखोरांचे लक्ष्य होते, असा प्राथमिक निष्कर्ष सीसीटीव्ही फुटेजवरून काढण्यात आला आहे.
सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी मोटारसायकलवरून दोन तरुण आले आणि त्यांनी शाखा मैदानाच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी संघाची शाखा सुरू झालेली नव्हती. तसेच मैदानावर स्वयंसेवकही नव्हते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. तथापि, या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांनी गोळीबाराचे दृश्य कैद केले. शाखा प्रमुखांची कार त्याचवेळी तिथे आली असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. हल्लेखोर माकड टोपी घालून असल्याचे त्यांचे चेहरे मात्र कॅमेरात बंद होऊ शकले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. दोन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पिस्तूलमधील एक रिकामे काडतूस ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त नरिंदर भार्गव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर संघाच्या स्थानिक पदाधिकार्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मे १९९१ मध्ये येथील ड्रेसी संघ शाखेवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. यात पाच स्वयंसेवकांचा मृत्यू, तर अन्य १५ स्वयंसेवक गंभीररीत्या जखमी झाले होते.