किमान तापमान : 27.99° C
कमाल तापमान : 28.04° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 83 %
वायू वेग : 1.96 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.97°C - 31.27°C
scattered clouds27.87°C - 30.99°C
sky is clear28.03°C - 31.68°C
sky is clear28.53°C - 32.95°C
few clouds29.04°C - 32.88°C
sky is clear28.94°C - 32.71°C
sky is clearनवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – जातीयवादी शक्तींपासून मुस्लिमांना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे सांगत, जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी दिल्लीतील मुस्लिमांनी केवळ आम आदमी पार्टीलाच मतदान करावे, असा फतवा जारी केला आहे. तथापि, आपने बुखारींचा पाठिंबा घेण्यास नकार दिला.
दिल्लीत प्रामाणिक आणि धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेवर यावे आणि त्यासाठी मुस्लिमांना मोठी भूमिका पार पाडायची आहे. समाजाचे विभाजन करणार्या शक्तींनाच भाजपाने आपला पाठिंबा दिला असल्याने दिल्लीतील मुस्लिमांनी या पक्षाला मतदान करू नये. केवळ आपलाच मतदान करावे, असे बुखारी यांनी आज शुक्रवारी जारी केलेल्या फतव्यात म्हटले आहे. देशाला जातीयवादाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान मुस्लिमांचेच होणार आहे, असेही त्यांनी यात नमूद केले आहे.
दरम्यान, आपचे नेते संजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्हाला जाती-धर्मावर आधारित राजकारण करायचे नाही. त्यामुळे आम्ही बुखारी यांनी देऊ केलेला पाठिंबा नाकारत आहोत. बुखारी यांची विचारधारा आम्हाला मुळीच मान्य नाही. आम्हाला धार्मिक पाठिंबा नको. देशवासीयांचा पाठिंबा हवा आहे.