|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.45° C

कमाल तापमान : 31.81° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 53 %

वायू वेग : 4.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.81° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.09°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.84°C - 30.5°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.88°C - 30.57°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.07°C - 30.5°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.09°C - 31.79°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.08°C - 32.94°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » ‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

टोकियो, (६ फेब्रुवारी) – सोनी कंपनीने इलेक्ट्रॉनिक व्यापारात होत असलेल्या तोटा कमी करण्यासाठी आखलेल्या पूर्व निर्धारित योजनेनुसार ५००० कामगारांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एकूण ९८८ दशलक्ष डॉलरचे वार्षिक खर्च असलेल्या संगणक आणि दूरदर्शन संच उत्पादनाच्या प्रकल्पाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनी कंपनीचा संगणक विभाग जपान औद्योगिक भागीदारांना विकली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी जपान औद्योगिक भागीदारांकडून एका स्वतंत्र कंपनीची स्थापना देखील केली जाणार आहे. या कंपनीत सोनीचे पाच टक्के समभाग राहणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जुलै २०१४ पासून दूरदर्शन संच उत्पादन करणार्‍या विभागाचे देखील एका स्वतंत्र कंपनीत विभाजन करण्यात येणार असल्याचे यावेळी कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. या विभागामुळे कंपनीला मागील दहा वर्षांत ७.५ लक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. या दोन कंपन्यांच्या विभाजनामुळे मार्च २०१५ पर्यंत कंपनीतील जवळपास पाच हजार कर्मचार्‍यांना कमी केले जाणार आहे. सोनी कंपनीची स्थापना कोझु हिराय यांनी १७ वर्षांपूर्वी केली होती. ऍपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी संगणक तसेच दूरदर्शन संच क्षेत्रात तगडे आव्हान निर्माण केल्याचा परिणाम सोनी कंपनीवर झाला असून वार्षिक खर्चातील तसेच कर्मचार्‍यांच्या कपातीद्वारे कंपनीतर्फे झालेला तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी, या क्षेत्रातील पॅनासॉनिक आणि शार्प या दोन कंपन्यांनी देखील अशाच पुनर्बांधणी योजनेचा अवलंब करत कंपनीचा तोटा भरून काढला होता.

Posted by : | on : 7 Feb 2014
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Related posts

Comments are closed