|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.39° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 89 %

वायू वेग : 0.86 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.29°C - 30.88°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.25°C - 31.92°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.02°C - 30.8°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.16°C - 29.49°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

26.7°C - 29.92°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27°C - 29.53°C

sky is clear
Home » युवा भारती » नातं जपा, नात जगा

नातं जपा, नात जगा

आजचं एकविसावं शतक म्हणजे कॉम्प्युटरचं युग. हल्ली माणसं देखील कॉम्प्युटरप्रमाणे वागायला लागली आहेत. तंत्रज्ञानाच्या या काळात नातेसंबंधातला ओलावा कमी होत चालला आहे अशी ओरड नेहमीच होत असते. हल्लीची पिढी नातेसंबंध वगैरे पार विसरून गेली आहे, असली वाक्ये तर कायम आपल्या कानावर आदळत असतात. मात्र, असं नाहीये. आजही नात्यांमधला ओलावा कायम आहे. उलट अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे ही वीण अधिकाधिक घट्ट होतेय्.
जुन्या परंपरावादी लोकांनी आपल्या विरुद्ध कितीही ओरड केली तरी आपली पिढी त्यांच्या या मावळत्या विरोधाला न जुमानता स्वत:च्या वेगळ्या वाटा धुंडाळण्यात गुंग असते. बरेचदा असं म्हटलं जातं की, आपल्या पिढीला नातीगोती जपता येतंच नाही. ज्येष्ठांचा आदर, भारतीय संस्कृती वगैरे गोष्टी आजच्या तरुण पिढीला माहितीच नाहीत. असे एक ना अनेक शाब्दिक वार आपल्यावर होत असतात. या मुद्यांचा विचार केल्यावर लक्षात येतं की, आपले ज्येष्ठ, वरिष्ठ जे काही म्हणतात ते थोड्या फार प्रमाणात बरोबर असेलही. पण त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे, असे म्हणता येणार नाही.
खरे तर आजची पिढी प्रत्येक नात्याला खूप जास्त महत्त्व देत असते. एखाद्या नात्याप्रति वाटणार्‍या भावना व्यक्त करण्यात देखील आजची पिढी मागे नाही. पूर्वीचे लोक मनातल्या भावना बोलायलाच किती तरी वर्ष लावायचे. मात्र, आजची पिढी मनातलं स्पष्टपणे मांडून नात्यांमधील पारदर्शकता वाढवीत आहे. आजच्या पिढीच्या मनात जे असतं तेच तोंडावर असतं. कदाचित जुने, रूढिवादी लोक याला चुकीचं ठरवीत दुषणं देतील. मात्र, मनात एक आणि तोंडावर दुसरंच काही तरी असं असण्यापेक्षा नात्यात स्पष्टता असलेली कधीही चांगली नाही का?
आपलेसे झालेले डे कल्चर
मित्रांनो, आज या सर्व गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे येत्या रविवारी येऊ घातलेला फ्रेंडशिप डे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हटला की, तरुणाईला वेध लागतात ते फ्रेंडशिप डेचे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून भारतात वेगवेगळ्या डेंनी पदार्पण केलं आणि पाहता-पाहता आपण या संस्कृतीला आपलंसं करून घेतलं. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे प्रमाणेच रोज डे, हग डे सारखे नवनवीन डे थाटात साजरे होऊ लागले. तसेही आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे. त्यामुळे या प्रकारच्या नवनवीन डेंचे भारतात स्वागत होणे स्वाभाविकच होते, असो. आपण साजरा करीत असलेल्या लहान-सहान गोष्टींतून आनंद कसा मिळवायचा हे खरे तर या जुन्या पिढीने आपल्या पिढीकडून शिकायला हवे. या डे कल्चरला काही जणांचा आक्षेप असला तरी, यातून चांगले काही मिळते, जगण्याचा नवीन आनंद मिळतो, नवीन उमेद मिळते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
नवा दृष्टिकोन आवश्यक
दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. डे कल्चरचा विचार सोडून एका नवीन दृष्टिकोनातून याला पाहण्याची गरज आहे. आज शिक्षणाच्या निमित्ताने लाखो विद्यार्थी आपले शहर सोडून दुसर्‍या शहरात जातात. तिथे त्यांना सारेच अनोळखी असतात. दररोजचा जगण्याचा आनंदही त्यांच्यासाठी नवखाच असतो. अशावेळी त्यांना खर्‍या अर्थाने मदत होते ती मित्र-मैत्रिणींचीच. मित्रांची जागा त्या शहरात असलेले आपले नातेवाईकही घेऊ शकत नाहीत. हे नातंच वेगळं असतं. त्यामुळे अशांसाठी फ्रेंडशिप डे हा दिवस काही वेगळाच असतो. बाहेरगावी हॉस्टेलवर झालेली एखादी लहानशी ओळख जन्मभराच्या मैत्रीत परिवर्तित होऊन जाते. रूम पार्टनर म्हणून तीन वर्ष सोबत असलेला एखादा पार्टनर आपल्याला नातेवाईकांपेक्षाही जवळचा वाटायला लागतो.
नात्यातला आनंद लुटायला हवा
नातं हे कुठलही असो, त्या नात्यातला आनंद अनुभवता आला पाहिजे. तो वाटता आला पाहिजे. कुठलंही नातं फुलविण्यासाठी आवश्यक असतं ते नातं जगणं. जी व्यक्ती नातं जगू शकत नाही त्या व्यक्तीला नातं काय आहे हेच कळले नाही असे समजावे. आपली आजची पिढी प्रत्येक नात्याला सेलिब्रेट करू इच्छितेय्. यात चुकीचं असं काहीच नाही. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, वगैरे काही जणांसाठी शो ऑफ असतील. काही जण या गोष्टींची काय गरज आहे, ही आपली संस्कृती नव्हे असेही म्हणतील. पण या सर्वांना एक प्रश्‍न आवर्जून विचारावासा वाटतो की, केलं आपल्या भावनांचं, नात्यांचं सेलिब्रेशन तर काय बिघडलं? उलट या प्रकारच्या सेलिब्रेशनमुळे नाती अधिक घट्ट होतात. त्या नात्यावर साचलेला जंग साफ होऊन चकाकी येते. आई-वडिलांप्रति आपल्या मनात असलेला आदर त्यांना एखादं गुलाब देऊन व्यक्त केला तर त्या चुकीचं काय आहे? बर्‍याच दिवसांपासून बोलायचं होतं पण नेमका क्षण येईना त्यासाठी असा एखादा दिवस निमित्त होत असेल तर अशा डे कल्चरला विरोध का म्हणून करायचा?
मैत्रीसारखे दुसरे नाते नाही
‘ज्याला आय नाय त्याला काय नाय…’ हे दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातलं वाक्य आठवतंय्? मैत्रीचं सुद्धा असंच आहे. ज्याला मित्र नाही त्याला काहीच नाही. दिवसेंदिवस वाढणारी टेन्शन्स घालवण्यासाठी मैत्रीसारखा दुसरा कोणताच चांगला आधार नाही. आई असो की बाबा, ताई असो की दादा… प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतातच. पूर्वीच्या काळात असलेलं आई-वडील आणि मुलं यांच्यातलं अंतरही आता कमी झालंय्. दोघेही मुलांशी मित्राप्रमाणे वागू लागले आहेत, वागण्याचा प्रयत्न करताहेत. याला काही अपवादही असतील. मात्र, यामुळे दोन पिढ्यांमधला दुरावा कमी होत असल्याचं जाणवतं आहे. असं म्हणतात की, आपल्या हातून काही चूक झाल्यास पाठीवरून प्रेमाच्या मोरपिसाने हात फिरवणारी आई आणि ‘पुन्हा असं करू नकोस’ असं म्हणणारे बाबा आपल्याला सांभाळून घेतात. बरेचदा या आई-वडिलांची उणीव जिवाभावाचे मित्र भरून काढतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरीत कामाचं… ज्याला त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. अभ्यास, नोकरी यात दिवसातले दहा तास घराबाहेर जातात. यामुळे ही टेन्शन्स कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मित्रासारखा दुसरा कोणताही घटक नसतो. आई-वडील रागावले, बॉसशी भांडण झालं तरी या विषयी चर्चा करायला सगळ्यात जवळचा वागणारा ‘मित्र’च असतो.
नेट थेट नाते
ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, जी टॉक यांमुळे आपण एकमेकांच्या फार जवळ आलोय्. सोशल नेटवर्किंगच्या जगात सर्वच आभासी आणि खोटं असतं, असं म्हटलं जात असलं तरीही या माध्यमातून होत असलेलं शेअरिंग फार महत्त्वाचं आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीची आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट येते, आपण ती स्वीकारतो. काही दिवासांतच आपलं रोज त्या अनोळखी व्यक्तीशी चॅटवर बोलणं सुरू होतं. हळूहळू आपण खुलू लागतो. रोज घडणार्‍या गोड, कडू, आंबट किस्स्यांचं शेअरिंग होऊ लागतं. कधी-कधी हे ऑनलाईन मित्र हळूच आपल्या मनाला स्पर्श करून जातात. असे ऑनलाईन नाते फसवे किंवा आभासी होऊच शकत नाही. यामुळे एकमेकांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असलो तरी एकमेकांमधील अंतर कमी झालंय् हे नक्की. मैत्रीबद्दल अल्बर्ट कॅमस यांनी म्हटलंय् –
फेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे यामुळे आपण आपल्या नात्याला अधिक वृद्धिंगत करायला हवं. या प्रकारचे दिवस साजरे करणं कदापि वाईट नाही. मात्र, त्याला चंगळवादाची जोड देऊ नका. आपली वरिष्ठ मंडळी आपल्या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही, तर त्या सेलिब्रेशनच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात आहे. तेव्हा नाती जपा, नाती जगा. नात्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प येत्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने करा.
निखिल भुते, नागपूर

Posted by : | on : 24 Aug 2012
Filed under : युवा भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g