किमान तापमान : 26.74° से.
कमाल तापमान : 29.57° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.57° से.
23.87°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.16°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.47°से. - 29.09°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.93°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.99°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.66°से. - 29.04°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादलचंदीगड, १० जानेवारी – हरयाणाच्या करनाल जिल्ह्यात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आयोजित केलेल्या किसान महापंचायत स्थळी आंदोलनकर्त्या शेतकर्यंानी आज रविवारी हल्ला चढवून, प्रचंड तोडफोड केली. खट्टर सभास्थळी येत असताना, त्यांना काळे झेंडे दाखवून, त्यांचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. आंदोलक हिंसाचारावर उतरले असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे महत्त्व शेतकर्यांना समजावून सांगण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर यांनी या किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. सभास्थळी राज्याच्या कानाकोपर्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. मात्र, आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी तिथे हल्लाबोल केला आणि खुर्च्या व इतर सामानांची तोडफोड करून, मंडपही उद्ध्वस्त केला. पोलिस त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते, त्याचवेळी खट्टर यांचे हेलिकॉप्टर सभास्थळाजवळ असलेल्या हेलिपॅडवर उतरले असता, आंदोलकांनी या हेलिपॅडवरही ताबा घेतला. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आधी लाठीमार केला, पण स्थिती आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी पाण्याचा प्रखर मारा करीत, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
शेतकर्यांच्या या हिंसाचारामुळे मुख्यमंत्र्यांनी किसान महापंचायत रद्द केली आणि हेलिकॉप्टर माघारी फिरविले. भारतीय किसान युनियनचे नेते गुरनामसिंग चारुनी यांच्या सूचनेवरून आंदोलकांनी हा हिंसाचार केला असल्याचा आरोप भाजपा नेते रमण मलिक यांनी केला.
करनाल हिंसाचारामागे कॉंग्रेस-डावे : खट्टर
करनाल येथील महापंचायत स्थळी झालेल्या हिंसाचारामागे कॉंग्रेस व कम्युनिस्ट पक्ष असल्याचा घणाघाती आरोप हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी पत्रपरिषदेतून केला.
मी या कार्यक्रमात १०० कोटींच्या योजनेची घोषणा करणार होतो. या रॅलीत ५ हजारांपेक्षा अधिक लोक उपस्थित होते. मोजक्या लोकांनी गोंधळ घातला. काही लोकांनी शेतकर्यांना बदनाम केले आहे. शेतकर्यांचा स्वभाव हिंसक, आक्रमक नाही. भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनामसिंग चारुनी यांना त्यांनी आजच्या हिंसाचारासाठी दोषी ठरविले.
आमच्या देशात मजबूत लोकशाही आहे, ज्या अंतर्गत सर्वांना अभिव्यतिस्वातंत्र्य आहे. आम्ही शेतकरी आणि नेत्यांच्या भाषणांवर व वक्तव्यांवर कधीही गदा आणली नाही. त्यांचे आंदोलन सुरूच आहे. कोरोना असूनही आम्ही त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. गुरनामसिंग चारुनी यांनीच शेतकर्यांना चिथावणी दिली असा आरोप भाजपा नेते रमण मलिक यांनीही केला आहे.