किमान तापमान : 26.01° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.01° से.
24.9°से. - 28.08°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.33°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.18°से. - 28.76°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.39°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.17°से. - 28.51°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 27.12°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादलशेकडो पर्यटक अडकले, रस्ते, हवाई मार्ग बंद,
श्रीनगर, ७ जानेवारी – प्रचंड बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोर्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्फाचा मोठा थर साचल्यामुळे ३०० किलोमीटर लांब जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पार ठप्प झाली आहे. या महामार्गावर पेट्रोल-डिझेलची वाहने अडकल्यामुळे प्रशासनाकडून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आले.
आता दुचाकी व तीनचाकी वाहनांना ३ ते ५ लिटर पेट्रोल मिळेल. खाजगी चारचाकीला कमाल १० लिटर व व्यावसायिक चारचाकींना कमाल २० लिटर पेट्रोल मिळेल. बस, ट्रकलाही २० लिटरची परवानगी मिळाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी २१ दिवसांची कालमर्यादा आहे.
६ हजार मालवाहू ट्रक अडकले
वाहतूक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे ६ हजार मालवाहू ट्रक, पेट्रोल-डिझेलचे कंटेनर आणि प्रवासी वाहने अडकली आहेत. हे ट्रक लगरोटा बायपास जम्मूूहून उधमपूर, रम्बान, चंदेरकोट यादरम्यान अडकले आहेत. श्रीनगरमधील बहुतांश रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद पडले आहेत.
उत्तर-दक्षिण जिल्ह्यांत वीज संकट
सलग बर्फवृष्टी व वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे काश्मीरच्या उत्तर तसेच दक्षिणेकडील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वीज संकट निर्माण झाले आहे. वीज विभागात कर्मचार्यांचा तुटवडा असल्याने त्यात सुधारणा होताना दिसत नाही. दक्षिण काश्मीर बर्फवृष्टीमुळे त्रस्त आहे. अनेक ट्रान्सफॉर्मर व वीज व्यवस्था कोलमडली आहे, असे मुख्य अभियंता एजाज अहमद दार वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, प्रचंड बर्फवृष्टीमुळे हजारो पर्यटक पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगरमध्ये अडकले आहेत. दल सरोवराच्या परिसरातील हाऊसबोट मालक रस्ते-हवाई मार्ग पुन्हा सुरू होईपर्यंत पर्यटकांना राहण्याची मोफत सुविधा देत आहेत. दुसरीकडे खोर्यातील जनजीवनावर बर्फवृष्टीचा प्रभाव पडला आहे. शेकडो घरांची हानी झाली आहे. कुलगाम भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे २२ कुटुंबांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. दक्षिण काश्मीरच्या एका शाळेत त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.