किमान तापमान : 25.37° से.
कमाल तापमान : 25.78° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.27 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.78° से.
23.87°से. - 27.69°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.33°से. - 28.43°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.74°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.62°से. - 29.15°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.22°से. - 28.74°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.79°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादलसख्ख्या भावाचाच ममता बॅनर्जींना घरचा अहेर,
कोलकाता, १४ जानेवारी – ममता बॅनर्जींसाठी भाचाच सर्वकाही आहे; जनता नाही, असा आरोप भाजपा नेत्यांकडून सातत्याने केला जात असताना, आता ममतांचा सख्खा भाऊ कार्तिक बॅनर्जी यांनीच त्यांच्यावर हल्ला चढविला. घराणेशाहीचे राजकारण बंद व्हायलाच हवे. अनेक नेते जनतेच्या हिताच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात ते केवळ आपल्या कुटुंबीयांचाच विचार करता. या प्रकारांचा आता वैताग आला आहे, असा आरोप त्यांनी केला.
ते पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही स्वत:च्या बहिणीविषयी बोलत आहात का, असे विचारले असता, अशा प्रकारचे राजकारण करणार्या सर्वांविषयीच मी बोलत आहे. कुण्या एकाविषयी नाही. राजकारणात फक्त घराणेशाहीलाच महत्त्व दिले जात आहे. ज्या जनतेच्या मतांवर हे लोक निवडून येतात, त्याच लोकांचा त्यांना नंतर विसर पडत असतो. सत्ता हाती आल्यानंतर हे लोक फक्त आपल्या परिवाराचाच विचार करतात. त्यांच्यासाठी जनतेचा नाही, तर कुटुंबाचा विकास महत्त्वाचा असतो. आधी जनता आणि नंतर परिवार, ही संतांची शिकवण आहे आणि याचाच विसर आजच्या घराणेशाहीच्या राजकारण्यांना पडला आहे, असा जोरदार चिमटा त्यांनी काढला. तुम्ही भाजपात जाणार का, त्यांच्याकडून तुम्हाला काही प्रस्ताव आला आहे का, असे विचारले असता, याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, ज्यावेळी मी आपली दिशा निश्चित करेल, ती अंतिम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेले अनेक लोक आपल्या परिवारातील सदस्यांचाच विचार करताना दिसतात. आपली व्यक्ती कशी समोर येईल, यालाच प्राधान्य दिले जात आहे. कुणाला आपल्या मुला-मुलीची, तर कुणाला आपल्या भाच्याची काळजी वाटते. येथे जनतेचा विचार कुणाच्याच मनात कसा येत नाही, असा सवालही त्यांनी केला.