किमान तापमान : 26.35° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.23 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.87°से. - 28.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.3°से. - 28.32°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.53°से. - 29.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश24.43°से. - 29.09°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 28.7°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 29°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाशकटवा, ९ जानेवारी – आपला पराभव निश्चित आहे याची खात्री पटल्यानेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्राची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबविण्यास सहमत झाल्या आहेत. मात्र, आता वेळ निघून गेली आहे. ममता सरकारने शेतकर्यांचा विश्वास गमावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल सरकारचा पराभव निश्चित आहे, असा जोरदार हल्ला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चढविला. भाजपाच्या कृषक सुरक्षा अभियानाचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
नड्डा पुढे म्हणाले, ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या योजनांचे नाव बदलून स्वत:च्या नावाने दामटत आहेत. मात्र, आता नाव बदलून काहीही फायदा होणार नाही. नरेंद्र मोदी लोकांच्या हृदयात आरुढ आहेत. ‘मां, माटी आणि मानुष’साठी काम करू असे आश्वासन ममतांनी दिले होते. मात्र, ममता सरकार तुष्टीकरण व हुकूमशाही वृत्तीने कामकाज रेटत आहे, भ्रष्टाचार्यांना संरक्षण देत आहे. येथे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील लाच द्यावी लागते, अशा कठोर शब्दात त्यांनी तृणमूल सरकारची लक्तरे वेशीवर टांगली.
शेतकर्यांकडून मूठभर तांदूळ
शेतकर्यांना न्याय देण्यासाठी भाजपाच्या ‘तांदूळ संकलन अभियाना’चा आज पक्षाध्यक्ष नड्डा यांनी प्रारंभ केला. या अंतर्गत शेतकर्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून मूठभर तांदूळ गोळा करण्यात येणार आहे. हे अभियान २४ जानेवारीपर्यंत चालेल. शेतकर्यांसाठी भाजपातर्फे २५ ते ३० जानेवारीपर्यंत सार्वजनिक स्वयंपाक बनविण्यात येईल. याअंतर्गत शेतकरी आणि गरिबांना भोजन देण्यात येईल. एक मूठ तांदूळ संकलन अभियानाच्या माध्यमातून २३ जिल्ह्यांतील ४८ गावांत पोहोचण्याची भाजपाची योजना आहे. या माध्यमातून तब्बल ७४ लाख शेतकर्यांशी भाजपा थेट संवाद साधणार आहे.
वर्धमान येथे ९ किलोमीटर रोड शो
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राधा गोविंद मंदिरात दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली. राधा गोविंद मंदिर ४०० वर्षांपेक्षा अधिक जुने आहे. दर्शन झाल्यावर त्यांनी वर्धमान येथे तब्बल ९ किलोमीटर लांबीचा रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.