किमान तापमान : 26.04° से.
कमाल तापमान : 27.34° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.34° से.
23.87°से. - 27.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.3°से. - 28.32°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.53°से. - 29.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश24.43°से. - 29.09°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 28.7°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 29°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाशकोलकाता, १३ जानेवारी – भाजपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पराभव दिसू लागल्याने तृणमूल कॉंग्रेसला आता सवार्र्ंत मोठे शत्रू असलेल्या डाव्या आणि कॉंग्रेसची आठवण झाली आहे. भाजपाला रोखण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसला सहकार्य करा, अशी याचना तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या वतीने पक्षाने आज बुधवारी केली आहे.
२९४ सदस्य संख्या असलेल्या बंगाल विधानसभेची निवडणूक येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहे. डावी आघाडी आणि कॉंग्रेस पक्षाचा विरोध प्रामाणिक असल्यास, भाजपाच्या जातीय आणि फूट पाडणार्या राजकारणाविरोधातील तृणमूल कॉंग्रेसच्या लढ्याला ते सहकार्य करतील, असे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत राय यांनी प्रसारमाध्यमांना येथे सांगितले. भाजपाविरोधातील धर्मनिरपेक्ष राजकारणाचा खरा चेहरा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी याच असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाने सुरू केलेली एकही कल्याणकारी योजना यशस्वी ठरलेली नाही, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. विकासाच्या मुद्यावर तृणमूलकडून नेहमी सकारात्मक टीका केली जाते, असेही ते म्हणाले.
बांगलादेशातून होणारी गोतस्करी रोखण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची नव्हे, तर सीमा सुरक्षा दलाची आहे, बंगालमध्ये गोतस्करीच्या मुद्यावर सध्या राजकीय वादळ उठले आहे. सीमा सुरक्षा दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारितील असून, या दलावर देशाच्या सीमेवरून होणारी तस्करी रोखण्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भोजन करण्याऐवजी सीमेला भेट देऊन सीमा सुरक्षा दल आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहे अथवा नाही, याची तपासणी करणे आवश्यक होते, अशी टीका त्यांनी केली.
भाजपाच्या बंगाल शाखेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरतील का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. घोष यांच्या तुलनेत डायमंड हार्बर येथील खासदार आणि तृणमूल कॉंग्रेसच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांना जास्त राजकीय अनुभव आहे. त्यांनी २०१५ मध्ये राजकारणात प्रवेश केला. मात्र, मुख्यमंत्रिपदावर कधीच दावा केला नाही, असे त्यांनी सांगितले.