किमान तापमान : 26.35° से.
कमाल तापमान : 27.44° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.23 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.44° से.
23.87°से. - 27.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.3°से. - 28.32°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.53°से. - 29.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश24.43°से. - 29.09°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 28.7°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 29°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाशचेन्नई, ११ जानेवारी – काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या प्रकृतीचे कारण देत येत्या काळात सक्रिय राजकारणात न उतरण्याचा आपला मानस जाहीर केला होता. पण, तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात यावे, असा आग्रह त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून धरण्यात आला. हा आग्रह इतका पराकोटीला पोहोचला की त्यांचे चाहते आणि समर्थकांनी यासाठी चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे आंदोलनही केले. यानंतर अखेर संपूर्ण परिस्थिती पाहून खुद्द रजनीकांत यांनीच काहीशी नाराजी व्यक्त करत चाहत्यांना राजकीय प्रवेशासाठी आपल्यावर दबाव न टाकण्याचे आवाहन केले.
ट्विटरच्या माध्यमातून एक पत्रक प्रसारित करत त्यांनी ही बाब सर्वांच्याच निदर्शनास आणून देत सर्वांपुढे वस्तुस्थिती ठेवली. शिवाय आपला राजकारणात न येण्याचा मानस पुन्हा एकदा अधोरेखित केला.
माझ्या नेतेपदासाठी आंदोलनात सहभागी न झालेल्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी यापूर्वीच राजकारणात प्रवेश न करण्याबाबतची कारणे स्पष्ट केली आहे. मी माझा निर्णयही सांगितला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की, माझ्या राजकीय प्रवेशाची मागणी करण्यासाठी अशा प्रकारची आयोजने करु नका आणि मला आणखी वेदना देऊ नका, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे. ‘वा थलैवा वा’ असे म्हणत रजनीकांत यांनी राजकारणात यावे, अशी मागणी करणार्या हजारो समर्थकांचे आंदोलन बघून दुसर्याच दिवशी रजनीकांत यांना नाईलाजाने हे ट्विट करावे लागले.
२९ डिसेंबरला सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवेशाच्या सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता पुन्हा एकदा या आंदोलनानंतर त्यांनी आपण त्याच निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.