|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 31.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 5.72 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.38° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear
Home » वाणिज्य » ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !

ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !

नवी दिल्ली, (३० जानेवारी) – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचे व्यवहार ऑनलाईन करण्याकडे ग्राहकांचा कल आता वाढला आहे. त्यामुळे बँकेत दिसणार्‍या लांबच लांब रांगा जरी दिसेनाशा झाल्या असल्या, तरी एक नवाच धोका मात्र निर्माण झाला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञांनी बँकींग क्षेत्रात दाखल झालेल्या एका नव्या व्हायरसचा शोध लावला आहे. देशभरातील ऑनलाईन बँकींगसाठी धोकादायक असलेला ‘ब्लॅक व्हायरस’ ग्राहकांची वैयक्तिक माहिती काढून घेण्यास सक्षम आहे.
सरकारच्या वतीने ग्राहकांसाठी डेबीट आणि क्रेडीट कार्ड स्वॅप करताना काळजी घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. ‘डेक्सटर, ब्लॅक पीऑस, मेमरी डंप ऍण्ड ग्रॅबर’ असे नाव देण्यात आले आहे. हा ‘ब्लॅक व्हायरस’ ‘ट्रोजन’ श्रेणीतील आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने डेबिट कार्डावर खरेदी करताना प्रत्येक वेळी आपला ‘पिन’ म्हणजे विशेष ओळखक्रमांक दाखल करण्याचे बंधन ग्राहकांवर घातले होते.
त्यानंतर, हा व्हायरस ‘पॉईंट ऑफ सेल काउंटर’वर सक्रीय झाला आहे. कॉम्प्युटरच्या सिस्टीममध्ये प्रवेश केल्यानंतर हा व्हायरस सुरक्षा प्रोटोकॉलला भेदण्यासही सक्षम आहे. कार्डधारकाचे नाव, खातेक्रमांक, कार्डची व्हॅलिडीटी आणि इतर गोपनीय माहिती काढून घेतो. सगळी माहिती घेतल्यानंतर अर्थातच ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतली जाऊ शकते. या व्हायरसच्या प्रभावापासून आपली कमाई वाचवून ठेवण्यासाठी आरबीआयच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Posted by : | on : 31 Jan 2014
Filed under : वाणिज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g