|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.99° C

कमाल तापमान : 28.25° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 4.44 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.99°C - 31.17°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.97°C - 30.61°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.62°C - 30.53°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.16°C - 31.59°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.01°C - 32.88°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.86°C - 32.65°C

sky is clear
Home » विज्ञान भारती » नववर्षात खगोलप्रेमींना पर्वणी

नववर्षात खगोलप्रेमींना पर्वणी

=गुरू, मंगळ, शनी दर्शन देणार=
मुंबई, (१ जानेवारी) – खगोलप्रेमींची नेहमीच उत्सुकता वाढविणारे शनी, गुरू आणि मंगळ हे तीन ग्रह २०१४ या नवीन वर्षात अगदी जवळून पाहता येणार आहेत. या सार्‍या घटना नैसर्गिक आणि खगोलीय असून, मानवी जीवनावर त्याचा कोणताही इष्ट किंवा अनिष्ट परिणाम होणार नाही. मात्र, खगोलीय घटनांच्या अभ्यासकांसाठी ही मोठीच पर्वणी ठरणार असल्याचे खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी सांगितले आहे.
२०१४ या वर्षात गुरू, मंगळ आणि शनी हे तीन ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहेत. ५ जानेवारी रोजी गुरू ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. या दिवशी गुरू- सूर्य यांची प्रतियुती असून, सूर्यास्तानंतर लगेच गुरू पूर्व दिशेला दिसणार आहे. खगोलप्रेमींना गुरू ग्रह या दिवशी साध्या डोळ्यांनी पाहता येईल. मात्र, या ग्रहाचे चंद्र पाहण्यासाठी टेलिस्कोपचा आधार घ्यावा लागणार आहे. गुरूच्या ६३ चंद्रांपैकी फक्त चार चंद्र टेलिस्कोपमधून दिसतात. त्यानंतर ८ एप्रिल रोजी मंगळ ग्रह पृथ्वीवासियांना दर्शन देणार आहे. या दिवशी मंगळ-सूर्य प्रतियुती असल्याने मंगळ पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. सूर्य मावळल्यावर लगेच पूर्व दिशेला लाल रंगाचा मंगळ ग्रह खगोलप्रेमींना दर्शन देणार आहे. अगदी साध्या डोळ्यांंनी खगोलप्रेमींना तो पाहता येणार आहे.
सरासरी २६ महिन्यांनंतर मंगळ पृथ्वीच्या जवळ येतो. १० मे रोजी शनी पृथ्वीजवळ येणार असून, त्याचे पृथ्वीपासून सरासरी अंतर १३३ कोटी १० लक्ष किमी असणार आहे. या दिवशी सूर्य – शनी प्रतियुती आहे. सूर्य मावळल्यावर लगेच शनी हा पूर्व क्षितिजावर दिसणार आहे. हा ग्रह खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी दिसणार आहे. त्याच्या विलोभनीय कडा मात्र साध्या डोळ्यांंनी दिसू शकणार नाही. त्या बघण्यासाठी तीन इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या टेलिस्कोपची गरज आहे.

Posted by : | on : 2 Jan 2014
Filed under : विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g