|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.4° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 83 %

वायू वेग : 1.2 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.36°C - 28.28°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.86°C - 28.68°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.65°C - 29.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.48°C - 28.57°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

26.04°C - 27.82°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.81°C - 28.18°C

few clouds
Home » विज्ञान भारती » ४ महिन्यांच्या सरावानंतर संशोधक परतले

४ महिन्यांच्या सरावानंतर संशोधक परतले

=मंगळावर राहण्याचा केला होता सराव=
वॉशिंग्टन, [२६ जुलै] – मंगळावर भविष्यात मानववस्ती थाटता येईल काय, याविषयीचे गुढ अजूनही कायम असले तरी तिथे वस्ती शक्य झाल्यास कसे राहायचे, याबाबतचा सराव तब्बल चार महिने केल्यानंतर शास्त्रज्ञ आज अखेर आपल्या सामान्य जीवनात परतले आहेत.
नासाने हवाईयन ज्वालामुखी बेट असलेल्या मौना लोआ भागात एक हजार चौरस फुटाच्या खोलीत मंगळासारख्याच वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या चार महिन्यांपासून सौर ऊर्जा असलेल्या या खोलीत स्वयंपाकघर आणि शौचालयासह प्रयोगशाळा व व्यायामशाळाही तयार करण्यात आली होती. आपल्या मूळ जगात परत येणे आनंददायक अनुभव असून, आता ताजे अन्न खाता येईल, अशी प्रतिक्रिया या संशोधकांनी व्यक्त केली.
पृथ्वीवर जे वातावरण आहे, तसे वातावरण या खोलीत नव्हते. अंतराळात गेल्यानंतर जसे चालावे लागते, तसेच या खोलीतही वैज्ञानिकांना चालावे लागले. मनुष्याला भविष्यात मंगळावर वास्तव्य करण्याची वेळ आल्यास नेमके काय करावे लागेल, याची ही रंगीत तालिमच मानली जात आहे.
गेल्या चार महिन्यांपासून या वैज्ञानिकांचा बाहेरील जगाशी संपर्क नव्हता. घरातील व्यक्तींसोबतही त्यांना या काळात संपर्क करता आला नव्हता. या चार महिन्यांच्या काळात घरातील ताज्या अन्नापासून आम्ही मुकलो होतो. अंतराळात राहताना जिवंत राहण्यासाठी जे खायचे असते, तेच आम्ही खात आहोत. करमणुकीकरिता या खोलीत चित्रपट पाहण्याची, बोर्डावरील खेळ खेळण्याची सुविधा आहे, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले.

Posted by : | on : 27 Jul 2014
Filed under : विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g