|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.1° C

कमाल तापमान : 27.69° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 2.61 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.69° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

27.09°C - 28.68°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.65°C - 29.01°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.48°C - 28.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.04°C - 27.82°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 28.18°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

26.13°C - 28.29°C

sky is clear
Home » संवाद » भारतरत्न अटलजी

भारतरत्न अटलजी

atalbihari bajpayeejiआंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अटलजींची प्रतिमा खूप उज्ज्वल होती. घरातील आजोबांना जसा घरात सन्मान असतो, तसा सन्मान अटलजींना आंतरराष्ट्रीय मंचावर होता. अटलजींसोबत सिरिया, तजाकिस्तान व रशिया या देशांचा दौरा करण्याचे भाग्य मला मिळाले. या दौर्‍यात अटलजींचा तो सन्मान बघता आला. सामान्यत: विदेशातील नेत्याला सन्मान दिला जातो, पण त्याला आपल्या घरी शेतावर नेले जात नाही. रशियात तेथील प्रमुख ब्लादीमिर पुतीन यांनी आपल्या खाजगी ड्युमात (शेतावरील घर) अटलजींना ठेवून घेतले होते. अधिकृतरीत्या एका पंचतारांकित हॉटेलात अटलजींचा मुक्काम होता, पण प्रत्यक्षात ते पुतीन यांच्या ड्युमातच वास्तव्याला होते. त्यांनीच अटलजींना ॠेेव ॠीरपव ऋरींहशी असे संबोधिले होते. सिरियातही हाच सन्मान अटलजींना मिळाला होता.
अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेले, कट्टर देशभक्त व राष्ट्रसमर्पित जीवन जगणारे रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. हा सन्मान वास्तविक त्यांना खूप आधीच मिळायला पाहिजे होता. पण पक्षीय राजकारणात वाजपेयीजी जनसंघवाले. भाजपावाले म्हणून हा सन्मान त्यांच्यापासून लांबत गेला. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अतिशय उत्तम निर्णय घेऊन या महान कवी, भाषाप्रभूला गौरावान्वित केले आहे. हा सन्मान न मिळता तर अटलजींच्या उंचीत काही खुजेपणा आला असता असे नाही, पण आता या सन्मानालाही मनोमन आनंद झाला असेल.
या देशातील प्रारंभीच्या काळातील पंतप्रधान हे जसे जनतेची नाडी जाणणारे होते, तसेच आपल्या महान भाषणांसाठीही गाजले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेले ‘नियतीशी केलेला करार’ हे भाषण अजरामर झाले आहे. तसेच अजरामर भाषण लहानखुर्‍या चणीचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचेही ‘जय जवान जय किसान’चे होते. इंदिराजी तर बांगला देशची निर्मिती करून देवी दुर्गाच झाल्या होत्या. पण अनेक अजरामर भाषणांचे जनकत्व अटलजींकडेच येते. त्यांच्या वाणीवर सरस्वती प्रसन्न होती अन् अनेक शब्द त्यांच्यापुढे यासाठी हात जोडून उभे राहत की त्यांनी या शब्दांची निवड आपल्या भाषणात करावी. प्रदीर्घ पॉज घेत त्यांची झालेली भाषणे ज्यांनी ऐकली आहे, ती पिढी अभिमानाने पुढील पिढीला सांगू शकते की, मित्रांनो, आम्ही भाग्यवान आहोत तुमच्यापेक्षा, कारण आम्ही अटलजींची भाषणे ऐकली आहेत. त्यांच्या शब्दांनी भारावून गेलो आहोत, पुलकित झालो आहोत. आजही अटलजींचे शब्द आमच्या कानाकानातून गुंजत आहेत. त्या भाषणांचे गारुड आजही आमच्या मनावर कायम आहे.
२५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेरला जन्माला आलेला हा महान देशभक्त स्वातंत्र्यता आंदोलनातही सहभागी झाला होता. कारागृहातही गेला होता. त्याच्या देशभक्तीचे रसायन फार वेगळे होते. त्याला अखंड भारताच्या स्वप्नाचे वेध लागले होते. रा. स्व. संघाच्या संपर्कातून, प्रभावातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत होते. विचार पक्व होत होते. मध्यप्रदेशचा जन्म असला तरी ते उत्तर प्रदेशातच खरे रंगले होते. तीच त्यांची कर्मभूमी होती. लखनौहून निघणार्‍या संघ परिवाराच्या पाञ्चजन्य या साप्ताहिकाचे ते प्रथम संपादक होते. ते संपादकपद म्हणजे सुळावरील पोळी होती. सदैव आर्थिक अडचणीत ते साप्ताहिक चालत असे, पण पैसा हे अटलजींचे वा त्यांच्या समवेत काम करणार्‍या सहकार्‍यांचे कधीच स्वप्न नव्हते. एक वेळ उपाशी राहूनही या संपादकाने या साप्ताहिकाची सर्व कामे केलीत. फक्त लिखाणाचेच नव्हे, तर साप्ताहिकाची सर्व अंगे सांभाळली होती. पडेल ती कामेही केली होती. स्वयंसेवकाचे खडतर जीवन ते जगत होते. पुढे त्यांच्यावर राजकारणातील जबाबदारी आली. जनसंघाचे प्रथम अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते स्वीय सहायक झालेत. त्यांच्याबरोबर जम्मू-काश्मिरात त्यांनी विनापरवाना प्रवेश केला. त्यानंतर शेवटपावेतो अटलजी त्यांच्या समवेत होते. जनसंघाची स्थापना झाल्यावर त्यांनी राष्ट्रभक्तीच्या आविष्कारासाठी तो मार्ग पत्करला. तो काळ स्वातंत्र्य चळवळीतील यशाने, स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कॉंग्रेसने भारलेला काळ होता. पं. जवाहरलाल नेहरू यांचे गारुड सर्व देशभर होते. जनसंघाचे कार्यकर्ते म्हणजे गावात प्रवेशही मिळत नसे. अनेकदा गावात स्वागत दगडगोट्यांनी होत असे. तरी त्या काळात जनसंघ त्यांनी जिवंत ठेवला, वाढविला, फुलविला. दीपक तेवता ठेवला, विझू दिला नाही.
तो काळ असा होता की पक्षाला उमेदवारही मिळत नसत, पण जे उमेदवार मिळत असत त्यांच्या प्रसार-प्रचारात अटलजी जात असत. उमेदवारी दिलेल्या जनसंघाने अलटजीची एक सभा दिली की, तो उमेदवार धन्य धन्य होऊन जात असे. वक्ता दशसहस्रेषू असल्याने अनेक लोक सभांना येत, ते सर्व अटलजींच्या अमोघ वक्तृत्वाने भारून जात, पण मते जनसंघाच्या मतपेटीतच तेव्हा पडत असत असे काही नाही. त्या कालखंडात अटलजी १९५७ साली लोकसभेवर निर्वाचित झाले. समोर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुत्सद्याचे वावरणे असतानाही अटलजींनी आपला प्रभाव पाडणे सुरू केले. आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय होता आणि त्यांच्या त्या विषयावरील भाषणांसाठी त्यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांचीही प्रशंसा मिळविली होती. त्यांना अटलजींत पुढचा विदेशमंत्री दिसला होता. पंतप्रधान दिसला होता.
आपला मूळ मुद्दा न सोडता सर्व राजकीय पक्षांतील लोकांशी मैत्री करण्याची हातोटी त्यांच्याजवळ होती. त्यामुळे ‘अटलजी तो अच्छे है पर उनकी पार्टी… अटलजी गलत पार्टीमे है’ असे बोलले जाऊ लागले होते. पण अटलजी आपल्या पक्षाशी शंभर टक्के प्रामाणिक राहिलेत. त्यांची संसदेतील प्रत्येक भाषणे ऐकण्यासारखी व मननीय राहत असत. अटलजी बोलायला उभे राहिलेत की सत्तारूढ बाकांवरील संख्याही वाढत असे. स्वत: पंतप्रधानही आवर्जून उपस्थित राहत. मधला एक कालखंड हा जातीय दंगल, तणावाचा होता. त्यावेळी अटलजींनी एक अजरामर भाषण केले होते. ‘आता हिंदू मार खाणार नाहीत’, ‘अब हिंदू मार नही खायेंगे’ हे संपूर्ण भारताला त्यांनी ठणकावून सांगितले होते. लोकसभेतील त्यांच्या या भाषणाच्या हजारो-लाखो प्रती काढून त्या वितरित करण्यात आल्या.
१९७१ साली बांगला देशची निर्मिती झाली. इंदिराजींनी अतिशय यशस्वी राजकारण केले होते. त्याची अतिशय मुक्तकंठाने तारीफ अटलजींनी केली होती. त्यांनी इंदिराजींना साक्षात दुर्गादेवी संबोधिले होते, पण त्याच इंदिराजींनी सिमला करार करून युद्धबंदी झालेले लाखभर सैनिक पाकला- विनाअट सोपविले तेव्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात अटलजी आघाडीवर होते. युद्धात आम्ही जे कमावले ते चर्चेच्या टेबलवर गमावले, हे ते आवर्जून सांगत असत. १९७५ साली आणिबाणी या देशावर लादण्यात आली त्यावेळी अटलजी १९ महिन्यांसाठी स्थानबद्ध झाले होते. पुढे १९७७ ला निवडणुका झाल्यात आणि संपूर्ण उत्तर भारतात कॉंग्रेसचे पानिपत झाले. जयप्रकाशजी नारायण त्या परिवर्तनाचे प्रमुख मार्गदर्शक होते. दुसरे स्वातंत्र्य भारताला प्रदान झाले होते. पुढे मोरारजी भाईंच्या नेतृत्वात जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी स्वाभाविकपणाने अटलजींकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार आला आणि त्यांचा जगप्रवास सुरू झाला. भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयास होता. १९७७ साली युनोच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. युनोत हिंदीतून भाषण करणारे ते पहिले भारतीय होते. तोवर सर्वजण सामान्यत: इंग्रजीचा वापर करीत. अटलजींच्या या निर्णयामुळे देश-विदेशात त्यांची प्रतिमा अधिकच उंचावली होती. जनता पार्टीचा हा प्रयोग फार काळ चालला नाही. त्या काळात अटलजी वारंवार देशाबाहेर राहत, त्यामुळे भारतात जनता पार्टीत जे वाद उठत ते शमविणार्‍यांत त्यांचे नाव राहत नसे. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्यांवर जनता पार्टीत जेव्हा संघस्वयंसेवक असणार्‍या खासदारांची, नेत्यांची घुसमट व्हायला लागली, तेव्हा त्यांना विनाकारण टीका सहन करावी लागली. शेवटी प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध या एकमेव कारणावरून भाजपाची निर्मिती झाली. अटलजी भाजपाच्या संस्थापकांपैकी एक होते व तेच भाजपाचे पहिले अध्यक्ष झालेत. त्यावेळी केलेल्या भाषणात अटलजींनी जपूजींचा गौरवाने उल्लेख करीत सांगितले की, ‘भलेही हम बिखरे है
| जनता पार्टीसे अलग हुये है, पर जयप्रकाशजी के सपनोको हम बिखरने नही देंगे|’ व त्यांनी आपले ते वचन आयुष्यभर पाळले. त्यावेळी त्यांनी ‘गांधीवादी समाजावाद’ ही नवीन संकल्पना भारतीय राजकारणात आणली. तो कालखंड समाजवाद या शब्दाचे आकर्षक असणारा होता. त्यामुळे गांधीवादी समाजवादाचा प्रभाव जनमानसावर जाणवला. अटलजींनी आपल्या वक्तृत्वाने भाजपा फुलविला, पण भारतीय राजकारणात विविध परिवर्तने होत होती. तरी अटलजी आपल्या पक्षाला पुढे नेण्यासाठी झटत होते.
अंधेरा छटेगा
सूरज उगेगा
कमल खिलेगा
हे त्यांचे आश्‍वासक शब्द पुढील यशाची दिशा दाखवीत होते. १९८४ ची निवडणूक भाजपासाठी अतिशय कठोर परीक्षा घेणारी होती. संपूर्ण भारतातून भाजपाला फक्त २ जागा मिळाल्या. राजीव गांधींच्या उदयाचा तो कालखंड होता. इंदिराजींची निर्घृण हत्या झाली होती. इंदिराजींबद्दल सहानुभूतीची लाट सर्वत्र होती. त्याचा फटका भाजपाला बसला. फक्त २ जागा. अखिल भारतीय पक्षाला फक्त २ जागा. पण भाजपा मागे हटला नाही, खचला नाही. पुन्हा नव्या उमेदीने पक्ष उभा राहिला. त्यातही अटलजींचे योगदान होते. अटलजींनी लालजींना सूत्रे दिलीत. राजन्मभूमी आंदोलनात अटलजींचे योगदान होते, पण हा लढा भाजपाचा लढा व्हावा, हे त्यांना मान्य नव्हते. मतभेद नव्हता पण वेगळा विचार होता. लालजींची रथयात्रा निघाली तेव्हा संसदेतील लढा अटलजींच्या नेतृत्वात लढला जात होता. ते हिंदू मनाची मानसिकता, तगमग देशाला पटवून देत होते. सांगत होते. राममंदिर हे रामललांच्या जन्मठिकाणीच व्हावे, हे त्यांनाही मान्य होते. व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर यांच्या सरकारनंतर पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार आले. त्या सरकारात अटलजी विरोधी पक्षनेते होते. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे शिष्टमंडळ युनोत अटलजींच्या नेतृत्वात गेले होते. सरकारशी मतभेद असलेत तरी ते देशात आहेत. देशात आम्ही १०० व ५ असे भलेही असो, पण देशाबाहेर जेव्हा जातो तेव्हा आम्ही १०५ आहोत, ही भावना अटलजी प्रामुख्याने मांडत व तसे त्यांचे वर्तनही राहत असे.
त्यानंतर १९९६ हे वर्ष उगवले. संपूर्ण देशाने कॉंग्रेसला नाकारले. लोकसभेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्याच वर्षी मुंबईला झालेल्या भाजपा अधिवेशनात लालजींनी अटलजींचे नाव पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. अतिशय संकोचलेलेे अटलजी म्हणतच राहिलेत, ‘नही, पार्टीमे ऐसा नही होता. चुनाव होने के बाद निर्वाचित प्रतिनिधी नेता चुनते है
|’ पण कार्यकर्त्यांच्या वाजणार्‍या टाळ्या थांबतच नव्हत्या. लालजींच्या या प्रस्तावाला जनमान्यता मिळत होती. जनमान्यतेची मोहोर या निर्णयावर उमटविली जात होती. म्हणून तेरा दिवसांसाठी भाजपाचे सरकार आले. त्या तेरा दिवसांतही आपला प्रभाव अटलजींनी पाडला होता. लोकसभेत विश्‍वासदर्शक ठरावाला उत्तर देताना अटलजी उभे राहिलेत. नेहमीच्या शैलीत त्यांनी भाषण सुरू केले. ‘प्रधानमंत्रीजी…’ हा त्यांचा पहिला शब्द उच्चारला जाताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. हास्याची कारंजी उडालीत. स्वत:च पंतप्रधान आहोत याचे विस्मरण होऊन अटलजी तसे बोलले असे वाटून त्या हास्यात खिल्ली उडविण्याचाही भाव होता. पण अटलजींनी आपल्या शब्दप्रभुत्वाने विरोधकांचे ‘खिल्ली हास्य’ मागे घ्यायला सर्वांना बाध्य केले. ते पुन्हा म्हणाले, प्रधानमंत्रीजी जवाहरलालजी नेहरू थे और मै वहॉं बैठा था जहॉ आज आप बैठे हो. १९५७ पासून त्यांनी प्रारंभ केला. ते म्हणाले, आजही मी विरोधी बाकावरील जागा विसरलो नाही. ती आमची जागा होती. इथे कधी येऊ अशी स्वप्नेही नव्हती पडलीत, पण जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष केला आहे. तुम्हाला नाकारले आहे. पण हा जनादेश विचित्र आहे. आम्हाला बहुमत नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून मला महामहीम राष्ट्रपतींनी सरकार बनवायला सांगितल्यावर मी काय त्यांना नकार देऊ. राष्ट्रपतींचा आदेश मी स्वीकारला. सरकार बनवले. बहुमत नाही याची मलाही जाणीव आहे. बहुमत आहे वा नाही हे न पाहताच मी राष्ट्रपतींकडे माझा राजीनामा द्यायला जात आहे. संपूर्ण सभागृह आश्‍चर्यचकित झाले. कुणालाच कल्पना नव्हती की अटलजी राजीनामा द्यायला जातील.
पण राज्य कारभार आता त्यांना सोडत नव्हता. निवडणुकांनंतर भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली. किमान समान कार्यक्रमावर वेगवेगळे पक्ष एकत्र आलेत. संविधानातील ३७० वे कलम, रामजन्मभूमी आंदोलन, रामललाचे मंदिर, समान नागरी कायदा हे भाजपाचे नेहमीचे विषय बाजला ठेवून सर्व २९ पक्ष एकत्र आलेत व भारतात एक नवीन सरकार स्थापन झाले. त्याचे नेतृत्व अटलींकडेच होते. हे सरकार नीट चालत असताना अटलजींनी संपूर्ण जगाला धक्का देणारा निर्णय घेतला. त्यांनी अणुचाचण्या घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिका सॅटेलाईटमार्फत संपूर्ण जगावर लक्ष ठेवून असताना विक्रमी दिवसात पोखरण २ झाले. जगाला त्याची कल्पना आली नाही. हे ऑपरेशन किती गोपनीय ठेवण्यात आले होते हे सांगायचे तर लालजींनाही त्याची पूर्वकल्पना नव्हती. पोखरण २ यशस्वी झाले. भारत शक्तिशाली, सामर्थ्यवान झाला. अण्वस्त्रधारी राष्ट्राचा सन्मान त्याला मिळाला. संपूर्ण जग विरोधात होते. अमेरिका, जपान आणि ब्रिटनसह अनेक देशांनी भारतावर ‘सॅक्शन्स’ आणलेत, पण अटलजी डगमगले नाहीत. सर्व देशांना भारताचा प्रामाणिकपणा मान्य करावा लागला. जे निर्बंध घातले होते ते हळूहळू मागे घेतले गेलेत. वास्तविक अटलजींचा हा निर्णयच इतका मोठा, प्रभावी व संपूर्ण जगात भारताचा दबदबा वाढविणारा होता की, अटलजींना भारतरत्न त्यावेळीच मिळायला हवे होते.
कॉंग्रेस पक्षाने त्यावेळी अविश्‍वास ठरावावर कारस्थान केले. ओरिसात मुख्यमंत्री झालेले गिरधर गोमांग लोकसभा सदस्यत्व राखून होते. त्यांना मतदानाला बोलाविले गेले व अवघ्या एक मताने अविश्‍वास ठराव पारित झाला. अटलजींवर त्याचा परिणाम झाला नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम होते.
पाक-भारत संबंधात अटलजींनी नवीन आयाम जोडला. लाहोरला ते बस घेऊन गेले. या सद्भावना यात्रेत खर्‍या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व झाले होते. त्यात चित्रपट अभिनेता देवानंदचा समावेश होता. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी यांना घेऊन ही सद्भावना बस भारतातून पाकला गेली, लाहोरला गेली. अटलजी पाकला जाणारे पहिले पंतप्रधान ठरलेत. एक नवीन मैत्रीपर्व सुरू झाले. ते पर्व पाक सैन्याला फारसे मान्य नव्हते. राजशिष्टाचार त्यागून जनरल मुशर्रफ यांनी अटलजींना अभिवादन केले नाही. त्याचवेळी सीमेवर तणावही वाढविण्यात आला होता. ज्या अटलजींनी भारत-पाक यात मैत्रीचा सेतुबंध निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला, त्याच अटलजींनी कारगिलमधून पाकला नमविण्यालाही मागे-पुढे बघितले नाही. पाकला त्यांनी खडे चारलेत. पुन्हा भारतात निवडणुका झाल्यात आणि भाजपा सत्तेत आला. आताही रूप एनडीएचे होते. अटलजी हे ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले गैरकॉंग्रेसी पंतप्रधान ठरलेत.
त्यांच्या कसोटीचे अनेक क्षण ते सत्तेत असताना आलेत. संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्याला आपल्या सुरक्षा पथकाने सडेतोड उत्तर देत त्यांचा खातमा केला. त्यावेळी अटलजींनी सीमेवर सैन्य तैनात केले, पण त्यांना कारवाई करण्याचे आदेश न देण्याचा संयम दाखविला. अटलजी हे मुळातून कवी होते. त्यांचे कविहृदय होते. भावनेला त्यांच्या जीवनात स्थान होते, पण कर्तव्याचा विसर त्यांना कधीही पडत नसे. अटलजींच्या काळातच इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले. नेपाळहून निघालेले हे विमान काबूल कंदहारला नेण्यात आले. त्या विमानात जवळ जवळ १० प्रवासी होते. त्यांना वाचविणे महत्त्वाचे होते. ते वाचले नसते तर भारतात वेगळाच संदेश गेला असता. त्यांना वाचविण्यासाठी म्हणून अटलजींनी आपली प्रतिष्ठा पणाला न लावता कारागृहातील अब्दुल मजीद सारखा कुख्यात अतिरेकी सोडला. एकूण ५ अतिरेक्यांना घेऊन भारतीय विमान अफगाणिस्तानात गेले आणि सर्व भातीय सुखरूप परत आलेत.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अटलजींची प्रतिमा खूप उज्ज्वल होती. घरातील आजोबांना जसा घरात सन्मान असतो, तसा सन्मान अटलजींना आंतरराष्ट्रीय मंचावर होता. अटलजींसोबत सिरिया, तजाकिस्तान व रशिया या देशांचा दौरा करण्याचे भाग्य मला मिळाले. या दौर्‍यात अटलजींचा तो सन्मान बघता आला. सामान्यत: विदेशातील नेत्याला सन्मान दिला जातो, पण त्याला आपल्या घरी शेतावर नेले जात नाही. रशियात तेथील प्रमुख ब्लॉदमिर पुतीन यांनी आपल्या खाजगी ड्युमात (शेतावरील घर) अटलजींना ठेवून घेतले होते. अधिकृतरीत्या एका पंचातारांकित हॉटेलात अटलजींचा मुक्काम होता, पण प्रत्यक्षात ते पुतीन यांच्या ड्युमातच वास्तव्याला होते. त्यांनीच अटलजींना ॠेेव ॠीरपव ऋरींहशी असे संबोधिले होते. सिरियातही हाच सन्मान अटलजींना मिळाला होता.
वैश्‍विक पातळीवर अटलजी ॠेेव ॠीरपव ऋरींहशी होते. या अनोख्या सन्मानामुळे त्यांचे म्हणणे प्रत्येक वेळेला निर्णायक राहत असे. त्यांच्याच काळात भारतात सर्व शिक्षा अभियान सुरू झाले. पंतप्रधान ग्राम सडक योजना तयार झाली. सुवर्ण चतुष्कोन योजना सुरू झाली. अटलजींनी कोणत्याही योजनेला स्वत:चे नाव दिले नाही, कारण त्यांच्यासाठी नाव महत्त्वाचे नव्हते, तर देश महत्त्वाचा होता. त्यांनीच नदीजोड योजनाही भारतात राबविण्याचा प्रयास केला. त्यासाठी शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांना जबाबदारी सोपविली होती. ती योजना पुढे जरूर सरकली, पण त्याला राजकीय कारणांमुळे विरोधही झाला. ५ वर्षे पूर्ण होण्याआधी त्यांनी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, पण दुर्दैवाने त्यात बहुमत मिळाले नाही. अटलजींनी अगदी सहजतेने निवृत्ती स्वीकारली. २००४ मध्ये पक्षाची गरज म्हणून त्यांनी निवडणूक लढविली, पण २००९ ला आपण सत्तेच्या राजकारणातून संन्यास घेणार आहोत, हे त्यांनी मुंबईला भाजपा अधिवेशनात घोषित केले. भाजपाचे राम-लक्ष्मण म्हणून त्यांनी लालजी व प्रमोदजींचा गौरव केला. त्यानंतर प्रकृती कारणांमुळे ते अज्ञातवासातच गेले होते. स्ट्रोकमुळे त्यांचे शब्दवैभव हरपले होते. विस्मृतीचा अंमल वाढत गेला. पण ते जीवनही त्यांनी सहजतेने स्वीकारले. त्याच पर्वात त्यांचा भारतरत्न म्हणून सन्मान होतो आहे. हा सन्मान आधी होता तर ५० वर्षांचे सक्रिय राजकारणी जीवनाचा रास्त सन्मान झाला असता. त्याचा आनंद त्यांनाही घेता आला असता. आता तर त्यांचे सार्वजनिक जीवनही संपले आहे. पण अखेर राष्ट्राने त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आणि या सन्मानाला विरोध कुणीही केला नाही. सर्वांनी त्या निर्णयाचे स्वागत केले. यातच अटलजींचे मोठेपण अधोरेखित होते. राजकीय मतभेद असतील, पण सर्व राजकीय पक्षांना आपलेसे करून घेणारे हे व्यक्तिमत्त्व या त्यांच्या मोठेपणावर सन्मानाची जनमोहोर आता उमटत आहे. एक आनंदपर्व सुरू होत आहे.
-सुधीर पाठक

Posted by : | on : 29 Dec 2014
Filed under : संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g