|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.11° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 3.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 28.99°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.38°C - 28.98°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.21°C - 29.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.14°C - 28.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.54°C - 28.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.16°C - 28.57°C

sky is clear
Home » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » विकासाचे राजकारण हवे की आरक्षणाचे!

विकासाचे राजकारण हवे की आरक्षणाचे!

•चौफेर : अमर पुराणिक•

दुसर्‍याचा हक्क मारुन खाण्याची मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे. सामाजिक समरसतेचे धडे पुन्हा पुन्हा घेणे आणि देणे गरजेचे बनले आहे. हीन राजकारणाचा वापर करुन कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे केजरीवाल, हार्दिक पटेलसारखे अनेक लोक असतात. आरक्षणाच्या राजकारणाला बळी पडून समाजाची, देशाची राखरांगोळी न करता प्रगती कशी साधायची याचा विचार करणे आवश्यक आहे. आता त्या त्या समाजातील लोकांनीच ठरवायचे आहे की त्यांनी विकासाच्या राजकारणाला साथ द्यायची की आरक्षणासारख्या राजकारणाचा साथ द्यायची?

PATIDAR-ARAKSHANगुजरातमधील सधन आणि संपन्न पटेल/पाटीदार समाज जातिगत आधारावर आरक्षणाची मागणी करतोय. हार्दिक पटेल नावाचा युवक स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीय आरक्षणचे शस्त्र उगारतोय. त्याने छेडलेल्या या आंदोलनात मोठ्‌याप्रमाणात हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला गेला. खरंच एखाद्या समाजाच्या भल्यासाठी हे आंदोलन होतं की केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे आंदोलन केले गेले हे येत्या काळात दिसून येईलच. पण या आंदोलनाला केजरीवाल आणि नीतिशकुमार यांचा पाठींबा असल्याचाही आरोप होत आहेत. हार्दिक पटेल आणि केजरीवाल यांची छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. येत्या काळात यातील तत्थ समोर येईलच. पण सामाजिक समरसतेचा विचार केला असता ज्या जाती सामाजिक आणि अर्थिकरुपाने संपन्न आणि समृद्ध आहेत त्यांना आरक्षण हवे आहे हे चित्र चांगले म्हणता येणार नाही. पटेल समाज गुजरातमध्ये, भारतात आणि परदेशातही अतिशय समृद्ध आहे. अशा समाजाने आरक्षणाची मागणी करावी हे कोडेच आहे. गुजरातप्रमाणेच उत्तर भारतात जाट आणि गुर्जर समाज, महाराष्ट्रात मराठा समाजही जातीच्या आधारावर आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहे. सधन समाज आरक्षणासाठी आक्रमक होतोय पण त्यांनी त्याचा पुन्हा पुन्हा विचार करावा की यामुळे समाजिक समरसतेला तडा जाणार नाही ना?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनुसुचित जाती आणि जमातींना सामाजिक आणि आर्थिक रुपात राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दहा वर्षे सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण दिले गेले. नंतर दहा वर्षांची सीमा वाढत गेली. पण तेव्हाच्या सरकारने आरक्षणाचा लाभ संबंधित समाजाला मिळतोय की नाही हे पहाण्याचे कष्ट घेतले नाहीत. नंतर १९९० साली व्ही.पी. सिंह सरकारने राजकीय हेतूने मंडल आयोगाच्या शिफारसींवर इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिले गेले. इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळणे आवश्यक होतेच पण इतर मागासवर्गीयांच्या विकासापेक्षा राजकारणाचे हेतूच साध्य करण्याचे प्रयत्न झाले. तेव्हापासून आरक्षण हे राजकारणासाठी वापरले जाणारे प्रभावी शस्त्र ठरले. प्रत्येक समाजच आरक्षणाची मागणी करु लागला. मुळात भारतातील सर्वच जातीत थोडयाफार प्रमाणात गरीबी आहेच. काही समाजात जास्त आहे तर काही समाजात कमी आहे. आजच्या पिढीतील काही दलित समाजातील तरुण आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या स्पर्धेत उतरताना दिसताहेत ही खूपच चांगली बाब आहे. मागच्या पिढीत त्यांची स्थिती चांगली नव्हती, पण आरक्षणाचा लाभ घेऊन स्थिती सुधारल्यानंतर त्यांच्या आजच्या पिढीतील बरेच तरुण आरक्षणाचा आधार सोडून देत आहेत. त्याचा लाभ समाजातील अजूनही जे घटक सक्षम नाहीत त्यांना मिळू शकतो. ही अतिशय अनुकरणीय बाब आहे. असे असताना सधन कुटुंबातील, समाजातील लोक आरक्षणासाठी हिंसक वळणावर उतरले ही अतिशय चिंताजनक बाब आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पहायला मिळतेय की  प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे. त्यासाठी ते समाज स्वत:ला मागास घोषित करत आहेत. जर पटेल, जाट, मराठा, गुर्जर समाज स्वत:ला मागास म्हणवून आरक्षण मिळवू पहात असेल तर त्या समाजांनी याचा पुर्नर्विचार करावा. पटेल समुदायाने हार्दिक पटेल याच्या नादी लागून जसे आंदोलन केले आणि हिंसाचार केला हे समर्थनीय होऊच शकत नाही.
या आंदोलनापाठीमागे समाजहितापेक्षा राजकारणाचे पैलूच जास्त दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या राजकारणाची कास धरत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मार्गक्रमण करत आहेत. त्यांना त्यांचे विरोधक पाच वर्षांचा काळही देऊ इच्छित नाहीत. त्या विकास मार्गात अडथळे आणण्याचे नाना प्रयत्न सुरु आहेत. मागच्या महिन्यात संसदेचे आधिवेशन गोंधळ घालून वाया घालवले. एकही निर्णय होऊ दिला नाही. तरीही मोदी त्याच वेगाने आणि ताकदीने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मोदी विरोधात गेल्या दहा, बारा वर्षात अनेक शस्त्र वापरण्यात आली. त्यांना नामोरहम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. तीस्ता सेटलवाड पासून ते आजच्या केजरीवाल, हार्दिक पटेलपर्यंत अशी अनेक शस्त्र वापरण्यात आली. पण ती सर्व शस्त्र मोदींच्या प्रभावासमोर निष्प्रभ ठरली. मोदींना नामोहरम करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी जंग जंग पछाडले पण ते मोदींना पछाडू शकले नाहीत. अशा लोकांना, आंतरराष्ट्रीय संस्थांना भारताचा विकास होणे मान्य नाही. म्हणूनच त्यांनी तीस्ता सेटलवाड, अरुंधती राय, अरविंद केजरीवालसारखी राष्ट्रद्रोही आपत्य जन्माला घातली. कॉंग्रेस हेही त्यांचेच १०० वर्षांहून जूनं आपत्य आहे. मोदीविरोधात आजपर्यंत एक शस्त्र प्रभावी ठरले नाही. उलट या विरोधात मोदींची प्रतिभा उजळून, तावून-सुलाखून निघाली.
मोदीच भारताला प्रगतीपथावर नेऊ शकतात हे ते जाणून आहेत त्यामुळेच आता ते देशभर आरक्षणाचा मुद्दा पेटवू पहात आहेत. यात देशांतर्गत राजकीय विरोधक कोणत्याही थराला जाऊन  मोदींना रोखू इच्छितात. नीतिशकुमारांनीही पटेल आरक्षणाला पाठिंबा याचसाठी दिला आहे. ते मोदींच्या गृहराज्यात अशांतता पसरवू पहात आहेत. जेणेकरुन बिहारच्या निवडणूकात मोदींनी जास्त हस्तक्षेप करु नये. बिहारच्या प्रचाराच्या व्यासपीठावर सोनिया, लालू, नितीश, केजरीवाल सगळेच एकत्र झालेले दिसताहेत. पटेल आंदोलनाच्या पाठिंब्यामागचे हे राजकारण आता लपून राहिलेले नाही. कारण, जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी नितीश कुमारांंच्या पाठींब्याच्या विधानाचा बुरखा फाडला आहे. शरद यादव म्हणाले की, नीतिश कुमार यांनी गुजरातच्या पाटीदार आंदोलनाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे ती अयोग्य आहे. पटेल समाज संपन्न आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही. शरद यादव यांचा खुलासा हाच संकेत देतो की, नीतिश कुमार ज्या पद्धतीने जातीच्या आधारावर एक दगडात दोन पक्षी मारु इच्छितात त्यात जदयुचे इतर नेते सामील नाहीत. इकडे गुजरातची शांतता भंग करु पहाणार्‍या नीतिश कुमारांच्या जनता परिवारात परवाच फुट पडली आणि सपा आघाडीतून बाहेर पडली. त्यामुळे अशा नेत्यांनी आतातरी संकुचित राजकारणापासून दूर राहण्याचा विचार करावा.
यात अरविंद केजरीवालही मागे नाहीत. दिल्लीच्या जनतेला दिलेली आफाट आश्‍वासन वेशीला टांगून दिल्लीकरांना वार्‍यावर सोडून ते हे नुसते उपद्वयाप करत आहेत. अमदाबादमधील लोक सांगतात की लोकसभा निवडणूकीच्यावेळी हा हार्दिक पटेल केजरीवालसोबत होता. सध्या त्याचा आपशी किती संबंध आहे त्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. साडे सहा कोटी लोकसंख्या असलेले आणि गुजरातमध्ये संख्याबळ एक कोटी ८० लाख असलेला पटेल समाज शेती, व्यापार, उद्योग क्षेत्रात सर्वत्र आघाडीवर आहे. राजकारणातही त्यांचे वर्चस्व आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलही त्याच समाजाच्या आहेत. पाटीदार समाजाचे गुजरातमधील ७ खासदार आहेत तर देशभरातून ११७ खासदार संसदेत पाटीदार समाजाचे नेतृत्व करतात. इतक्या मोठ्‌याप्रमाणात प्रतिनिधित्व मिळत असताना हा समाज समाधानी नाही का?
गुजरातमध्ये ते कोण कोण लोक आहेत जे मोदींचा व्यूह तोडू पहात आहेत? गुजरात बाहेर तर नीतिश कुमार, केजरीवाल, कॉंग्रेस डर्टी पॉलिटिक्स खेळत आहेत हे सगळ्या जगाला दिसत आहे. पण गुजरातमधील पटेल समाजाची नेमकी मानसिकता अजून स्पष्टपणे कळून येत नाहीये. कारण आजपर्यंत आरक्षणाला विरोध करणार पटेल समाज अचानकच आरक्षण मागू लागला याचे उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे. एक मात्र खेदाने म्हणावे लागेल की आपल्या देशात जे संपन्न आहेत ते अजून संपन्न होऊ इच्छितात, जो ताकदवान आहे तो अजून ताकतवान होऊ इच्छितोय, प्रत्येक ताकदवान दुसर्‍याचा हक्क मारुन खावू इच्छितोय याला काय म्हणावे. समाजाची ही मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे. सामाजिक समरसतेचे धडे पुन्हा पुन्हा घेणे आणि देणे गरजेचे बनले आहे. हीन राजकारणाचा वापर करुन कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे केजरीवाल, हार्दिक पटेलसारखे अनेक लोक असतात. असल्या राजकारणाला बळी पडून समाजाची, देशाची राखरांगोळी न करता प्रगती कशी साधायची याचा विचार करणे आवश्यक आहे. आता त्या त्या समाजातील लोकांनीच ठरवायचे आहे की त्यांनी विकासाच्या राजकारणाला साथ द्यायची की आरक्षणासारख्या राजकारणाचा साथ द्यायची? अन्यथा अराजक माजून देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही.

Posted by : | on : 6 Sep 2015
Filed under : चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g