|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.26° C

कमाल तापमान : 27.79° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 2.06 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.26° C

Weather Forecast for
Thursday, 02 May

26.99°C - 29.8°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.67°C - 29.52°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.81°C - 29.87°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.09°C - 29.86°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 06 May

28.1°C - 29.39°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.55°C - 29.07°C

few clouds
Home »

स्वच्छ समुद्र किनारे: पर्यटकांचे आकर्षण

स्वच्छ समुद्र किनारे: पर्यटकांचे आकर्षणनवी दिल्‍ली, (३१ ऑक्टोबर) – शहरी भारतातील समुद्रकिनारे वर्षभर लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून ओळखले जातात. विशाखापट्टणम, मुंबई, चेन्नई, गोवा, केरळ, ओदिशा या किनारपट्टीकडे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले गेले असून मोठ्या संख्येने पर्यटक इथे भेट देतात. हे किनारे किनारपट्टी भागात राहणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत तर आहेच शिवाय स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध प्रदेशांमधील समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषण, पर्यटकांची होणारी गर्दी आणि अपुरी देखभाल यासारख्या समस्या भेडसावतात. समुद्रावरील कचऱ्याच्या अस्तित्वामुळे सागरी आणि किनारी...1 Nov 2023 / No Comment /

शिवकालस्मरण : सिंहगड

शिवकालस्मरण : सिंहगडपुण्यात येऊन सिंहगड बघितला नाही असे होत नाही. पुण्या पासून २० किलोमीटर असणारा सिंहगड समुद् सपाटी पासून ७५० मीटर उंचीवर आहे. सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला आपल्या ताब्यात यावा ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्यावर कोंढाणा मोगलांच्या ताब्यातून घेण्याची जबाबदारी सोपवली. १६७० साली तानाजीने निवडक मावळ्यांसह गडावर आक्रमण केले. घनघोर युध्दानंतर मावळ्यांनी तो किल्ला जिंकला,...7 Feb 2013 / No Comment /

चिखलदरा

चिखलदरा-सातपुडा पर्वतरांगातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भूप्रदेश- सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. विविध प्राणी, जै‍विक वनस्पती व वनांनी हा प्रदेश समृद्ध आहे. हिरवळीचा गालिचा पांघरलेला हा प्रदेश मन मोहून घेतो. त्याचवेळी दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, खोल दर्‍या श्वास रोखून धरायला लावतात. उंचावरून कोसळणारे धबधबे रौद्रभीषण सौंदर्याची अनुभूती...7 Feb 2013 / No Comment /

पाच‍गणी

पाच‍गणीपठारांच्या प्रदेशात पाचगणी महाबळेश्वरपासून जवळच असलेले पाचगणी हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. पाच लहान डोंगरांमुळे या भागाला पाचगणी असे नाव पडले. तिबेटच्या पठारानंतर आशियातील सर्वांत उंचीवरचे हे पठार आहे. येथे वर्षभर पर्यटकांची ये- जा असते. पर्यटकांमध्ये पाचगणी विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला या पठाराचे विशेष आकर्षण असल्याचे दिसते. दर्‍या -खोर्‍यांनी नटलेल्या, सुंदरतेचा वरदहस्त लाभलेल्या या भागात चित्रीकरणासाठी लोकेशन्सची कमतरता भासत नाही. वर्षभर येथे कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे शूटिंग चालू...7 Feb 2013 / No Comment /

माथेरान

माथेरान-हिर्व्या रंगांची सफर- मुंबईपासून एकशे दहा किलोमीटरवर असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून आठशे मीटर उंचीवर आहे. येथे तीस वेगवेगळी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येथे वाहनबंदी आहे. येथील खास वैशिष्टय असणारी रेल्वे पाहून अगदी गाण्यातल्या झुकझुक आगानगाडीची आठवण होते. वाफेच्या इंजिनावर चालणारी ही गाडी माथेरानला नेता नेता आजूबाजूच्या मनोहारी निसर्गाचे दर्शन घडविते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली...7 Feb 2013 / No Comment /

तारकर्ली बीच

तारकर्ली बीच-हिरव्यागार सौदर्याने नटलेला ‍समुद्रकिनारा– विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. बाधा व्हावी असे सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी...7 Feb 2013 / No Comment /

अष्टविनायक

अष्टविनायकअष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या...6 Feb 2013 / No Comment /

आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ

आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळसंतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी...6 Feb 2013 / No Comment /