किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 36 %
वायू वेग : 2.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.11°से. - 30.98°से.
मंगळवार, 11 मार्च27.91°से. - 29.75°से.
बुधवार, 12 मार्च27.74°से. - 29.8°से.
गुरुवार, 13 मार्च27.25°से. - 28.45°से.
शुक्रवार, 14 मार्च26.61°से. - 29.33°से.
शनिवार, 15 मार्च26.61°से. - 28.1°से.
रविवार, 16 मार्चभारताचे सर्वोच्च घटनात्मक पद असलेल्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक अधिकृत रीत्या जाहीर झाली आहे.१९ जुलै रोजी मतदान आणि २२ जुलै रोजी कोण या पदावर आरूढ होणार याचा निकाल लागेल. आता या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली वेगाने सुरू होतील. राष्ट्रपती हे पद भारतीय संसदीय लोकशाहीत घटनात्मक रीत्या सर्वोच्च पद असले तरी राष्ट्रपती स्वतंत्र बुद्धीने विचार करून काही निर्णय घेऊ शकत नाहीत. घटनेने जी चौकट घालून दिली आहे त्यानुसार राष्ट्रपतींना पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक वर्षे राष्ट्रपती म्हणजे रबरी शिक्का असे म्हटले जात होते. मात्र, एकाच राजकीय पक्षाची मक्तेदारी मोडीत निघत जसा जसा भारतातील राजकीय ध्रुवीकरणाला वेग आला तेव्हापासून चित्र बदलू लागले. घटनेने जरी राष्ट्रपतींना कमी अधिकार दिले असले तरी सरकार स्थापन करण्यासाठी कोणाला बोलवायचे इथपासून ते राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणण्याच्या निर्णयावर सही करायची की नाही इथपर्यंत राष्ट्रपती काय भूमिका घेतात याची मोठी चर्चा होऊ लागली.राष्ट्रपती हे पद निव्वळ रबरी शिक्क्यासारखे नाही तर निर्णायक भूमिका बजावण्याइतकी क्षमता या पदावरची व्यक्ती दाखवू शकते असे अनुभवाला येऊ लागल्यापासून या पदाची आणि त्यावर विराजमान होणार्या व्यक्तीची चर्चा अधिकच औत्सुक्याने देशात होऊ लागली.गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसची मक्तेदारी मोडीत निघून आघाडी सरकारांचा जमाना आला आणि राष्ट्रपतींच्या अधिकाराबरोबरच राष्ट्रपतींच्या निवडणुकीचीही मोठी चर्चा होऊ लागली आहे.नव्या राजकीय समीकरणांना गती देणारी निवडणूक अशी राष्ट्रपतींच्या निवडणुकीची अवस्था गेल्या काही वर्षांत अनुभवाला येत आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाने उमेदवार ठरवायचा आणि विरोधकांनी उपचार म्हणून उभ्या केलेल्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव करून त्याने निवडून यायचे अशी अवस्था झाकीर हुसेन यांच्या निवडणुकीपर्यंत होती. मात्र, झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्यावेळी इंदिरा गांधींनी कॉंग्रेसमधल्या सदस्यांना आतला आवाज ओळखून मतदान करण्याचे आवाहन केले आणि इतिहासात पहिल्यांदा कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव करून व्ही.व्ही गिरी हे अपक्ष उमेदवार राष्ट्रपती पदावर विजयी झाले. अंतरात्म्याचा आवाज पक्षाशी गद्दारी करायला लावतो हे पहिल्यांदाच भारतीय राजकारणाच्या इतिहासात अधोरेखित झाले. तेव्हापासून राष्ट्रपतींची निवडणूकसुद्धा देशात राजकीय उलथापालथीला गती देते असे अनुभवाला येऊ लागले. नंतर इंदिराविरोधी राजकीय ध्रुवीकरणात नीलम संजीव रेड्डी पुन्हा राष्ट्रपती झाले हे विशेष! आता पुन्हा राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान झालेली आहे. राजकीय विचारांची, प्रादेशिक अस्मितांची, या अस्मितांनी उभ्या केलेल्या राजकीय पक्षांची नवनवी समीकरणे उदयाला येत आहेत. संकुचित राजकीय स्वार्थ, प्रादेशिक स्वार्थ,व्यक्तिगत अहंकार यांच्या आधारावर सौदेबाजीची गणिते घातली जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत देशातील राजकीय क्षेत्र चांगलेच ढवळून निघणार अशी अवस्था आली आहे. राजकीय नेतृत्वाचा, राजकीय गणिते घालणार्या आधुनिक चाणक्यांचा, मुत्सद्देगिरीचा चांगलाच कस या निवडणुकीत लागणार असे दिसते आहे.संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जरी सत्तेत असले तरी जनलोकपाल सारखे विधेयक मोकळेपणाने राज्यसभेत हवे तसे मांडावे आणि बिनधास्त मतदानाला सामोरे जावे अशी आता सत्ताधार्यांची स्थिती नसल्याने राज्यसभेतून पळ काढण्याची वेळ त्यांच्यावर आली होती . ते] ]>
Short URL : https://vrittabharati.in/?p=705